पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वस्तुस्थिति तशी नव्हती. नवीन मराठी कृति कर- णारा ज्ञानेश्वर आपल्या भोवताली संस्कृत विद्येचें आणि ग्रंथकारांचे साम्राज्य पहात होता. आणि त्या वर्गाकडून आपला ग्रंथ मराठी असला तरी त्याची चहा होईल अशी अपेक्षा करीत होता. त्यावरून आपल्या भोवतालचा वर्ग दुराग्रही नसून सहृदय आहे अशी त्याची समजूत होती. महाराष्ट्रांतील हिंदु राज्याचा हा अंतकाल होता हें खरें पण त्यावेळेस विद्या मागसलेली नसून भरभरा- टीत होती असें दिसतें. संगीतरत्नाकरांचा कर्ता शार्ङ्गदेव, बोपदेव, हेमाद्रि, भास्कराचार्य यांसा- रखे एकंदर ग्रंथकार घेतले म्हणजे ज्ञानेश्वराच्या एकसूर्यतेची कल्पना कमी होऊ लागेल. १७ __कानड, तेलुगु वाङ्मयाकडे व त्याचप्रमाणें तामिळ वाङ्मयाकडे अवलोकन केलें म्हणजे असें दिसूं लागतें कीं मराठी वाङ्मय सुरू होण्या- पूर्वीच कानडी, तामिळ आणि तेलगु वाङ्मयें अत्यंत विविध प्रकारची झाली होती, आणि मराठी वाङ्मय मात्र बाल्यावस्थेत होते; पण यावरून महाराष्ट्राची संस्कृति तीन द्राविड संकृ- तींपेक्षां हीन दर्जाची होती असें म्हटलें तर मात्र तें चुकीचें होईल. मराठी वाङ्मय आणि महारा- | ष्ट्राची संस्कृति या गोष्टी एकत्र समजतां कामा नयेत. महाराष्ट्राची संस्कृति उच्च दर्जाचीच होती हें तत्कालीन विविध प्रकारचे ग्रंथ पाहतां म्हणा - वेंच लागेल. उलट पक्षीं असें मांडता येईल कीं, महाराष्ट्र हें. गीर्वाण संस्कृतीचाच आपण अंश आहोंत असें समजत असल्यामुळे त्या गीर्वाण संस्कृतीचेंच विस्तारण करण्याचा प्रयत्न करीत होतें आणि कानडी ग्रंथकार संस्कृतग्रंथसदृश ग्रंथ किंवा रूपांतरें करण्याचा प्रयत्न करीत होते. त्यामुळे त्यांची बुद्धि रूपांतरें करण्यांत खर्च झाली होती तर महाराष्ट्रीयांची बुद्धि अस्तित्वांत अस- लेल्या संस्कृतीचें संवर्धन आणि विस्तरण कर- ण्याकडे लागली होती. ३ श्रीमंत प्रो. गं. पं. वाचनाच संतकवींचे पूर्वगामी ज्ञानेश्वराच्या कृतीचा तत्कालीन व पूर्वकालीन वाङ्मयाकडे पाहून विचार केला तर ती कोण- त्याहि वर्गात बसत नाहीं. जयदेव हा त्यावेळचा संस्कृतकवी होता, व त्यांवेळीं सामान्य गायक कवी देखील पुष्कळ होऊन गेले असावेत. त्यांचे काव्य केवळ लावण्यांच्या स्वरूपाचें नसून भक्तिकाव्य देखील त्यांत असावें. असे कवि होऊन गेले हैं त्यांचे अस्तित्व, अनेक चालींच्या सहाय्यानें संगीत- रत्नाकर तयार झाला असला पाहिजे यावरून स्पष्ट होतें. त्यांत भक्तिकाव्य देखील असेल अशी कल्पना आहे याचें कारण भक्तिमय पद्यांचा उदय दक्षिणेंत त्याच्या अगोदरच झाला आहे आणि त्यांच्याकडे संगीतज्ञांची दृष्टि वळली असें दिसतें. अर्थात ज्ञानेश्वर हा पूर्वकालीन कवींच्या परंपरेतील नाहीं तर त्याचे बौद्धिक पूर्व- गामी कोण याचा स्वतंत्र विचार केला पाहिजे. प्रकरण ४ थे. संतकवींचे पूर्वगामी श्रीपतीची रत्नमाला हा मराठी ग्रंथ आहे पण श्रीपति हा ज्योतिषी होता; संत नव्हता. श्रीपति आणि ज्ञानेश्वर या दोघांनी मराठीत ग्रंथ रचना केली एवढेच दोहोंमध्यें साम्य आहे. श्रीप- तिनें रत्नमाला हा संस्कृतमध्ये ग्रंथ केला आणि त्याची प्रतिकृति स्वतःच केली. संस्कृत ग्रंथ पूर्वीच लोकविश्रुत होता पण मराठी ग्रंथ भारत- तिहाससंशोधक मंडळाच्या द्वितीयसंमेलनवृत्त- प्रसंगी कै. राजवाड्यांनी पुढे मांडला. तोपर्यंत कोणासहि ठाऊक नव्हता. श्रीपतीच्या ज्योर्तिवि- षयक ग्रंथाला काव्य म्हणून ज्योतिर्ज्ञान ज्यांत नाहीं तो कवि कसचा असें बोलायला कोणी ज्योतिषाचा अभिमानी आज पुढें येत नाहीं हें कवितेचें भाग्यच होय असें म्हटलें पाहिजे. असो.