पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एका काली प्रसृत झाला होता पण त्या कल्पनेस विद्वान् वर्गानें फारसें महत्त्व दिलें नाहीं. बोपदेवाचा एक वैद्यकावर व एक धर्मशास्त्रावर ग्रंथ आहे. शिवाय मुक्ताफळ आणि हरिलीलाविवरण हे त्याचे ग्रंथ आहेत. याशिवाय बोपदेवाच्या नांवावर पुढील ग्रंथ सांपडतातः१त्रिंशश्लोकी अशौच संग्रह; २धातुपाठ; ३ परशुरामप्रतापटीका; ४ श्राद्धखंड; ५ राम- व्याकरण; ६ शार्ङ्गधरसंहिता; ७ गूढार्थदीपिका; ८ हृदयद पनिघंटु ९ बोपदेवशतक; १० काव्य- कामधेनु; ११ धातुकोश; १२ परमहंसप्रिया; १३ भागवतपुराण द्वादशस्कंधानुक्रमः १४ महिम्न- स्तवटीका; १५ शतश्लोकी व शतश्लोकी चंद्रकला; १६ सिद्धमंत्रप्रकाश (कधीं कधीं बोपदेवाच्या बापाच्या नांवावर हा ग्रंथ घालतात); १७ शीघ्र बोधव्याकरण. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनें हा काल महत्त्वाचा ठरतो. भास्वतीकरण हा करणग्रंथ अकराव्या शतकांत जगन्नाथपुरी येथें झाला. याशिवाय कर णोत्तम नांवाचा ग्रंथ त्याच सुमारास झाला. याच काळचा प्रसिद्ध महाराष्ट्रीय ज्योतिषी भास्करा- चार्य होय. याचे सिद्धांतशिरोमणि, करणकुतूहल, लीलावती इत्यादि अनेक ग्रंथ आहेत. भास्क- राचार्याच्या ग्रंथांची भाषांतरें पुष्कळ झाली व त्यावर टीकाहि इतक्या आहेत कीं तितक्या टीका कोणत्याहि ज्योतिषग्रंथावर नाहींत. भास्करा- चार्याचा पुतण्या अनंतदेव यानेंहि दोन टीका- ग्रंथ लिहिले. त्याच्या नंतरचा ग्रंथकार विवाह वृंदावनकार केशव (शके ११६५ ) होय. श्रीपतीच्या रत्नमालेवरील महादेवकृत टीकेचा काल शके ११८५ हा आहे. ज्ञानेश्वरीच्या काळचाच दुसरा एक ज्योतिषी म्हणजे महादेव परशुराम हा होय (शके १२३८). यानें महादेवीसारिणी नांवाचा ग्रंथ लिहिला. बोपदेवाचा मुलगाहि ज्योतिपग्रंथ कार होता. १५ भारतीय काव्यपरंपरा व मराठी संतकवी अकराव्या शतकांत वंगसेन आणि चक्रदत्त यांचे चिकित्सासारसंग्रह प्रसिद्ध आहेत. शार्ङ्गगधर हा ग्रंथकार बाराव्या शतकांतील असावा. तेराव्या शतकांत म्हणजे ज्ञानेश्वराच्या काळां वैद्यकावर महाराष्ट्रीयांनी संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिले आहेत; त्यांत हेमाद्रीच्या आयुर्वेदिक रसायन या टीकेचा उल्लेख करतां येईल. हेमाद्रीचा आश्रित बोपदेव यानें शतश्लोक नांवाचा वैद्यकग्रंथ लिहिला तो वर उल्लेखिलाच आहे. आतां यावेळचें कानडी वाङ्मय काय होतें तें पाहूं. या तीन शतकांमध्ये कानडी वाङ्मय फारच पुढे आले. आणि तें पुढे येण्यास जैन आणि लिंगायत ग्रंथकार कारण होत. जैनवाङ्मयाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काल हाच होय. कानडी वाङ्मयाची परंपरा निदान नवव्या शतकापासून सुरू आहे. मान्यखेतचा राजा नृप- तुंग याचा कविराजमार्ग नवव्या शतकांतच तयार झाला. त्यांत दहाबारा कानडी कवींचा उल्लेख आहे. त्यांत व इतर ग्रंथांत उल्लेखिलेल्या कानडी ग्रंथकारांचा हिशोब घेतला तर ही ग्रंथांची परं- परा पांचव्या शतकापर्यंत मागें जाईल. कवि- राजमार्गात कवीश्वर, विमल, उदय, नागार्जुन, जयबंधु, दुर्विनीत व श्रीविजय ह्या ग्रंथकारांची नांवें प्रामुख्याने आढळतात. कविराजमार्गानंतरचा ग्रंथकार पहिला गुणधर्म हा होय. यानें हरिवंश किंवा नेमिनाथपुराण हा ग्रंथ लिहिला. दहाव्या शतकांतील “तीन रत्ने” या नांवानें जे कवी प्रसिद्ध आहेत, ते पंप, पोन्न आणि रन्न हे होत. पंप पूर्वी ब्राह्मण होता पण नंतर जैन झाला. व रन्न हा कासार होता. अकरावें शतक जैन वाङ्म- याच्या दृष्टीनें कमी महत्त्वाचें होतें पण त्या कालांत चंद्रराजानें "मदनतिलक" नांवाचा ग्रंथ लिहिला. अकराव्या शतकाच्या प्रारंभकालींचा प्रसिद्ध ग्रंथकार नागचंद्र किंवा अभिनवपंप होय.