पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अर्थी लागत असावा, आणि तो शब्द त्याच अर्थानें रामदासांनीं वापरला आहे. रामदासांचं "आतां वंदू कवीश्वर" इत्यादि जें व्याख्यान दासबोधांत आहे तें " रसात्मक वाक्यें लिहि- णाऱ्या कवीला" मुळींच लागू पडत नाहीं. तें व्याख्यान वाचून रामदासांनीं कवींचें वर्णन जें लिहिलें आहे तें जगांतील अनेक सर्वमान्य कवींनां लागू पडावयाचें नाहीं. कारण रामदास, कवि हा शब्द “ज्ञानी” या अर्थाने वापरीत आहेत. राम दासांनीं कवींचें जें वर्णन केलें आहे तेंच खरें "कवि" लक्षण आहे असे गृहीत धरून आणि अर्वाचीन कवींनां तें लागू पडत नाहीं म्हणून अर्वाचीन कवींचा उपहास करण्याची प्रवृत्ति कांहीं जुन्या संतकवींच्या अभिमान्यांत दृष्टीस पडते. पण या तऱ्हेचा उपहास अयोग्य होय. अर्वाचीन कवींच्या उदयकालीं त्यांस नालायक ठरविण्यासाठी या तऱ्हेचा वाद फारच होता पण अर्वाचीन कवींचें स्थान पक्के झालें आहे व तो वादहि आतां बंद पडला आहे. "कवि" ही पदवी कोणास द्यावी हा प्रश्न विचारास घेतला तर जुन्या संतकवींस हा शब्द लावावा किंवा नाहीं असाच प्रश्न उत्पन्न होईल. संतकवी हे जुन्या कविपरंपरेंतील व्यक्ती मुळींच नाहींत. जुन्या कवि- परंपरेशीं आपलें नातें जर कोणास सांगतां आलें तर ते अर्वाचीन कवींनांच सांगता येईल. जुने संतकवी यांस आपण ते कवी नाहींत असें म्हटलें म्हणजे त्यांच्या पदरीं आपण कमी- पणा बांधतों असें नाहीं कारण ते शिक्षक होते हें कोणीहि कबूल करील आणि लावण्या कर- णाऱ्या मंडळींचा कवि शब्दावर हक्क ब्रह्मज्ञाना- वर ओवीबद्ध लिहिणारांपेक्षां जास्त आहे; हेंच भारतीय वाङ्मयाचा इतिहास व त्या इतिहासांत “कवि” शब्दाचा उपयोग कोणत्या प्रकारच्या व्यक्ती दाखविण्यासाठीं करीत असत हें जाण- णाऱ्या मंडळींनां कबूल करावें लागेल. जुने संत- ११ भारतीय काव्यपरंपरा व मराठी संतकवी । कवी कोणत्या परंपरेंतील आहेत, याचा विचार त्या संतकवींच्या वृत्तीचें एकंदर भारतीय वाङ्मयां- तील कार्य पाहूनच केला पाहिजे. हा विचार कर- तांना मराठी कवींनीं जो विषय मांडला तो कविसंप्र- दायांतील विषय होता कीं काय आणि त्यांनीं जें वाङ्मय लिहिलें तें काव्य म्हणून लिहिलें काय हे प्रश्न पुढे उभे रहातील. पुढे जो पुरावा देत आहे त्यावरून असें स्पष्ट दिसून येईल कीं मराठी कवी ज्या वर्गातून बाहेर आले ता वर्ग संस्कृत कवींच्या वर्गातून निघा - लेला नव्हता. त्यावेळचे संस्कृत विद्येचे प्रतिनिधि- वर्ग अनेक होते. वेदाभ्यासी याज्ञिक वर्ग होता, तसाच भाषाशास्त्रज्ञांचा वर्ग होता, संगीतज्ञांचाहि निराळाच वर्ग होता. तसेच धर्मशास्त्रज्ञ व ज्योति- षाचे अभ्यासक समाजांत होते, वैद्यकशास्त्रज्ञ होते. या सर्वांच्या परंपरा संतकवींच्या कालांत देखील चालूच होत्या आणि या सर्व परंपरांचे प्रतिनिधि अजूनहि आढळतात. संस्कृतवाङ्मयांत- र्गत ज्या वाङ्मयशाखेचा मराठी संतकवींचे ग्रंथ हा परिणाम होत ती वाङ्मयशाखा कवितास्वरू- पाची नसून अध्यात्मवाड्मय स्वरूपाची आहे. कवीचा धंदा निराळा आणि अध्यात्मिक शिक्ष- काचा अगर वाड्मयोत्पादकाचा धंदा निराळा. मराठी वाङ्मय संस्कृत आध्यात्मिक ग्रंथकारांच्या परंपरेतील आहे, पण त्या वाङ्मयाचें स्वरूप संस्कृत आध्यात्मिक ग्रंथांपेक्षां निराळें आहे. पशुवैद्यक आणि गणित या विषयांवर लिहितांना ज्याप्रमाणें आद्य संतकविकालीन कानडी ग्रंथ- कारांनीं पथमय लेखनाचा अवलंब केला त्याच- प्रमाणें संतकवीनींहि पचावलंब आध्यामिक क्षेत्रांत केला आहे. मराठी संतवाङ्मयासारखेंच संस्कृत अध्यात्मवाङ्मय नाहीं, मराठी संतवाङ्म संस्कृतमध्ये भाषांतरिलें तर ते ग्रंथ अगदीं निराळ्या प्रकारचे दिसूं लागतील हें खरें आह तथापि तेवढ्यावरून मराठी कवींचे ग्रंथ भारतीय