पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण याचाच पंपरामायण हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. नाग- चंद्राच्याच कालांत राजादित्य नांवाचा कवि व कांति नांवाची कवयित्री होऊन गेली. बाराव्या शतकांतील कानडी जैन ग्रंथकार म्हटले म्हणजे नयसेन, दुसरा नागवर्मा, ब्रह्मशिव, कीर्तिबर्मा, कर्णपार्थ व वृत्तविलास हे होत. याचं कालांतला ब्राह्मण ग्रंथकार म्हटला म्हणजे दुर्ग- सिंह होय याने पंचतंत्र नांवाचा चंपु लिहिला आहे. बाराव्या शतकांतच लिंगायत वाङ्मयहि बरेंच झाले आहे. यावेळचे प्रमुख लिंगायत ग्रंथ- कार म्हटले म्हणजे हरिहर, राघवांक, केरेय, पद्म- रस, पालिकुरकेसोम व देवकत्र हे होत. या जैन, ब्राह्मण व लिंगायत ग्रंथकारांनी कान डींत किती विविध प्रकारचें वाङ्मय निर्माण केलें याचा विचार केला असतां असें दिसून येऊ लागते की, ज्ञानेश्वरीच्या काळाच्या पूर्वीच कानडी ही सर्व विषयांचे विवेचन करणारी भाषा झाली होती. नृपतुंगानें उल्लेख केलेल्या ग्रंथाची माहिती मागें विद्यासेवकांत 'नवव्या शतकांतील महाराष्ट्र' या लेखांत (वर्ष ४, अंक ४ ) विस्तृतपणे आलीच आहे. यानें रामायण व महाभारत या ग्रंथांचीच जैन रूपांतरें केलीं आणि त्याच कथांस अगदीं निराळें स्वरूप दिलें. छंदोबुधि हा कानडी छंद:- शास्त्रावर ग्रंथ निर्माण झाला. कानडीमध्ये बाण- भट्टाची कादंबरी अवतरली गेली. मदनतिलक नांवाचा शृंगारिक ग्रंथ झाला. विशिष्ट जैन पुराणें तयार झाली, अनेक नीतिग्रंथ तयार झाले. कानडी भाषेचे व्याकरण ग्रंथ झाले, जैनेतर धर्मातील दोष दाखविणारे ग्रंथ तयार झाले, गोवैद्यकावर आणि अंकगणित व क्षेत्रमापन इत्यादि विषयांवर पद्यात्मक ग्रंथ झाले. पंचतंत्रासारखा ग्रंथ तयार झाला, शिवपार्वती विवाहावर मोठे काव्य झाले, आणि लिंगायत पुराणे तयार झाली व कुसुमावली नांवाची एक स्वतंत्र कादंबरी तयार झाली. १६ द्राविडांची वाङ्मयप्रगति यापेक्षांहि जास्त होती. तिचें वर्णन वाचण्यासाठी ज्ञानकोशांतील तामिळ वाङ्मयावरील लेख पहावा. तामिळमध्यें आणि तेलगूमध्ये सुंदर स्वतंत्र काव्यें प्रसिद्ध झालीं आहेत आणि त्यांत संस्कृतग्रंथापेक्षां निराळें तेज दिसत होतें हैं निर्विवाद आहे. नवीन काव्यग्रंथ या दृष्टीने मराठीला द्राविड, तेलगु व कानडी या तीन भाषांशी तुलना करतां गौणत्व येते पण तें भासतें तितकें नाहीं. महाराष्ट्र हा कवितेंत मागासलेला असणे शक्यच नाही कारण भवभूति वन्हाडांतला, त्याचप्रमाणें राजशेखर हा महाराष्ट्रीयच होता, विदर्भपद्धति ही देखील वऱ्हाडांतच निर्माण झाली. ही काव्य- पद्धति गोड म्हणून प्रतिष्ठा पावली आणि हिला विदर्भपद्धति म्हणण्याचें कारण हिचा परिपोष विदर्भात झाला. विदर्भाची सुंदर काव्याबद्दलची प्रसिद्धि दंडीच्या पूर्वी झाली असली पाहिजे. कारण दंडीच्या काव्यादर्शात ही वर्णिली आहे. याशिवाय संगीतरत्नाकर हा संगीतशास्त्रांतील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ या महाराष्ट्रीयानेंच केला. इतर विद्येत महाराष्ट्र मागासलेला होता असें कसें म्हणावें ? भास्कराचार्य हा प्रसिद्ध ज्योतिषी महाराष्ट्रीयच होता, व हेमाद्रि यानें धार्मिक विष- यांची संहिताच केलेली आहे, आणि श्रौतधर्म, स्मार्तधर्म आणि पौराणिक धर्म या सर्वांची सांगड घातली आहे. हेमाद्रीने या बाबतीत जें अनेकविध कर्ममार्गांचें एकीकरण केलें तें आज- पर्यंत टिकलें आहे. बोपदेव याने व्याकरण विष- यक आणि वैद्यकविषयक जे ग्रंथ केले त्याचा उल्लेख आलाच आहे. आपण ज्ञानेश्वरकाळाकडे लक्ष दिलें आणि भोवतालचे संस्कृत ग्रंथ घेतले नाहींत म्हणजे ज्ञानेश्वराचा काल हा सर्वत्र अंधकाराचा काल असावा आणि त्या कालांत एक ज्ञानेश्वर कायतो हिरा असावा अशी कल्पना होऊं लागते पण