पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरक्षिण पण साहित्यशास्त्रकारांची ही प्राकृत वाङ्म- याकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ति बरोबर नव्हती. कारण या वृत्तीने त्यांनीं आपल्या ग्रंथाची वाढ खुंटविली असेच म्हणावे लागेल. ज्ञानेश्वरीसारख्या वेदांत ग्रंथाला काव्य या सदरांत घालतां येत नाहीं म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलें तर त्यांत त्यांचा दोष नाहीं. तथापि "पृथ्वीराज रासा " "अहखंड" वगैरे हिंदी ग्रंथांचा तरी त्यांनीं विचार करणें अवश्य होतें. त्यांनी त्यावेळेसच जर विचार केला असता तर आतांपर्यंत भार तीय साहित्यशास्त्राला निराळे वळण लागून गेलें असतें.

लोकांची आवडनिवड, कवीची कृति आणि साहित्यशास्त्र यांचा अन्योन्यसंबंध कसा काय असतो याविषयीं अगोदर थोडेसें लिहिलें पाहिजे. साहित्यशास्त्र हें वाढतें शास्त्र आहे. नवें वाङ्मय उत्पन्न होतें तसतशी त्यावर लोकांची आवड निवड व्यक्त होते आणि ती आवडनिवड नियम उत्पन्न करून शास्त्र वृद्धिंगत करते.

साहित्यशास्त्राचे नियम तयार झाले म्हणजे काव्यपरीक्षक त्या नियमांप्रमाणें कवि चालला आहे किंवा नाहीं हें पाहूं लागतात. काव्यपरीक्ष- कांच्या या प्रकारच्या टीकेमुळे कित्येक लेखक भितात तर कित्येक दांडगाई करून पुढे जातात. ते असें समजतात कीं, साहित्याचे नियम सूचक किंवा मार्गदर्शक आहेत, त्यांचें दास्य उपयोगी नाहीं; ज्याअर्थी साहित्यशास्त्र हैं लोकांच्या आवडी- निवडीचें शास्त्र आहे त्याअर्थी लोकांची आवड- निवड ही प्रधान आहे आणि साहित्यशास्त्राचे जमा झालेले नियम अप्रधान होत. लोकांची व्यक्त झालेली आवडनिवड नियम शोधूं पहा- णाऱ्या तत्त्ववेत्त्यांच्या साहित्यशास्त्राच्या घटनेस मदत करते. हें तत्त्व ओळखून धैर्यवान् कवि आपली कृति साहित्याचे नियमं झुगारून प्रत्यक्ष जनतेपुढे नेली पाहिजे आणि तीवर प्रत्यक्ष जन- तेचें मत घेतलें पाहिजे, हें ओळखतात. या प्रा- रचे कवी काव्यौघास निराळें वळण देतात एव- ढ़ेंच नव्हे तर साहित्यशास्त्राचीहि सुधारणा कर- तात. लोकांची आवडनिवड निर्दोष असते असें नाहीं, पण ती समजून घेतली पाहिजे. उत्तम कलेचा कवि देखील प्रथम लोकांनां अप्रिय असणे शक्य आहे; पण कवि चांगला असला तर त्याच्याशी जनतेचा विरोध फार दिवस रहात नाहीं. उत्तम कवि आपली आवड लोकांच्या मनांत स्थापन करील. कवीच्या अभिरुचीप्रमाणे लोकाभिरुचि तयार होणं शक्य आहे, ही गोष्ट दूरदर्शी कवि समजून असतो. लोकांच्या आवडीनिवडीचें परीक्षण करणें व ती आवड जाणून लिहिणे ही क्रिया प्रत्येक लेखक करीत असतो. जो लेखक आपण असें करी नाहीं असें म्हणतो, तो एक तर आपण काय करीत आहों याविषयीं अज्ञानी असला पाहिजे, किंवा आपल्या स्वतंत्र वृत्तीविषयीं खोटी बढाई मारणारा असला पाहिजे. लोकांच्या आवडीनिवडी कांहीं अंशी प्रत्यक्ष ग्रंथांच्या वाचनानें उत्पन्न झालेल्या असतात, तर कांहीं अंशीं पूर्वग्रंथावर व्यक्त झालेल्या मतांमुळेच उत्पन्न झालेल्या असतात. त्या व्यक्त झालेल्या मतांचा परिणाम उत्तरकालीन अभिरुचीवर घडतो. हैं लक्षांत घेऊन टीकावाङ्मय लोकाभिरुचीचें निर्णायक कितपत झालें हें आपणास पाहिलें पाहिजे. अभिरुचीचा आपण इतिहास लिहूं लागलों तर काव्यपरीक्षणाचा इतिहास हा लोकाभिरुचीच्या इतिहासाचा भाग होईल. व अभिरुचीचा इति- हास हा वाङ्मयेतिहासाचा भाग होईल. वाड्म याचा इतिहास अभिरुचीच्या इतिहासावांचून समजावयाचा नाहीं. आणि यासाठी लोकांची काव्यविषयक मतें निरनिराळ्या काळीं कशीं व्यक्त झाली व बदलत गेलीं हैं पाहिलें पाहिजे.