पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण आवडतें तें तो पाठ करतो किंवा गातो आणि या रीतीनें तो आपली आवड व्यक्त करतो. अमुक एक काव्य लोकप्रिय कां झालें हें तत्त्ववेत्ता सांगा- वयाचा प्रयत्न करतो. पण तो जनतेच्या आवडी निवडीचें स्पष्टीकरण करतो. आपल्या पूर्वजांनी जुन्या कवींविषयीं ज्या आवडी व्यक्त केल्या त्यांच्या आवडीच्या अवलो- कनापलीकडे आपण आज बरेच गेलों आहों व थोडीशी विवेचक शक्तीहि खर्च केली आहे. तथापि पूर्वीच्या लोकमतांत महत्त्वाचा बदल झाला आहे असे वाटत नाहीं. 'सुश्लोक वामनाचा अभंग वाणी प्रसिद्ध तुकयाची ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंताची ॥ असें प्रल्हाद बडव्याप्रमाणें आजचा वाचक देखील म्हणेल. महाराष्ट्रीयांच्या काव्याभिज्ञतेचा इतिहास द्याव- याचा म्हणजे दोन गोष्टी करावयाच्या काव्य- विषयक जी सामान्य चर्चा निरनिराळ्या ग्रंथका- रांनी केली असेल तिचें स्वरूप दाखवावयाचें. आणि त्याप्रमाणेंच विशिष्ट कवि घेऊन त्याच्या काव्याची अभिज्ञता समकालीनांनीं व उत्तर- कालीनांनी कशी दाखविली हें दाखवावयाचे. चालू समाज जेव्हां अभिज्ञता दाखवितो तेव्हां ती अभिज्ञता त्या काळांतीलच तरुणांच्या मना- वर परिणाम करून वाड्मयाच्या पुढील प्रवाहाचें स्वरूप ठरविते. उलटपक्षीं जें वाङ्मय उत्पन्न होतें त्याच्या ग्रहणानें कांहीं अंशी समकाली- नांची व बऱ्याच अंशीं उत्तरकालीनांची अभि- रुचि बनते. एवंच काव्याची अभिज्ञता, आणि उत्पादन या गोष्टी स्परस्परांवर परिणाम करणाऱ्या आहेत. बाङ्मयाचा इतिहास लिहितांना जें वाङ्मय उत्पन्न झालें त्याच्याकडेसच लोकांचें लक्ष वेधतें आणि वाङ्मयेतिहासांत निरनिराळ्या काळांतील वाङ्मयाचें स्वरूप पाहून आजचा लेखक अभिप्राय देतो. तथापि प्रत्येक काळांत ४ लोकमत होतें आणि तें परिणामकारी होतें आणि भावी वाड्मयाच्या स्वरूपाचें कांहीं अंशीं निर्णा- यक होते ही गोष्ट प्राधान्यानें पुढे आणण्यासाठी लोकांच्या अभिज्ञतेचाच इतिहास निराळा काढून मांडल्यास एकंदर वाङ्मयाच्या इतिहासास मदत केल्यासारखेंच होईल. एवढेच नव्हें तर ज्या बाजूकडे पुष्कळ लोकांचें लक्ष जात नाहीं ती बाजू चवाठ्यावर मांडल्यासारखेच होईल. काव्याभिज्ञता दोन तऱ्हेने व्यक्त होते: लोक जेव्हां काव्यविषयक तात्त्विक चर्चा करतात तेव्हां आपलीं मतें प्रदर्शित करतात, व त्याप्रमाणेंच दुसऱ्या एखाद्या कवीवर मत देतात तेव्हां ती प्रदर्शित करतात. या दोन्हीं तन्हांनी महाराष्ट्रीय अभिरुचीचा इतिहास देता येण्याजोगा आहे. "कवित्व हें नोहे टांकसाळी नाणें" असें जेव्हां तुकाराम वदतो तेव्हां तो काव्यविषयक निरपेक्ष विचार व्यक्त करतो. तसेंच “ज्ञानेश्वरी पाठीं । जो वोवी घालील महाटी । तेणें अमृताचे ताटीं । जाण नरोटी ठेवली " असें जेव्हां एकनाथ सांगतो तेव्हां तो कविते- विषयीं सापेक्ष मत व्यक्त करतो. आपणांस या दोन्ही प्रकारचें साहित्य जमा करून महाराष्ट्राच्या काव्यविषयक सापेक्ष अभिरुचीचा आणि निर- पेक्ष कल्पनांचा इतिहास द्यावयाचा आहे. पण हें विधान देखील थोडेसें नियमित केलें पाहिजे, अभिरुचीचा इतिहास द्यावयाचा म्हणून सांगितलें तेथें एकंदर अभिरुचीचा इतिहास द्यावयाचा विचार नाहीं. तर अभिरुचीच्या इति- हासाचें जें अंगाचाच इतिहास प्राधान्याने द्यावायाचा आहे. एक अंग काव्यपरीक्षण हें आहे त्या हा इतिहास देण्याजोगा विषय आहे किंवा नाहीं याविषयी शंका बाळगण्याचे कारण नाहीं. समा- जांतील प्रत्येक क्रिया तत्त्वज्ञानाच्या विचाराचा विषय झाली पाहिजे आणि तत्त्वज्ञांनी विचार करतांना त्या क्रियेचें दीर्घकालीन स्वरूप अवलो- किलें पाहिजे.