पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काव्यपरक्षिक आणि जनता लाड देवोनि शिक्षा कैसा तूझा अतां ही विरह सहन करी . ती महाराष्ट्र भाषा शिवाने विश्वासघाताने नानाला तुरुंगांत टाकलें, त्या ज्या धर्मस्वसेचे बहुत पुरव त्याबद्दल त्यानें नानालाच दोष दिला आहे. या प्रकारचें तुरळक उदाहरण सोडून दिले तर मराठी कवि सामान्यतः स्वतंत्रच असत असे दिसून येते. मराठी भाषेला राजाश्रय नाहीं ही स्थिति भवभू- तीच्या कालापासून आहे असें वाटतें. ज्ञानेश्वरा - नंतर हिंदुराज्य गेलें त्या वेळेस मराठी कवितेस मुसलमान राजांकडून आश्रय मिळाला नाहीं यांत नवल नाहीं. मराठी राज्यांत देखील ही कवींच्या उपेक्षेची स्थिति फारशी पालटली नव्हती. यावि- षयीं प्रसिद्ध मोगरे कवीनें विष्णुशास्त्री चिपळुण कर यांच्यावर लिहिलेल्या विलापिकेमध्यें जें श्लोक चतुष्टय घातलें आहे त्यांतील म्हणणें जरी अक्षरशः खरें नाहीं तरी तत्त्वतः खरें आहे. ते • श्लोक चतुष्टय येणें प्रमाणेंः नाहीं राजाश्रयाचा अनुभव अजुनी या ओळींतील मुख्य चुकीचें विधान आहे तें हें कीं, शृंगारादि नवरसांनी भाषेला मंडव - ण्याचें श्रेय जे विष्णुशास्त्र्यांस दिलें आहे तें चुकीचे आहे. वस्तुतः हें श्रेय त्यांच्याकडे नसून वामनादि कवींकडे आहे. लेश ज्या दुर्भगेला जीचा धि:कार बुध्या रसिक जन गण आजपर्यंत केला. भेणें जी पंडितांच्या बहुत दिवस जी नीच संगेचि राही शास्त्री ठेवू दिला न क्षणहि पद जिला सोवळ्या ब्राह्मणां जीला पाहुनिया निराश्रित अशी आश्वासिली वामनें मोरोपंतचि जीकडे वळवुनी घे पंडितांची मनें तात्यांनीं वरितां परत्र दिधलें वत्तातहस्तीं जिला होता वाटत जीस तातसमची तो कृष्णशास्त्री भला जीला शृंगारवीराद्यखिलनवरसां सादरें सेववोनी होतां कालानुसारें तरुण मग अलंकारुनी ग्रंथरत्नी जीला तूंचि स्वहस्तें रसिकजन गण योग्य अर्पावयाला जीच्या आम्ही वन्हाडी मुदित परिणया जाहलों यावयाला कोणी वैधव्य आलें म्हणति जन तुझ्या जीस देहावसान विष्णो तूझी परी जी म्हणवुनि भगिनी आपणां धन्य मानी मराठी वाङ्मय प्रारंभापासूनच लोकाश्रयी होतें. त्यास राजदरवाराचा फारसा स्पर्श झाला नाहीं आणि त्याचे परिणाम वाङ्मयाच्या स्वरूपा • वर दिसून येत आहेत. ज्ञानेश्वर देवगिरी राज- धानीपासून फार दूर होता. ज्ञानेश्वराची ख्याति देवगिरीला पोंचून त्याचा कदाचित् सत्कारहि झाला असता पण तसा काळच आला नाहीं. ज्ञानेश्वरनिंतर देवगिरीचें राज्यच लयास गेलें. ज्ञानेश्वराविषयी आदर बोपदेवाने आपल्या शुद्धि- पत्रांत व्यक्त केलाच आहे, (भिंगारकरकृत ज्ञाने- श्वर काल पहा ) आणि बोपदेव हा तर देवा - रांच्या दरबारांत वजनदार मनुष्य होता, व देवाग- रीचें राज्य टिकलें असतें तर ज्ञानेश्वराच्या आदर होऊन पुढे मराठी भाषेत झालेल्या ग्रंथां महत्त्व प्राप्त झालें असतें. देवगिरीच्या दरबारांत ग्रंथांची चहा अगदींच नव्हती असें नाहीं. चतुर्वर्ग- चिंतामणि या ग्रंथाचा विद्वान् कर्ता हेमाद्रि हा तर तेथें प्रधानच होता. आणि बोपदेव हा देखील ग्रंथकार होता. अशा सुशिक्षित राज्यांत मराठी ग्रंथांची प्रतिष्ठा वाढलीच असती. तथापि ज्ञाने- श्वरासारख्या मनुष्याला राजदरबारीं झालेल्या मानामुळे ग्रंथरचनेकडे प्रवृत्ति झाली असती असें नाहीं. मराठी राज्य जरी गेलें तरी ज्ञानेश्वरीमुळे मराठी ग्रंथरचनेचा संप्रदाय स्थापन झाला हे खचित. त्याच्या ग्रंथास राजेलोकांनी पुढे आणलें नसून लोकांनीच पुढे आणलें, व राज्य जरी नष्ट