पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काव्यपरीक्षक आणि जनता आणि त्यांत कांहीं विकास झाला असेल तर अभिज्ञता देखील ताबडतोब होत नाहीं. ती व्यक्त तोहि शोधून काढला पाहिजे. प्रकरण २ रे. काव्यपरीक्षक आणि जनता जनता हें काव्याचें शेंबटचें न्यायासन आहे. आणि काव्यपरीक्षक हे मधले न्यायासन आहे. ज्याप्रमाणे शेवटचें न्यायासन पुष्कळदां खालच्या कोर्टाचा निकाल कायम करते व कांहीं प्रसंगी अगदीं फिरवून टाकतें त्याप्रकारची स्थिति वाङ्मय क्षेत्रांतहि आहे. किंबहुना अशीहि उपमा देतां येईल कीं काव्याचा विरुद्ध परीक्षक हा वादी आहे आणि ग्रंथकार हा प्रतिवादी आहे, आणि काव्या- कडे अनुकूल वृत्तीनें पाहून त्याचें परीक्षण करणारे टीकाकार हे प्रतिवादांचे वकील आहेत. व काव्या- विरुद्ध खटला जनतेच्या दरबारांत अनेक वर्षे चालत राहून त्याचा निकाल होतो, आणि तो देखील न कळत होतो. जनता एकच निकाल. देते आणि तो म्हटला म्हणजे काव्य जिवंत रहा णार कीं मरणार याविषयींचा असतो. ज्याप्रमाणे खालच्या कोर्टाचा निकाल व विरुद्ध किंवा तर्फेच्या वकीलांचीं बोलणीं हीं अंतिम न्यायाधिशाचें मत बनविण्यास उपयोगी पडतात, त्याप्रमाणेंच काव्य परीक्षकवर्गाचें म्हणणें जनतेस आपला निर्णय ठरविण्यास उपयोगी पडते. आणि या दृष्टीनें टीकाकारांच्या वाङ्मयाचें महत्त्व आहे. ज्याप्रमाणें बेडेवांकडे आणि चुकांनी भरलेले भाषण करूं नये म्हणून वकीलांच्या भाषणांवर कोर्टाची टेरे- ळणी असते त्याप्रमाणे दीर्घकालानें निकाल देणारी जी जनता तिच्या तर्फेनें टीकाकारांच्या वाङ्म यावरहि विचार झाला पाहिजे. चांगल्या टीकेची प्रशंसा व अप्रामाणिक टीकेची निर्भत्सना हीं जर समाजांत नसतील तर टीकाकार हे अगदीं बेज- बाबदार होतील प्रामाणिक व मार्मिक टीकेबद्दल होण्यासाठी देखील काळ लोटावा लागतो. वाङ्म- यपरीक्षणाचे इतिहास यासाठींच उपयोगी पडतात. काव्यपरीक्षणाच्या इतिहासाचें दुसरें एक महत्त्व आहे. तें म्हटलें म्हणजे टीकाकारलेखकास त्याचें कार्य काय आहे तें समजून यावें. मार्मिक,) जबाबदार आणि दूरदृष्टि टीकाकारास आण टीका करतांना वाङ्मयाच्या विशिष्ट विकासास मदत करीत आहों की अपकर्ष करीत आहों याची कल्पना असणें अवश्य आहे. काव्यपरीक्षण कोणत्या बाजूंनी चालू आहे, कोणत्या बाजूंनी चालू नाहीं हैं टीकाकारास समजलें पाहिजे. काव्यपरीक्षणाचा व अभिरुचीचा स्थूल इतिहास टीकाकारास ठाऊक असला म्हणजे त्याची टीका देखील उत्तरोत्तर अधिक सुशिक्षित होत जाईल. :: महाराष्ट्रीय काव्यपरीक्षणाच्या इतिहासांत आप- णांस कांहीं विकास दृष्टीस पडतो. मुद्रणकलेच्या काळापूर्वी टीकालेखन फारच संक्षिप्तप्रकारें होई तर मुद्रणकलेच्या आगमनानंतरच्या काळांत विस्तृत होऊं लागलें. तथापि पूर्वपरंपरेची छाप एकाएकी सुटली नाहीं. टीकाकारांची वृत्ति पूर्वी काय होती व ती बदलत कशी गेली हें देखील पहाणें एक तन्हेचा इतिहास दाखवील आणि तो इतिहास महाराष्ट्रांतील वाङ्मयेतिहासाचा किंवा बौद्धिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग होईल. मराठी काव्याचें परीक्षण करण्याची पद्धति, ब्रिटिश राज्यानंतर जेव्हां निबंध लिहिण्याची पद्धत सुरू झाली तेव्हांपासूनच उत्पन्न झाली असे म्हणतां येणार नाहीं. त्या पूर्वीच्या काळांत देखील लोकांनां मतें होतीं. व तीं मतें ते व्यक्त करीत असत. त्या मतांचे विवरण मात्र करण्यांत येत नसे. ज्याप्रमाणे जेवणारा मनुष्य कोणाचा स्वयंपाक चांगला हें सांगूं शकतो पण तो स्वयंपाक चांगला कां हें त्याला सांगतां येणार नाहीं त्याप्रमाणेच काव्याचें आहे. ज्याला जें काव्य