पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण झालें तरी ज्ञानेश्वरी टिकली एवढेच नव्हे तर लोकांतील मान्यतेनें आणि त्यांत उत्पन्न झालेल्या भागवत संप्रदायामुळे ग्रंथ जिवंत रहाण्याची परंपरा कायम झाली. ८ महाराष्ट्रीय वाङ्मयाला राजांचा आश्रय असे याला कोणी हालाच्या सप्तशतीचें उदाहरण " देतील. पण त्यावरून कवींस राजाश्रय होता असें सिद्ध होणार नाहीं. कारण हालाची सप्तशती हा संग्रह आहे. त्या लावण्या लिहिणारे कवी निरनिराळ्या काळीं होऊन गेले. संग्रह राजानें करविला असेल पण त्यावरून कवींस राजाश्रय होता हैं सिद्ध होणार नाहीं. शातवाहन राजे हे जरी ब्राह्मण होते तरी पुढे त्यांचे लग्नव्यवहार इतर लोकांशी होऊन त्यांच्यामध्ये उच्च संस्काराचा लोपहि झाला असेल. महाराष्ट्रांतील राजे लोकांची संस्कृति उच्च दर्जाची कोठेच दिसत नाहीं. ज्याप्रमाणें तमाशास' उत्तेजन देणारा एखादा राजा महाराष्ट्रांत आजकालच्या दिवसांतहि दिसतो त्याप्रमाणेंच त्यावेळेस लावण्यांचा शोकी एखादा शातवाहन असला म्हणजे राजे लोकांची कविते - बद्दल अभिरुचेि दिसून आली असें नाहीं. तथापि ज्यानें जें केलें त्याबद्दल त्याला श्रेय दिलें पाहिजे म्हणून वाङ्मयाविषयीं उदासीन राजवर्गात हाल हा एक अपवाद होता असें म्हटलें पाहिजे. मराठी राज्यामध्ये शिवाजीच्या काळांत वाङ्म याला उत्तेजन मिळाले आणि संभाजीनें हेखील वाङ्मयास उत्तेजन दिलें होतें. तथापि एकंदरीत वाङ्मयास उत्तेजन देण्यांत मराठी राज्यांत औदा- सिन्यच आहे. शिवाजी व संभाजी यांनी देखील मराठी काव्यास उत्तेजन दिल्याचा पुरावा फारसा नाहीं. मराठी राज्य गेलें आणि सुधारलेले इंग्रज- सरकार आलें. त्या सरकारने मराठी भाषेच्या उत्तेजनास अनुकूल अशी स्थिति न ठेवतां मराठी भाषेस मारक अशीच परिस्थिति ठेवली आहे. एवंच मराठी वाङ्मय हैं जवळजवळ पूर्णपणें लोकाश्रयी आहे त्यामुळे या वाङ्मयास राजा- श्रयी वाङ्मयाचे घाणेरडे गुण लागले नाहींत. ज्याअर्थी हें वाङ्मय उत्तरोत्तर लोकाश्रयीच होत जाणार त्याअर्थी वाङ्मयाचे वाचक आणि उत्पा- दक यांच्यामध्ये असणारे जे परीक्षक त्यांच्या- वरील जबाबदारी अधिक वाढली आहे आणि यामुळे त्यांच्या प्रयत्नांची छाननी करणे या कालांत विशेष आवश्यक आहे. टीकाकारांत प्रामाणिकपणा आणि अभिज्ञता ही देखील वाढत गेली पाहिजेत. लोकांचें जें मत असतें तेंच मत टीकाका- रांच्या लेखांत अंशतः व्यक्त होतें. मात्र टीका प्रामाणिक असली पाहिजे. टीकाकाराचा हेतु ग्रंथाविषयीं आपलें खरें मत व्यक्त करण्याचा मात्र असला पाहिजे. तो विद्वान आणि अभिज्ञ नसला तरी प्रामाणिक पाहिजे. जो विद्वान नाहीं पण प्रामाणिक आहे त्याच्या टीकेचाहि उपयोग आहे. तशी टीका जनतेच्या मताची निदर्शक होते. पण टीकाकाराचा हेतु जेव्हां प्रामाणिक मत व्यक्त करण्याव्यतिरिक्त असतो तेव्हां मात्र तें टीकाकारांचें मत जनतेच्या मताचे- र्शक नसल्यामुळे निरुपयोगी होतें. अप्रामाणिक टीका अनेक रीतींनी दृष्टीस पडूं लागते. टीका- कार कधीं कधी हाताशी आलेल्या ग्रंथाची थट्टा करून वाचकांचे मनोरंजन कसें करावें या दृष्टीनें लिहू लागतो. असल्या टीकेबद्दल कानउघाडणी वारंवार झाली पाहिजे, व त्या प्रकारच्या टीकेस महत्त्व न देण्याचें लोकांस शिकविलें पाहिजे. लोकांस असल्या टीकाकारांसंबंधानें जागरूक केलें म्हणजे पुरे आहे. म्हणजे जनता केवळ उप- हासात्मक टीकेकडे लक्ष देणार नाहीं. जर विचा रास घेतलेला ग्रंथ चांगला असेल तर त्याच्या उपहासाच्या योगानें टीकाकाराचें लघुत्व मात्र नजरेस येतें; आणि जर तो चांगला नसेल तर