पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

| टीकाकाराच्या कोट्यांमुळे गचाळ ग्रंथ मात्र लोकांच्या नजरेस येतो, व ज्या ग्रंथाकडे कोणी लक्ष दिले नसते त्या ग्रंथास एक तऱ्हेचें चिर- कालत्व प्राप्त होते. अप्रामाणिक टीकेचा दुसरा एक प्रकार म्हटला म्हणजे तो ग्रंथ विशिष्ट कार्यासाठी ज्या दृष्टीनें लिहिला असेल ती दृष्टि टाकून त्याला भलतीच कसोटी लावणें. उदाह- रणार्थ कोणताहि चांगला ग्रंथ घेतला तर तो लहान मुलांच्या हाती पडला तर काय परिणाम होतील या दृष्टीने या परीक्षण करणें. उदाह- रणार्थ एखाद्यानें गुन्हेगारी कशी होते व गुन्हेगार शोधून काढतां कसा येतो यासंबंधाने १०० गुन्ह्यांच्या संशोधनाचा इतिहास प्रसिद्ध केला व एखाद्या टीकाकारानें ग्रंथकाराच्या हेतूकडे न पहातां त्यावर टीका आरंभली तर ती टीका अयोग्य | होय. असो; ज्ञानेश्वरी अमृतानुभव इत्यादि ग्रंथ वारंवार चर्चेचे विषय झाले आहेत. आणि एक नाथापासून आजपर्यंत अनेक लोक त्याविषयी मत व्यक्त करीत आहेत. एकनाथ, मुक्तेश्वर, वामन, तुकाराम, रामदास, ही सर्व मंडळी समकालीन व्यक्तींच्या व उत्तरकालीन समाजाच्या चर्चेचा विषय झालाच आहे. त्या चर्चा लक्षांत घेऊन त्यांनी काव्याभिज्ञता कशी दाखविली त्याची चर्चा पुढें येईलच. आजचें महाराष्ट्रीय वाङ्मय पूर्णपणे लोकाश्र- यानेंच वाढत आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. तथापि चांगले वाङ्मय पोसण्याइतकी जनता सुशिक्षित झाली आहे असें नाहीं, व लेख- काचा योगक्षेम जनतेवर चालेल अशी स्थिति आली नाहीं. नाटके पूर्णपणें लोकाश्रयावरच वाढत आहेत. चांगल्या नाटकांबद्दल ग्रंथकारानां तीन तीन हजार रुपये मिळतात असा कै. खरे शास्त्री आणि रा. खाडिलकर यांचा अनुभव आहे. तरी देखील ही प्राप्ति इतकी अल्प आहे कीं ग्रंथकाराचा योगक्षेम नाटके लिहिण्यावर २ काव्यपरक्षिक आणि जनता अजून चालणार नाहीं. कादंबऱ्यांवर प्राप्ती फारशी होत नाहीं. आणि कोणाहि कादंबरीकारास कादं- बरी लेखनापासून १० ००० रुपयाची प्राप्ति झाल्याचें उदाहरण नाहीं. आजचा लोकाश्रय आहे तो लेखकाचा ग्रंथ जगापुढे आणण्यास त्यास समर्थ करण्याइतपत आहे व फार झालें तर थोडासा मदतीच्या स्वरूपाचा मोबदला देखील ग्रंथकारास मिळेल. चांगली कादंबरी तयार झाल्यास ती निदान फुकट मागण्यास प्रकाशक धांवतील असा काळ आला आहे. पंचवीस वर्षांपूर्वी तसा हि काल नव्हता. चांगल्या कादंबरीचें प्रकाशन होणें त्यावेळेस हि दुरापास्त झालें होतें. तथापि पंचवीस वर्षापूर्वी लेखकांस कांहींच मिळत नव्हतें असें नाहीं. रा. बाळकृष्ण संतुराम गडकरी यांच्या " सुधारणेचा मध्यकाल" या कादंबरीस प्रकाशका- 'कडून अवघे १२५ रुपये मिळाले आणि वाईकर भटजी या कादंबरीच्या लेखकास फक्त ५० रुपये मिळाले. तितकेच रुपये "सती राणक देवी" या कादंबरीस मिळाले. पण जर गडकरी यांस १२५ रुपये देऊन त्यांची "सुधारणेचा मध्यकाल" ही कादंबरी प्रसिद्ध करण्यास कै. मित्र पुढे आले नसते, तर ती कादंबरी बाहेर पडली असती कीं नाहीं याविषयीं शंकाच आहे. लोकाश्रयामुळे वाङ्मय जगणार तर टीकाकार वर्गाचे महत्त्व आहे आणि टीकाकारांनी आपले काम प्रामाणिकपणानें केलें पाहिजे; व त्यानें तसें केलें नाहीं तर टीकाकारांचे कान उघडण्याची प्रवृत्ति समाजांत पाहिजे या गोष्टी ज्याप्रमाणें सांगितल्या त्याप्रमाणेंच ग्रंथकाराने टीकेकडे चांगलें लक्ष पुरविलें पाहिजे हेंहि सांगितलें पाहिजे. प्रत्येक कवीस किंवा कादंबरीकारास आपल्या ग्रंथावरील टीका लक्षपूर्वक पाहिल्याच पाहिजेत. आणि ज्या टीका प्रामाणिकपणें केल्या असतात त्या लक्षांत घेतल्या पाहिजेत; लोकमताविषयीं उपेक्षा करून कोणाचेहि चालावयाचें नाहीं.