पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मो. नं. वाचनाहर महाराष्ट्रीयांचें काव्यपरीक्षण लेखक - डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर प्रकरण १ लें. प्रास्ताविक प्रत्येक कृति उत्पन्न होते तेव्हांपासूनच तिचें परीक्षण लोकांकडून होऊं लागतें. तें परीक्षण शब्दांनीं नेहेमीं व्यक्त होतें असेंहि नाहीं. तें परी- क्षण अगर मत शब्दांनीं जरी व्यक्त झालें नाहीं तरी तें कृतीनें व्यक्त होते.लढवय्ये - मुत्सद्दी यांनां हा नियम जसा लागू आहे तसाच तो कवींनांहि लागू आहे. मराठी कविता जितकी जुनी आहे तितकेंच तिचें परीक्षणहि जुनें आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं. मराठी कवितेचा जर इतिहास लिहावयास पाहिजे तर ल्याबरोबर तिच्याबरोबर जन्मास आलेल्या परीक्षणाचाहि इतिहास लिहिला पाहिजे; किंबहुना कवितापरीक्षणाच्या इतिहासाशिवाय कवितेचाहि इतिहास अपूर्ण होईल असें म्हटलें तरी चालेल. काव्यपरीक्षणाच्या इतिहासाचे वाङ्मयेोतहा - हासांत जसें महत्त्व आहे तसेंच त्याचें साहित्य- शास्त्राच्या इतिहासांत महत्त्व आहे. संस्कृतामध्यें जें साहित्यशास्त्र झालें, तें लक्षांत घेऊन जुनें मराठी वाङ्मय उत्पन्न झालेलें नाहीं. संस्कृत साहित्यशास्त्रावरील अनेक ग्रंथ प्रचलित देशी भाषांतील वाङ्मयाचा बराच विकास झाल्यानंतर झाले आहेत उदाहरणार्थ; जगन्नाथरायाचा रस- गंगाधर हा ग्रंथ तर अत्यंत अर्वाचीन होय. हा ग्रंथ तयार झाला होता तेव्हां हिंदी, मराठी, गुज- राती, बंगाली इत्यादि भाषांत वाङ्मयहि पुष्कळ तयार झालें हातें. पण संस्कृत साहित्य - शास्त्रा- वरील ग्रंथकारांनी या नव्या वाढीकडे मुळींच लक्ष दिलें नाहीं. नवीन प्रकारच्या ग्रंथांकडे लक्ष देऊन जे कांहीं तात्त्विक नियम निघतील त्या नियमांचा अंतर्भाव जुन्या साहित्यशास्त्रांत कर- ण्याची क्रिया अजूनहि झाली नाहीं. या नवीन विकासाकडे कोणत्या दृष्टीनें पहावें हें देखील संस्कृत साहित्यकारांस समजले नसावें असें दिसतें. अर्वाचीन काळच्या वाङ्मयपंडितास जुन्या साहित्यशास्त्रास अर्वाचीनत्व आणणें हें एक मह त्त्वाचें अभ्यासक्षेत्र आहे. नवीन वाङ्मयावर तत्कालीनांकडून विचार झाला नाहीं असें नाहीं. पण त्या विचाराचैहि महत्त्व संस्कृत साहित्यशास्त्रकारांस नव्हतें. त्यास कारणें अनेक आहेत. या नवीन उत्पन्न होणाऱ्या वाप याला एक तर काव्य म्हणण्याची इच्छा नव्हती; किंवा प्राकृतांचे वाङ्मय, आणि त्यावर प्राकृ- तांची टीका, हीं विचारांत काय घ्यावयाचीं अशा- प्रकारची वृत्ति संस्कृत साहित्यशास्त्राच्या ग्रंथका- रांत असावी.