पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण माधवराव यांचे थोरले बंधु ) यांनी मी त्यांच्या कडे पाहुणा असतां मला सांगितलें होतें. व यानीं असेंहि सांगितलें होतें कीं, तुम्ही तुमचे आजोबा उतरले होते त्याच घरांत उतरला आहांत. व्ही. पी. मल्हारीराव यांनीं हें घर मागाहून घेतलें. तें घर तंजावर इस्टेटीच्या मालकीचें असतां त्या घरांतच आजोबा उतरले होते. तथापि तेवढ्या- वरून त्यांचा तंजावरांत येण्याचा हेतु बंडाची उठावणी करण्याचा होता, असे मात्र निश्चयाने सांगवत नाहीं. असो, इ. स. १८५८ - १९ साली जेव्हां ते घरी आले. त्यानंतर त्यांनी शिळाप्रसवर पुस्तकें छापून घेऊन तीं विकण्याचे काम सुरू केले. त्या वेळेची कांहीं छापलेली पुस्तकें आमच्या घरांत होतीं, व त्यावर गोविंद रघुनाथ केतकर हें नांव होतें. छापखान्याचें नांव आठवत नाहीं, पण ज्ञानसागर असावें, असें वाटतें. गीतगोविं दाच्या दीडशेच प्रती काढीत असे कळते. यांच्या ऑफिसमध्ये कै. माधव चन्द्रोबा हे कारकून म्हणून प्रथम आले व पुढे ते कांहीं दिवसांनीं भागीदार झाले. कांही दिवसांनीं माधव चन्द्रोबां- नींच एकंदर सर्व धंदा विकत घेतला. येणेप्रमाणे मुद्रणपूर्वप्रकाशन व मुद्रणोत्तर प्रकाशन यांच्या संधिकालांतील या धंद्यांतील एका व्यक्तीचें चरित्र देता येईल. दुसन्या ठिकाणाहून मिळणाऱ्या माहि- तीशी ताडून पाहण्याच्या उद्देशाने कै. माध्त्र चन्द्रोबा यांचे चिरंजीव कै. वामन माधव डुकले प्रोप्रायटर प्रभाकर ब्रदर्स फोर्ट यांस माधव चन्द्रो बाच्या पूर्ववृत्तांताच्या माहितीबद्दल विचारले परंतु वामनरावानी आपणांस कांहींच माहिती नसल्याचे सांगितलें; त्यांनी याशिवाय असे सांगि- तलें कीं, “आमचे वडील वारले त्यावेळेस मी दहा वर्षांचा होतों, व आमच्या वडिलांच्या हातचें एक पोस्टकार्डहि मी पाहिलें नाहीं. किंवा फोटोहि मजपाशीं नाहीं" असो. आमच्या घरच्या ग्रंथसंग्रहाची थोडीशी हकी- कत देतों- आमच्या आजोबांचा संग्रह मोठा होता आणि ते वारल्यानंतर जितकीं पुस्तकें लोकांनां देतां आलीं तितकी दिली. लोकांनी रामायण व १९६ महाभारत असलेच ग्रंथ घेतले त्यामुळे आमच्या घरीं. अप्रसिद्ध कवींचेच ग्रंथ राहिले. हा ग्रंथसंग्रह आमच्या वडिलांच्या हाती आला, व तो दहापंधरा पेटारे तरी होता. त्यांतील दोन पेटारे मी पाहि- लेले आहेत. त्यांच्या आंतून बुरुडी काम असे आणि बाहेरून ते कातड्याने मढविलेले असत. व त्यांची लांबी साधारणपणे ५ फूट रुंदी ३ फूट व उंची अडीच फूट असे. माझ्या वडिलांनी एके दिवशीं त्या पेटान्यांतील हस्तलिखितें काढलीं व सुमारे २ पेटारे भरून हस्तलिखितें ठेविली आणि उरलेल्या सर्व हस्तलिखितांस आग लावून दिली असें ऐकतो. ऐकली म्हणण्याचे कारण ही क्रिया माझ्या जन्माच्या पूर्वी झाली होती. त्यावेळेस त्यांच्या या कृत्याबद्दल त्यांस लोकांनी दोष दिला, तेव्हां त्यांनी असें उत्तर दिलें कीं या सर्व पुस्तकांची हावर्डच्या इंग्रजी पहिल्या पुस्तका - इतकी देखील किंमत नाहीं. यानंतर जे दोन पेटारे मीं अमेरिकेस असता आणि आमचे बंधु अनेक ठिकाणी नोकरीनिमित्त फिरत असतां एका खोलीत अनेक वर्षे पडले होते त्यांनां पावसाळ्यांत वाळवी लागून ते पेटारे वाळवीच्या भक्ष्यस्थानी पडले. या पेटान्यांत शिवरामस्वामींची एकादशस्कंधावरील टीका होती व शिवाय स्वामींचे दुसरे अनेक ग्रंथ होते. त्यांच्या वर्णनावर मी जो एक लेख २८ वर्षापूर्वी ( हायस्कुलांत असतांच ) लिहिला त्याचा उल्लेख मागे केलाच आहे. आमच्या वडिलांच्या वर सांगितलेल्या कृत्या- बद्दल त्यांस आमच्या कुटुंबांतल्या पुष्कळ मंड- घेण्याचे काम मात्र पत्करावयास कोणीच पुढें ळींनी दोष दिला. तथापि पुस्तकांची काळजी आलें नाहीं. हे पेटारे नोकरीत असतां बरोबर घेऊन हिंडणें आमच्या वडिलांस शक्य नव्हतें आणि त्यावेळेस रेलवेचाहि प्रसार चोहोंकडे झाला नव्हता. व जेथें वडील जात तेथे ते पेटारे ठेवण्यास जागा नव्हती. व ग्रंथ कोणास दिले तर ते घेण्यास तयार अशा संस्थाहि नव्हत्या व यावरून आमच्या वडिलांनी जी ग्रंथसंभारास