पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण उतारे घेतले आहेत यावरून हा ग्रंथ अकराव्या शतकांत झाला असावा असा तर्क होतो. याच सुमाराचें आणखी एक नाटक म्हटले म्हणजे सुभटाचें दूतांगद हैं होय. याच्या नंतरच्या काळांत म्हणजे मराठी कवींच्या कालांत देखील अनेक नाटकें झाली आहेत. त्यांची माहिती ज्ञानकोशांत नाट्यशास्त्र या लेखांत (पृष्ठ नं. १२६ - १३६) सांपडेल. नाटक या नांवाखेरीज प्रकरण, नाटिका, प्रह- सन इत्यादि ज प्रकार होते त्या प्रकारचे अनेक ग्रंथ याच काळांत होऊन गेले आहेत. कर्णेसुंदरी ही नाटिका बिल्हणाची होय. मदन कवीची पारि- जातमंजरी तेराव्या शतकाच्या प्रारंभीच झाली. साहित्यदर्पणकाराने व त्याच्या बापानें लिहिलेल्या दोन नाटिका विश्रुत आहेत. लटकमेलक प्रहसन याच काळांत होऊन गेलें. या काळांत नाट्य वाङ्मय सपाटून झालेलें दिसतें पण तीं नाटकें जुन्या नाट्यकारांइतकीं प्रसिद्धि पावलीं नाहींत. साहित्यशास्त्राची वाढ या कालांत होतच होती. साहित्यशास्त्राकडे पाहिलें तर ते नवव्या शत- कापासून वाढतच होतें. दंडीच्या काळांत अलं- कारास प्राधान्य दिले जात होतें. आणि नवव्या शतकाच्या पुढे अलंकारांचा जरी अधिक विका झाला तरी अलंकाराखेरीज इतर गोष्टीनां काव्यांत प्राधान्य मिळू लागलें. नवव्या शतकांतला उद्भट हा रसपरिपोषाचेंच काव्यांत प्राधान्य आहे असें तत्त्व मांडूं लागला व “ध्वनी" चे महत्त्व सांगूं लागला. ध्वनिकारिका, ध्वन्यालोक, ध्वन्यालोक - लोचन, व्यक्तिविवेक हे ग्रंथ मागाहून दहाव्या शत- काच्या अंतापर्यंत झाले. अकराव्या शतकांतला प्रसिद्ध ग्रंथकार मम्मट हा होय. याचा काव्यप्र- काश ग्रंथ तर प्रसिद्धच आहे. पुढे क्षेमेंद्राचा औचित्यालंकार व कविकंठाभरण हे ग्रंथ येतात. धारच्या भोजराजाचा सरस्वतीकंठाभरण हा प्रसिद्ध १४ ग्रंथ त्यापढें येतो. बाराव्या शतकाच्या आरंभी वाग्भट व हेमचंद्र या जैन ग्रंथकारांचे काव्यानु- शासन हे ग्रंथ येतात. बाराव्या शतकाच्या आरंभी राजांकरुय्यक यानें अलंकार सर्वस्व हा ग्रंथ रचिला व बाराव्या शतकांतच रुद्रभट्टानें श्रृंगारतिलक हा शृंगारपूर्ण साहित्यावर ग्रंथ लिहिला. साहित्य- शास्त्रांत महाराष्ट्राने बाराव्या शतकांत घातलेली भर सांगावयाची म्हणजे जयदेव कवीच्या चंद्रा- लोक या ग्रंथाचा उल्लेख केला पाहिजे आशाध- राचा टीकाविषयक झालेला ग्रंथ हाच होय. या कालामध्ये कोशरचना बरीच झाली आहे. हलायुध कोश अकराव्या शतकाच्या अगोदर लिहिला गेला असेल तर तो फार थोडीं वर्षे अगो- दर लिहिला गेला असावा. हलायुधानंतरचा मोठा. कोश म्हटला म्हणजे वैजयन्ती होय. हा रामानु- जाचार्याच्या समकालीन ग्रंथकार यादवप्रकाश याचा होय. यादवप्रकाश दाक्षिणात्य होता. बाराव्या शतकाच्या पूर्वार्धात दिगंबर जैन पंथाच्या धनंजय नामक कवीनें नाममाला नांत्राचा कोश लिहिला. ११११मध्ये महेश्वर कवीनें विश्वप्रकाश नांवाचा कोश लिहिला. याच्यानंतरचा कोश मंख कवीचा होय. या कोशांत पुष्कळच नवीन शब्दांचा भरणा आहे. याच्यानंतर हेमचंद्राचा कोश येतो. बाराव्या शतकाच्या अखेरीस आणि तेराव्या शतकाच्या आरंभी केशवस्वामीनें नानार्थाव नांवाचा कोश लिहिला. चौदाव्या शतकांत मेदिनी नांवाचा कोश पुढे येतो. येणेंप्रमाणें संस्कृत भाषेत कोशाची रचना कर- णारे ग्रंथकार दिसून येतात. (व्याकरणग्रंथांकडे पाहिलें तर मात्र त्यां बोपदेवाचें म्हणजे महाराष्ट्रीयाचें नांव प्रामुख्याने पुढें येतें. हा ज्ञानदेवाचा समकालीन गृहस्थ. यानें मुग्धबोध, कविकल्पद्रुम व त्यावरील कामधेनु ही टीका हे महत्त्वाचे व्याकरणग्रंथ लिहिले आहेत. भागवत हें बोपदेवानें लिहिलें असाहि समज