पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तयार होई ती त्या स्थलाच्या संस्कृत ग्रंथकारां- वर परिणाम करीत असे. या तीन शतकांतील संस्कृत वाङ्मयाचा आढावा घ्यावयाचा म्हणजे काव्य, नाटक, कथा वाङ्मय, कोशरचना, व्याकरण इत्यादि निरनि- राळ्या वाङ्मयक्षेत्रांत काय कार्य झालें हें पहा- वयाचें. काव्यग्रंथांकडे आपण प्रथम लक्ष देऊ. नववे आणि दहावे शतक यांच्या संधिकालांत राजशेखर हा प्रसिद्ध कवि होऊन गेला. हा महा- राष्ट्रीय होता आणि याची बायको चव्हाण कुलां तील होती. दहाव्या शतकाच्या अंतिम कालांत मुंजराजाचें नांव कधींमध्ये आढळते आणि अक- राव्या शतकांत त्याचा पुतण्या भोज हा कवींचा आश्रयदाता म्हणून प्रसिद्ध झाला. अकराव्या शतकांतील चालुक्यांच्या आश्रयास असलेला प्रसिद्ध कवि म्हटला म्हणजे विक्रमांकदेवचरि- ताचा कर्ता काश्मीरचा बिल्हण होय. या सुमा- रासच क्षेमेंद्र काश्मीरांत कवि म्हणून प्रसिद्ध होता. अकराव्या शतकाच्या उत्तरार्धेत कथासरित्सा - गरांचा कर्ता सोमदेव हा चमकला. बाराव्या शत- कांतील मोठाली कामे म्हटली म्हणजे मंखाचें श्रीकंठचरित, आणि कल्हणाचा काव्यरूपी राजतरंगिणी नामक इतिहास होय. या वेळेचें संस्कृत काव्याचें मुख्य केंद्र म्हटलें म्हणजे काश्मीर होते पण त्याच्या खालोखाल बंगालचा राजा लक्ष्मणसेन याचा दरबार होय. त्याच्या आश्रयानें उमापतिधर, धोई गोवर्धन आणि गीतगोविंद कार जयदेव इत्यादि कवी पुढे आले. नैषधकाव्य लिहिणारा श्रीहर्ष कवि हा बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात कनोजच्या जयनंद आणि विजयचंद यांच्या दरबारी राहिला असावा. या प्रख्यात काव्यांशिवाय अनेक काव्यात्मक प्रशस्त्या याच काळांत लिहिल्या गेल्या. तेराव्या शतकांत काव्य- ग्रंथ तयार झालेले अजून आढळले नाहींत. कथावाङ्मयासंबंधानें आपणांस असें दिसून येतें कीं, अकराव्या शतकांतील ग्रंथकारांमध्ये 1, १३ भारतीय काव्यपरंपरा व मराठी संतकवी उल्लेखिलेले क्षेमेंद्र आणि सोमदेव हेच उल्लेखावे लागतात. बेताळपंचत्रिंशी ( वेताळ पंचविंशति ) ही बृहत्कथेंत आहेच पण तिचे अनेक पाठ आप- णांस आढळून येतात. सिंहासनद्वात्रिशिका उर्फ सिंहासनबत्तिशी हें पुस्तक अकराव्या किंवा बाराव्या शतकांतलेच असावें. याच्या सामान्य आणि जैन अशा दोन आवृत्त्या आहेत. माधवा- नल - कामकंदला नांवाची जी कादंबरी आहे ती कदाचित याच काळांतील असेल. हींत आनंद नांवाचा एक ब्राह्मण व एक नर्तिका यांची प्रेमकथा. आहे. विक्रमादित्यावर विक्रमोदय म्हणून एक कथासमूह आहे आणि " वीरचरित्र" नांवाचें एक काव्य शातवाहनांच्या एका शूद्रक नांवाच्या आश्रि- ताचीं धाडसी कृत्यें वर्णन करितें. शुकसप्तति हैं। याच कालांतील पुस्तक होय"भारतकद्वात्रिंशिका ” यांत भिक्षा मागणान्या जातींच्या किंवा भारत- कांच्या ३२ कथा आहेत. शिवदासकृत कथाव यांत चोरांच्या गोष्टी आहेत. तथापि या काळा- नंतर संस्कृत कथारचनेला ओहोटी लागली असावी. व या कथावाङ्मयापैकी देखील बरेच वाङ्मन अगोदर प्राकृतमध्यें आणि मागाहून संस्कृतमध्ये आलें असावें. नाट्यवाङ्मयासंबंधानें विचार करतां निश्च- यात्मक या काळांत झालेले नाटक आढळत नाहीं. जयदेवाचें प्रसन्नराघव हें कदाचित या काळांत झालें असेल पण त्याची देखील खात्री देतां येत नाहीं. हा जयदेव गीतगोविंदकार नसून वऱ्हाडचा म्हणजे महाराष्ट्रीय आहे. हा ज्ञानेश्वराच्या पूर्वी झाला एवढे मात्र खरें. जयदेव हा साहित्यशास्त्रज्ञ होता आणि याचा ' चंद्रालोक ' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. प्रसन्नराघवानंतरचें नाटक म्हटले म्हणजे हनूमन्नाटक किंवा महानाटक होय. हें नाटक कोणी केले याचा विचार आपण बाजूस ठेवू. भोजाच्या कालांत हैं नाटक प्रसिद्धीस आलें हें उघड आहे आणि यांत प्रसन्नराघवांतील कांहीं