पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाङ्मयाच्या क्षेत्रांत काम करणारे जे अनेक प्रकारचे लोक आहेत ते कांहीं विशिष्ट क्रिया करीत असतात. निरनिराळ्या क्रियांचा अन्योन्याश्रय आणि हेतु कांहीं अंशीं तत्कालीन क्रियांच्या अवलोकनाने दृष्टीस पडतो, तर कांहीं क्रियांची उपयुक्तता दीर्घकालानेंच दृष्टीस पडते. यासाठी समाजशास्त्रांत प्रत्येक कार्यसमुच्चयाचें आणि तदंतर्गत क्रियांचें दीर्घकालीन स्वरूप पहाण्याची पद्धति पडली आहे. टीकाकारांच्या प्रयत्नाचा परिणाम कांही अंशी तात्कालिन दिसून येतो तर कांहीं अंशीं दीर्घकालाने दिसून येतो. तसेंच असेंहि दिसून येतें कीं, कांहीं कृत्य कायमचा परि- णाम कोणताच घडवीत नाहीं. तर त्या तऱ्हेच्या कृत्याच्या निष्फलतेचीहि जाणीव झाली पाहिजे. समाजांत होणाऱ्या प्रत्येक क्रियेची कार्यप्रवी णता किंवा एफीशिअन्सी तपासीत बसण्यानें ती क्रिया अधिक कार्यप्रवण होण्यास मदत होते. टीकेची कार्यप्रवीणता बघावयाची म्हणजे निदान कांहीं तरी काळ जावा लागतोच व या दृष्टीनें टीकेविषयीं ऐतिहासिक विचार करण्याची आव- श्यकता उत्पन्न होतेच. वर्तमानपत्रे व मासिके यांतून टीका कर- ण्याची पद्धत सुरू झाल्यास जवळ जवळ दोन / पिढ्या झाल्या. या दोन पिढ्यांत अनुभवानें टोका कार काय शिकले आणि उत्तरकालीनांनी पूर्व- कालीनांपेक्षां काय प्रगति दाखविली हे पहाण्या जोगे आहे. काव्यपरीक्षकांची टीका जनतेच्या अभिज्ञतेची दर्शक आहे काय ? महाराष्ट्रीय अभिरुचीच्या इतिहासास काव्य - परीक्षकांच्या विवेचनाचे आणि अभिज्ञतेचे महत्त्व आहेच. तथापि जनतेची अभिज्ञता केवळ तेवढ्या - वरून काढतां येणार नाहीं, काव्यपरीक्षकांची अभिज्ञता ही वाचकवर्गाच्या किंवा श्रोतृवर्गाच्या आवडीनिवडीची कितपत दर्शक आहे हा प्रश्न 1. पं. थापना ५ काव्यपरीक्षकं आणि जनता उरतोच. ग्रंथांची लोकप्रियता केवळ मध्यस्थांच्या शिफारशीवर अवलंबून असते अशांतला भाग नाहीं. उच्च प्रतीच्या ग्रंथाची योग्यता जनतेस आपोआप समजते आणि परीक्षकांची शिफारस केवळ दुय्यमपणा पावते. जनतेतील सामान्य व्यक्ति स्वतः परीक्षण करून दुसन्यास कळविणारी असते. ग्रंथकारांमध्ये ईर्ष्या, असूया, द्वेष, इत्यादि भाव असतात हें जनता ओळखते, आणि जेव्हां उत्तम प्रकारच्या ग्रंथकारास इतर ग्रंथकार मत्सरानें छं लागतात तेव्हां जनता छळल्या जाणाऱ्याचे महत्त्व ताबडतोब ओळखते. याची उदाहरणे आपणांस आजच्या कालांत, तशींच प्राचीन काळांत देखील देतां येतील. तुकारामास वह्या बुडवावयास लाव- ण्याची क्रिया केवळ धंद्यांतील मत्सराची दर्शक आहे पण तीच गोष्ट तुकारामाच्या वाणीत कांहीं तरी नवें तेज आहे याची तत्कालीन लोकांत जाहि- रात करती झाली. जनतेच्या परीक्षणांत दोष असतात पण तेच दोष धंदेवाईक टीकाकारांच्या लेखांति असतात. जेव्हां अगदी अपरिचित प्रकारचे वाङ्मय डोळ्यासमोर येतें तेव्हां जनतेस त्या प्रकारच्या वाङ्मयाची आवड उत्पन्न झाली नसल्यामुळे जनता तिकडे प्रथम लक्ष देत नाहीं. तसेंच टीकालेख- कांस देखील त्याप्रकारच्या वाङ्मयाची अभिज्ञता उत्पन्न झाली नसल्यामुळे टीकाकार देखील त्या नवीन प्रकाराची निंदाच करतात. याप्रकारच्या गोष्टी आपणांस प्रत्येक देशाच्या वाङ्मयाच्या इति- हासांत दिसून येतात. उत्तम कवी असून त्याची समकालीनांत चहा झाली नाहीं अशामध्यें भव- भूति कवीचें नांव घेतां येईल. तथापि या कवीस उत्तरकाली जे महत्त्व मिळाळे त्यावरून समका- लीनांस रुचले नाही तरी हरकत नाहीं, आपले वाङ्मयविषयक ध्येय सोडू नये अशा तऱ्हेचा उपदेश हाच फूर्वि अजून सर्व भारतीय कस करीत आहे असे म्हणता येईल. जनता उदासीन असली तरी कवीनें निराशा होऊ नये; ज्यास 16 MAR 1990