पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण कविपरंपरेंत घालतां येणार नाहींत. मराठी अध्या- स्मग्रंथांत हे वैशिष्ट्य का उत्पन्न झालें त्याची विशिष्ट सामाजिक कारणें काढली पाहिजेत व संस्कृत आणि प्राकृत मिळून जें भारतीय वाङ्मय तयार होतें त्या वाङ्मयांत हा नवीन ओघ कोणत्या कारणांनी आला हें पाहिलें पाहिजे. ज्ञानेश्वरीच्या काळापर्यंत आलेला संस्कृत, ललित व वैज्ञानिक वाङ्मयाचा विकास पाहिला तर असें दिसून येईल की कांहीं बाबतीत अत्यंत श्रेष्ठ ग्रंथकार त्याच वेळेस होत होते तर काहीं बाबतींत जुन्या संस्कृतीचा ओघ आटावयास लागला होता. कवितेचा विकास एकंदर पाहिला तर त्यावेळेस पंचमहाकाव्ये झालीं होतीं व बिल्ह - णाच्या विक्रमांकदेवचरितासारखे ग्रंथहि तयार झाले होते, नाटकें झालीं होतीं. कालिदासादि कवि साहित्यशास्त्राचें अध्ययन केलेले होते पण त्यांच्या चळवळीचा काल संपून गेला होता व त्यांची दृष्टि स्फुट श्लोक करण्याकडे वळली होती. महाराष्ट्रांत देशी भाषा काव्यक्षेत्रांत डोकावून पहात होती पण तिचा काव्यरचनेमध्यें उपयोग करण्याकडे विद्वानांचे फारसे लक्ष गेलें नाहीं. पण तामिळ, कानडी व तेलगु प्रदेशांत सर्व प्रका- रच्या वाङ्मयासाठीं देशी भाषेचा उपयोग केला जात होता महाराष्ट्रांत देशी भाषेत पदें, लावण्या या गोष्टी पुष्कळ असाव्यात. पण त्यांचे संहिती- करण व अभ्यास ही त्यावेळेसच झालीं नाहींत तथापि त्या साहित्याकडे संगीतज्ञांचे लक्ष गेलें असावें. संगीतरत्नाकरादि ग्रंथांत जे राग दृष्टीस पडतात ते राग संस्कृतमधील गानसाहित्यावरून तयार झाले नसून ते देशी गानसाहित्यावरूनच तयार झाले आहेत हें त्या विषयावर विचार कर- णाऱ्या कोणासहि स्पष्ट होईल; येथें त्यावर लिहीत नाहीं. कारण यावर चांगले लिहावयाचें म्हणजे एक मोठा ग्रंथच लिहावा लागेल. ज्या साहित्या - वरून रत्नाकरकारांचें संगीतशास्त्र तयार झालें १२ तें साहित्य आज रक्षिलें गेलें नाहीं हें उघड आहे. मराठी संतकवींच्या कालीं असलेल्या ललित आणि गंभीर संस्कृतीचा आतां आपण आढावा घेऊं. या गोष्टीचा विचार करण्यासाठी अकरावें बारावें आणि तेरावें या तीन शतकांतील संस्कृत व देशी या दोन्हीं वाङ्मयांकडे लक्ष दिले पाहिजे. मराठी ग्रंथरचना ज्या काळी सुरू झाली त्या काळांत म्हणजे श्रीपतीच्या रत्नमा- लेच्या काळापासून ज्ञानेश्वराच्या काळापर्यंत म्हणजे १० व्या शतकापासून १३ व्या शतका- पर्यंत संस्कृत ग्रंथरचना थांबली होती असें मुळींच नाहीं. दक्षिणेकडे देशी वाङ्मय सपा- टून वाढलें होतें. पण संस्कृत ग्रंथ देखील होत होत. संस्कृत ग्रंथरचनेचा ओघ अद्यापहि थांबला नाहीं. संस्कृतमध्ये अजूनहि काव्ये आणि नाटके तयार होतात. विजयानगरचे तैलंगी ग्रंथ- कार मुटुंब नृसिंहाचार्य यांनी तर गेल्या चाळीस वर्षात पंन्नास-साठांवर संस्कृत ग्रंथ लिहिले आहेत आणि त्यांत मोठमोठीं काव्यें आहेत. संस्कृत ग्रंथकारांची परंपरा थोडीबहुत अजून अव्याहत आहे; तर वर सांगितलेल्या तीन शतकांत वाङ्मय- विषयक आणि वैज्ञानिक स्थिति काय होती हैं पाहतांना संस्कृत व देशी या दोन्ही ग्रंथभांडारां- कडे नजर फेंकली पाहिजे. ग्रंथकार आपले म्हणणें मांडण्यासाठी निरनिराळ्या भाषांचा आश्रय करतो. आजहि पुष्कळ ग्रंथकार इंग्रजीत आणि देशी भाषेत लिहितात तर कांहीं देशी भाषेत व संस्कृत भाषेत लिहितात. आंध्र, द्रविड, आणि कर्नाटक या तीनहि प्रदेशांत देशी भाषेत त्याचप्रमाणें संस्कृतमध्ये लिहिणारे ग्रंथकार झाले. निरनिराळ्या ठिकाणचे संस्कृत ग्रंथ एकमेकांकडून वाचले जात होते, पण देशी भाषेतील ग्रंथ मात्र वाचले जात नव्हते असें वाटतें. पण प्रत्येक ठिकाणीं देशी वाङ्मयामुळे जी कांहीं मनोवृत्ति