पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ज्याअर्थी संतकवी हे भारतीय गीर्वाण कवि - परंपरेंतील नाहींत तर त्यांची परंपरा कोणाशीं भिडवावी हा एक ऐतिहासिक प्रश्न उत्पन्न होतो. ज्ञानकोशामध्यें प्रो. दांडेकर यांनी जो सुंदर लेख लिहिला आहे त्यांत वारकरी पंथाच्या प्राचीन इतिहासाविषयीं मांडणी केली आहे ती येणें प्रमाणें. पांडुरंग हैं दैवत आद्य शंकराचार्याच्या वेळेस चांगलेंच लोकप्रिय होतें. पांडुरंगाची मूर्ति जैन नाहीं व कानडीहि नाहीं. पंढरपूरच्या देवळांतच कृष्णस्वामीची जी समाधि आहे ती ज्ञानेश्वराच्या जन्मापेक्षां साठ वर्षांनीं जुनी आहे. नामदेवाचे वडील देखील पंढरीची वारी करीत होते, त्याअर्थी ज्ञानेश्वरापूर्वी वारकरी पंथ होता व ज्ञानेश्वराचें कार्य त्या पंथाची घटना करण्याच्या स्वरूपाचें होतें, (ज्ञानकोश वि. २० पृ. व १६१) हें वरील विवेचन करतांना “कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु" यावर प्रो. दांडेकर यांनी ही मूर्ति कर्नाटकी नाहीं असें दाखविण्यासाठीं जें भाष्य केलें आहे तें वाचून देखील बिठ्ठलाचा संबंध कानडी लोकांशी नसावा असे वाटत नाहीं. " कानडी " याचा अर्थ " अगम्य " असा होतो हें प्रो. दांडेकर यांनीं दाखविलें आहे तें बरोबर आहे असें आम्हासहि वाटतें, तथापि बिठ्ठल कानडा कर्नाटक आहे या वाक्यांत कानडा या शब्दाचें स्पष्टीकरण होतें, दुसऱ्या कर्नाटक शब्दाचें होत नाहीं. त्या ओळीचा "कर्नाटकीय विठ्ठल अगम्य आहे" असाच अर्थ उत्पन्न होतो. तसाच अर्थ " डिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा पासोनिया " याहि अभंगांत होतो. कान- प्रो. दांडेकर यांनीं आणखी एक महत्त्वाची गोष्ट दाखविली आहे आणि ती म्हटली म्हणजे वारकरी संप्रदाय हा पूर्वीच्या एका विशिष्ट संप्र- दायाची उत्तरपीठिका नसून अनेक संप्रदाय मिळून झाला आहे. मात्र हैं लिहितांना त्यांनी जें विवेचन केलें आहे (ज्ञानकोश व १७० - १ ) तें १८ अपूर्ण आहे. प्रो. दांडेकर यांनी वारकरी संप्रदायांत चैतन्य, स्वरूप, आनंद, व प्रकाश हे चार संप्र- दाय होते हैं दाखविलें आहे पण खरोखर पाहतां यापेक्षां अनेक संप्रदायांचीं माणसें यांत आली होतीं आणि प्रो. दांडेकर यांनी जे चार संप्रदाय सांगितले ते वारकरी पंथांत उत्तरकाली प्रविष्ट झाले आहेत. अगदी प्रारंभीचे जे संप्रदाय मुकुंद- ज्ञानेश्वर काली होते ते म्हटले म्हणजे नाथसंप्र- दाय आणि रामानंदसंप्रदाय हे होत. मुकुंदराज आपली गुरुपरंपरा आदिनाथ, हरिनाथ आणि रघुनाथ अशी देतो, (विवेकसिंधु उत्तरार्धप्रकरण) तर ज्ञानेश्वर आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्ष- नाथ, गाहिनीनाथ व निवृत्तिनाथ अशी देतो. यावरून मुकुंदराज व ज्ञानेश्वर हे दोघेहि एकाच पंथाचे पण भिन्न शाखांचे होते असें स्पष्ट होते.या नाथसंप्रदायाची चळवळ उत्तर हिंदुस्थानापासून महाराष्ट्रापर्यंत झाली आणि कच्छपासून बंगाल- पर्यंत झाली हे दिसतें (ज्ञानकोशांतील "कान- फाटे" लेख पहा). दक्षिणेकडे शांकर, रामानुजी वगैरे जे संप्रदाय झाले त्यांनी आपल्या विचा- रांचे महत्त्व रामानंदा मार्फत स्थापन केलें आहे आणि ज्ञानेश्वराचा बाप विठ्ठलचैतन्य हा रामा- नंदाचा गुरु होताच. तर उत्तरेकडील नाथसंप्र- दायं आणि दक्षिणेकडील रामानंदसंप्रदाय या दोन्ही बाजूंनी महाराष्ट्रांतील आध्यात्मिक जीव- नास प्रेरणा मिळाली आहे. महाराष्ट्राची वृत्ति विशिष्ट मताच्या आग्रही अनुकरणाची नसून सर्वसंग्राहक होती असें वार- करी पंथाच्या प्रारंभापासून दिसतें. आणि ही वृत्ति अधिक प्रामुख्याने लोकांपुढे मांडली जाण्यास एकनाथानें चोवीस गुरु केले इत्यादि कथा निर्माण झाल्या. एकनाथाने जर खरोखरच चोवीस गुरु केले असतील तर असें दिसतें कीं आपली संग्रा हकता एकनाथास प्रामुख्याने पुढे मांडावयाची होती असें दिसतें. महानुभाव हा अगदी निराळ्या