पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आग लावली ती निरुपायाने लावली असावी असे मला वाटते. त्यांनी त्यावेळेस जे उद्गार काढले ते त्यांच्या मनःप्रवृत्तीचे व्यंजक होते कीं आपल्या करण्याचें आग्रहानें कसें तरी समर्थन करावे म्हणून होते हैं समजत नाहीं. प्रकरण २० के. उपसंहार मराठी संतकवी हे संस्कृत कवींच्या परंपरें- तील नसून निराळ्याच परंपरेतील आहेत, मरा- ठींत जे लोक लिहीत त्यांस आपले मराठीत लिहि- ण्याचे समर्थन करावें लागे, आणि मराठीत लेख- नाचे समर्थन करण्याची परंपरा स्थापन करण्या- साठी मराठी लेखकांस जो अट्टहास करावा लागला तो या ऐतिहासिक अवलोकनांत अगोदर दिला आहे. एक कवि दुसऱ्या मान्य कवीच्या कवित्वावर मत देत नसे; तसें करणें म्हणजे एक तऱ्हेचा उद्धटपणा करण्यासारखें आहे असें त्यांस वाटत असावें. ज्या कवींविषयीं त्यांना आदर वाटत असे त्यांचे ते अनुकरण करीत, त्यांच्या प्रशस्ती लिहीत किंवा त्यांच्या कवितेचें संस्कृतमध्ये भाषां- तर करीत. सामान्य लोक आवडत्या कवीची कविता पाठ करीत व नक्कल करून घरीं नेत. या तन्हांनी ते अभिज्ञता व्यक्त करीत असत. उत्तरकालीन कवी पूर्व कवींचीं चरित्रहि लिहीत. ते संतकवींकडे संत या दृष्टीने पहात, व त्यांनी त्यांचीं चरित्रे ते संत आहेत या दृष्टीनेच लिहिलीं आहेत. कांहीं संतचरित्रांत प्रसंगांचे स्पष्टीकरण करण्यासाठीँ कवीच्या काव्यांतून अवतरणें देखील घेतली आहेत. मराठी संतकवींसंबंधानें अभिज्ञता उत्तरकालीनांनी त्यांच्या ग्रंथांची संस्कृत रूपांतरें करून व्यक्त केली तर संस्कृत कवींच्या ग्रंथांची मराठीत रूपांतरे करतांना भाषांतरकारांनी जे फरक केले, त्यांवरून संस्कृत कवींच्या काव्यांतील निरनिराळ्या भागांविषयीं प्रमाणयुक्त गुणग्राहकता त्यांनी व्यक्त केली. मराठी कवींनीं आपल्या पूर्वगामीची चरित्रे इतकी लिहिली आहेत की तें एक त-हेचे स्वतंत्र वाड्मय बनले आहे. त्याचा १२७ उपसंहार विस्तार किती आहे तो एका प्रकरणांत दाखवि- लाच आहे. पूर्वगामींचें चरित्र लिहिणें किंवा चरित्र- साहित्य रक्षून ठेवणे या बाबतीत मराठी वाङ्मय संस्कृत वाङ्मयापेक्षां उच्चता दाखवितें. थोड- क्यांत असें सांगतां येईल की बहुतेक संतकवीं- मध्ये पूर्वगामीच्या कृतीविषयी आदर व्यक्त कर- ण्याची पद्धति होती व ते आदर दाखविण्या- साठी व्यक्ती निवडीत देखील होते. पण पूर्व- गामींच्या काव्याचें पृथक्करण करून गुणावगु- णांचे परीक्षण करण्याची पद्धति नव्हती. तसें जर कोणी केलें असतें तर इतर संतकवींनीं त्यांस नास्तिक, संताविषयी आदर नसलेला अशा तन्हे- नेंच त्याचें वर्गीकरण खास केलें असतें. एवंच व्यक्तीवर केलेल्या श्रद्धेच्या मागणीमुळे परीक्षण- परता दुर्बल झाली होती.. संतकवींस आपल्या वैशिष्ट्याविषयी जाणीव होती, आणि आपण ईश्वरी कृपेमुळे प्रेरणेमुळे (व शिवराम कवि तर ईश्वराच्या बलात्कारामुळे) बोलत आहों अशी वृत्ति दाखवीत. हा प्रयत्न कांहीं अंशी आपल्यावरील परीक्षण चुकविण्यासाठीं होत असावा असें पुष्कळदां वाटू लागतें. दुसऱ्याचे पररीक्षण करणें उद्धटपणा होईल म्हणून त्या पापाला जरी कवी भीत होते तरी ते आत्मप्रशंसा करण्यास तितके भीत नव्हते असें दिसून येते. तथापि हें आत्मग्रंथावलोकन आत्म- परीक्षणरूपी झालेलें नाहीं. त्यांच्यामध्ये आपल्या स्वतःच्या काव्यावर अभिप्राय व्यक्त करण्याची पद्धति होती ती सर्व प्रसंगी विनयपूर्ण होती असें नाहीं. व आत्मश्लाघा करून ते थांबत असें नाहीं. आत्मस्तुति व परनिंदा यांचा संपर्क तुका- रामासारख्यासहि झाला आहे. मत्सर उत्पन्न झाला म्हणजे श्रद्धेचा अभाव सिद्धच झाला. व अशा प्रसंगी परीक्षणपरता वाढावी पण ती क्रिया देखील फारशी झाली नाहीं. मत्सराने जेव्हां तुकाराम प्रेरित होतो तेव्हां तो "लोकमान्य'ता मिळवू पहाणाऱ्या खोटें कवित्व करणाऱ्या कवीस रौरवनरकांत पाठ- वीत आहे. यावरून तुकारामाच्या अंगीं मत्सरामुळें प्ररीक्षक बनलेल्या व्यक्तीच्या भावना दिसत होत्या पण सुशिक्षिततेच्या अभावामुळे तो मत्सर