पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण होताच. तसा वर्ग मुळीच नसता तर त्यांच्या- कडून झाली तेवढी देखील कृति झाली नसती. प्रकरण ३ रे. आणि या वाङ्मयाच्या लोकशाहीत लोकमताकडे तर विशेषच लक्ष दिलें पाहिजे. जेव्हां वाङ्मय राजा किंवा आश्रयदाता श्रीमान जमीनदार याच्या आश्रयानें निर्माण होत असतें तेव्हां तें वाङ्मय आश्रयदात्याच्या अभिरुचीनें मर्यादित होत असतें, आणि वाङ्मयाला जेव्हां राजे किंवा मोठे जमी- नदार यांचा आश्रय नाहींसा होतो तेव्हां वाङ्मय जनतेच्याच आश्रयानें संवर्धित होतें, आणि त्या स्थितीचे परिणाम वाङ्मयावर झाल्याशिवाय रहात नाहींत. जें पुस्तक मुळींच खपणार नाहीं तें छापावयास कोणीहि प्रकाशक धजावणार नाहीं. जोपर्यंत ग्रंथलेखक केवळ आपल्या तुष्टीसाठीं स्वतःचे पैसे खर्च करून पुस्तकें छापीत आहे, आणि एक पुस्तकहि खपलें नाहीं तरी हरकत नाहीं असें जोपर्यंत त्यास वाटत आहे. तोपर्यंत तो लोकाभिरुचि दुर्लक्षूं शकेल. पण ती देखील फारशी दुर्लक्षितां यावयाची नाहीं. आपण केलेली कृति लोकांना आवडावी ही लेखकाची इच्छा असतेच आणि ती इच्छा त्याच्या लेखावर परिणाम घडविल्याशिवाय रहाणार नाहीं. तथापि याबरोबर हेंहि सांगितलें पाहिजे की पुष्कळ उच्च प्रतीच्या लेखकांस आपल्या लेखाची समका- लानांकडून चहा होणार नाहीं हें टाऊक असतें तरी तो लिहीतच असतो. आणि याचें कारण पद्य आणि कविता ह्या गोष्टी भिन्न आहेत. आपण आजच्या जनतेची गरज भागवीत नसलों तथापि सामान्य मनुष्य पद्य आणि कविता क तरी भविष्यकालीन जनतेची गरज भागवीत समजतो, आणि पद्यकारास कवि समजतो. या आहों ही त्याला जाणीव असते. तथापि त्यास दृष्टीनें जे पद्यात्मक ग्रंथ लिहिणारे ग्रंथकार होऊन आपला क्रम चालू ठेवण्यास प्रचालित काळांत थोडा गेले त्यांस लोक कवी असें म्हणूं लागले. शास्त्रज्ञ तरी. अभिज्ञ वर्ग भेटावा लागतो. कै. राजवाडे मंडळीनां या लौकिक प्रवृत्तीविरुद्ध मांडण्याचे व कै. खरे शास्त्री यांनी आपला ग्रंथप्रसिद्धीचा कारण नव्हतें. कारण सुशिक्षित वर्गाच्या दृष्टीनें क्रम लोकाभिरुचि तयार झाली नसतांहि कायम देखील संतकवी हे एका अर्थाने कवीच होते. ठेवला. व तसें करण्यांत त्यांनीं स्वार्थत्याग पुष्कळ / केला ही गोष्ट हि निर्विवाद आहे, पण त्यांच्या परिश्रमाची जाणीव असलेला व त्यांच्या कृतीची अभिरुचि असलेला वर्ग महाराष्ट्रांत थोडा तरी भारतीय काव्यपरंपरा व मराठी संतकवी संतकवींमध्यें काव्यविषयक विचार काय होते आणि त्यांनां कवितेची मर्मज्ञता कितपत होती या दृष्टीनें संतकवींच्या ग्रंथांत बुडी मारण्यापूर्वी आप- णांस हा विचार केला पाहिजे कीं, हे कधी भार- तीय काव्यपरंपरेतील व्यक्ती होत्या का? त्या परंपरेंतील व्यक्ती असतील तर त्यांची काव्य- विषयक मर्मज्ञता आणि संस्कृत साहित्यशास्त्र यांचा संबंध जुळवितां येईल. पण ते जर त्या परंपरेतील व्यक्ती नसतील तर ते कोणत्या परंपरेंतील आहेत हैं। पाहिलें पाहिजे आणि त्यांच्यामध्ये स्वकीय वाङ्मय- विषयक कांहीं ध्येये उत्पन्न झाली होतीं काय याचा तपास केला पाहिजे. या संतकवींस त्या वेळेस साधु, संत, भक्त इत्यादि निरनिराळी विशेषणे प्राधान्येकरून लावली जात होतीं, पण कवि हैं विशेषण देखील लावले जात होतेंच मात्र तें कोणत्या अर्थाने लावलें जात होतें याचा विचार केला पाहिजे. कवि या शब्दाचे अनेक अर्थ संस्कृत ग्रंथांत दिसून येतात. कवि म्हणजे विद्वान असा अर्थ होतो आणि कवि हा शब्द दैत्यगुरूसहि लावीत असत. हा शब्द प्राचीन महाराष्ट्रांत विद्वान या