पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकारचा संप्रदाय आला तरी त्या संप्रदायाच्या मंडळीचा समाजांत एक नवीन जातीसारखा निराळा तुकडा पडला नाहीं. ही गोष्ट देखील धार्मिक प्रश्नांकडे केवळ धार्मिक दृष्टीने पहाण्याची महाराष्ट्रांतील संवय स्पष्ट करते. दक्षिणेंत शांकर, आणि रामानुजी या दोन निराळ्या जातीच झाल्या आहेत. रामानंद हे भावप्रधान आचार्य होते. तर नाथपंथी मंडळी हटयोगादि क्रियांची अभिमानी होती. गुरूपदेश घेतांना आपला जो मुख्य गुण आहे त्या गुणाचाच प्रवक्ता गुरु करावयाचा अशीच लोकांची पद्धति नव्हती. नामदेव हा भक्तिप्रधान होता पण निराकार ईश्वराची कल्पना करणारा विसोबा खेचर हा नामदेवाचा गुरु होता. व यावरून गुरूचें आणि शिष्याचें वैशिष्ट्य एकच असलें पाहिजे असें नाहीं. आणि कवीचें वैशिष्ट्य शोधून काढतांना त्यानें कोणत्या मताचा गुरु केला होता हें शोधणें उपयोगी पडेलच असें नाहीं. ज्ञानेश्वराचें वैशिष्ट्य नाथपंथी मतांचें नव्हते. त्याला पूर्वसंस्कार त्याच्याच घरीं त्याच्या बापाकडूनच झाले असणार व त्यामुळे त्याच्या मनावर रामानंदी मताचे परिणाम जास्त झाले असण्याचा संभव आहे. ज्ञानेश्वराची स्वतःची आध्यात्मिक भूक नाथपंथप्रवेशाने शांत झाली असेल एवढेच. ज्ञानेश्वर आणि नामदेव हे जरी एका काळचे असले तरी त्या दोघांच्या एकंदर प्रवृत्तीत भेद आहे. नामदेव व तुकाराम हे दक्षिणेकडील आळ- वारांशीं सदृश आहेत तर ज्ञानदेव हा केवळ उच्च विषय अत्यंत सोप्या भाषेत प्राकृत लोकांसाठीं सांगणारा शिक्षक दिसतो ज्ञानदेव आणि मुकुंद राज हे जरी दक्षिणेकडील आळवारांच्या नंतरचे असले तरी त्या दोहोंमध्ये बौद्धिक संबंध होता किंवा नव्हता हे पूर्णपण सांगतां येण्याजोगें नाहीं. अध्यात्मशिक्षणाचे काम अंगिकारण्याइतपत १९ प्रथमकाल ज्ञानेश्वर हा पूर्वकालीन तत्त्ववेत्त्यांचा आणि नाथ- संप्रदायी मंडळीचा अनुयायी असला तरी ग्रंथ- रचना सोप्या आणि गोड, कवित्वयुक्त भाषेत करण्याच्या बाबतींमध्यें तो अगदीं स्वतंत्र दिसतो. त्याचे अभंग भात्र तामिळ वाचकास आळ- वारांची आठवण करून देतील. ज्ञानेश्वराच्या काळापूर्वी महानुभावांचें वास्मय पुष्कळच झालें होतें. नवीन उत्पन्न झालेले व सामान्य परंपरोविरुद्ध तत्त्वें प्रतिपादिणारे ग्रंथकार लोकांस आपल्याकडे ओढीत आहेत अशा प्रसंगी परंपरेचे जे अभिमानी ग्रंथकार होते त्यांनां मरा- ठींत लिहिणें अवश्य झालें होतें. महानुभावांचे मुख्य प्रतिपाद्य ग्रंथ म्हटले म्हणजे गीता आणि भागवत. या ग्रंथांचा अर्थ ते निवाडा करून सांगणार, त्याअर्थी याच ग्रंथावर श्रुतिस्मृतिपुरा- णोकांची भाष्ये असणें अवश्य होतें आणि त्या- मुळेच या दोन ग्रंथांच्या टीकांस अगोदर चालन मिळालें. या दृष्टीनें ज्ञानेश्वराचे पूर्वगामी परंपरा- गत संप्रदायाविरुद्ध असलेले धार्मिक प्रतिस्पर्धीच ठरतात. प्रकरण ५ चे. मराठी वाङ्मयाचा पहिला काल व कवींचें आपल्या अस्तित्वाचें समर्थन मराठी वाङ्मयाच्या प्रथम कालामध्ये मराठी भाषेत ग्रंथ लिहिण्याच्या कल्पनेविषयींच सुशि- क्षितांमध्यें तिरस्कारबुद्धि होती, असें म्हणण्या- पेक्षां त्या कल्पनेच्या युक्ततेविषयी साशंकता होती आणि या प्रकारच्या वृत्तीची जाणीव संकवींनां होती. या वृत्तीचें अस्तित्व त्या वृत्ती उत्तर देण्याचा प्रयत्न संतकवी करीत असत याव- रून दिसून येते. शिष्टांनी मराठीत लिहावयाचें