पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण उच्च प्रकारचें वाङ्मय पाहिजे असेल त्यास दीर्घ - कालीन आशावादी बनले पाहिजे, या भावनांचा भवभूति फार जुना शिक्षक होय.. ६ जाईल. याशिवाय आपणांस अर्सेहि दिसून येईल की जें चांगलें होतें तेंच टिकलें, असा धोपट नियम केला तर त्यास थोडेच अपवाद आढळतील. दिवसानुदिवस संशोधक नवीन नवीन ग्रंथ शोधून काढीत आहेत. पण अव्वल इंग्रजीच्या कालांत जे ग्रंथ लोकांत प्रचलित होते तेच ग्रंथ अजूनहि लोकप्रिय आहेत आणि संशोधकांनी शोधून काढलेले ग्रंथ छापण्यास मारामार पडते. व छाप- ल्यास ते खपण्याची मारामार पडते. काव्यसंग्र- हाचे ग्रंथ छापावयास किती अडचण पडत होती तें निर्णयसागरने मधून मधून प्रसिद्ध केलेल्या कहाण्यावरून कळून येणार आहे. सामान्य वाचक आपलें परीक्षण घेऊन किंवा टाळून व्यक्त करीत आहे. प्रजासत्तात्मक राज्यांत जेव्हां " रेफरँडम " नें म्हणजे सर्व जनते पुढें कायदा ठेऊन कायद्यावर जनतेचें मत घेण्यांत येते, तेव्हां जनता "होय" किंवा "नाहीं" एवढेंच उत्तर देतें. आणि या रीतीनें अगदी एका शब्दांत आपला निकाल देऊन टाकते. नाटकें, सिनेमा, गाणी याविषयीं हाच नियम सांगतां येईल. जनता फार टीका करीत नाहीं, पण ग्रंथकाराचें भवि- तव्य निश्चयेंकरून ठरविते आणि ती त्याप्रमाणें भविष्यकालास आपला आदेश देऊन टाकते. जनतेच्या अभिज्ञतेवर महाराष्ट्राची भिस्त आहे आणि यासाठीं सुशिक्षित अभिरुचीचा जनतें प्रसार होणें अवश्य आहे. महाराष्ट्रीय वाङ्मय राजाश्रयानें वृद्धिंगत न होतां कवळ लोकाश्रयानें वृद्धिंगत व्हावयाचे, हा महारा- ष्ट्राल| कित्येकांच्या मतें शाप लागला आहे; किंवा माझ्यामतें महाराष्ट्राला हैं वरदान मिळाले आहे. त्याचा पहिला अनुभव महाकवि भवभूति यासच मिळाला आहे. अवभूति हा लोकाश्रयावर अव- लंबून रहाणारा कवि आणि त्याच्या वाङ्मयविष- यक उच्च ध्येयामुळे समकालीनांकडून गौरव होत नाहीं अशा कचाटीत सांपडला असतां देखील त्यानें संस्कृत भाषेला भूषणास्पद होतील अशीं तीन नाटके लिहिली हें लक्षांत ठेवलें पाहिजे. भवभूति हा बन्हाडचा, विदर्भदेश हा महाराष्ट्रांत सर्वात अगोदर सुधारलेला आणि तेथील राजा - वलि देखील फार जुनी, असें असतां त्यास राजा श्रय न मिळतां आपली नाटकें. जत्रांच्या ठिकाणीं प्रकट करावीं लागलीं. यावरून त्याची लोकां- कडून कांहीं तरी चहा होत असली पाहिजे. नाहीं तर जत्रांच्या ठिकाणीं त्यास आपली नाटकें दाख- विण्याची संधीच मिळाली नसती. शिवाय जर त्यास त्याच्या काळांतच चहाते मिळाले नसते तर त्याची नाटकें टिकलींहि नसती; पण तीं ज्या अर्थी टिकली आहेत त्याअर्थी जनतेस चांगलें वाङ्मय टिकविण्याइतकें बल आहे खचित. भव- भूतीनें लोकांची अनभिज्ञता पाहून जे उद्गार काढले आहेत त्यांचा अर्थ एवढाच कीं भव- भूतीची अवहेलना दरबारी. मंडळीकडून झाली असेल, विदर्भाच्या राजघराण्याने त्यास आश्रय दिला नसेल व राजाश्रयास असलेल्या इतर कवींनीं त्यास राजद्वारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला असेल. भवभूतीच्या कहाणी वरून त्याची लोकांत / च्या देवनाथ कवीचें आहे. हा शिंदे सरकारचे चहा नव्हती असा अर्थ निघत नाहीं. तेव्हां एकंदरीत ! तुकडे खात होता आणि नाना फडणिसाला शिव्या जनतेच्या अभिज्ञते विरुद्ध निकाल देण्यास जडच | देणारा एक हिंदींत पोवाडा त्यानें केला आहे. / /मराठी कवितेस दरबारचा आश्रय नाहीं आणि त्यामुळे दरबारी आश्रयाचे दुर्गुणहि तिला लागले नाहींत. राजांच्या खोट्या प्रशस्ती मराठीत नाहींत. जेव्हां दरबारचा आश्रय मराठी कवींना मिळाला तेव्हां त्यांची नीति बिघडून ते देखील खोटें लिहि- ण्यास कसे प्रवृत्त झाले याला उदाहरण बन्हाड-