पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण १२८ झांकून तत्त्वें पुढें सारून तत्त्वासाठीं दुसऱ्याची कविता गौण ठरविणारा टीकाकार तुकाराम बनूं शकला नाहीं. तुकाराम मत्सराने जेव्हां प्रेरित झाला तेव्हां तो सामान्य खेडवळाप्रमाणे शिव्या देणारा आणि दुर्बल विधवेसारखी बोटे मोड- णारा टीकाकार बनला. परीक्षण करण्यासाठीं जें मानसिक स्वातंत्र्य अवश्य लागतें तें मानसिक स्वातंत्र्य संप्रदायबद्ध संतकवींनां नव्हतें, आपल्या संप्रदायांतील पूर्व- गामीची स्तुति करावयाची एवढेच कर्तव्य त्यांच्या पुढें होतें. या विशिष्ट स्थितीमुळे काव्यग्रहण, भाषांतर, संपादन इत्यादि क्रिया करतांना जे परीक्षण उत्पन्न होते तेवढेच इंग्रजीपूर्वीच्या मराठी ग्रंथांत आलें आहे. वैरुद्धयाची भावना देखील खोल परीक्षण करण्याइतपत वाढली नाहीं. मराठी व संस्कृत ही दोन्ही महाराष्ट्राची वाङ्मयें होती आणि अभिमानामुळे एका वर्गानें दुसऱ्यावर शिंतोडे उडविले पण काव्यपरीक्षण केले नाहीं. संस्कृत कवींनीं प्राकृत ग्रंथकारांस माकडे म्हणावें आणि प्राकृत ग्रंथकारांनी पूर्वीच्या एका प्राकृत ग्रंथ- काराने पांडित्याभिमानी संस्कृत ग्रंथकाराचे गर्व हरण दैवी चमत्काराने कसे झाले तें दाखवावें, इतपतच दोघांच्या एकमेकांच्या कृतीकडे व वृत्ती कडे अवलोकन करण्याच्या मर्यादा होत्या. मराठी गाण्यांकडे संगीतरत्नाकरकाराचे संगीत म्हणून लक्ष ओढले. पण ती परंपरा पूर्वीपासूनच होती. लौकिक संगीत आणि सामसंगीत या दोन्ही संगीतशाखा एकमेकांपासून स्वतंत्रपणे वाढत होत्या आणि संगीतरत्नाकरकाराने त्या बाबतीत पूर्वकालीन ग्रंथकारांचे अनुकरण केलें. या पुस्तकांत अप्रत्यक्षमतव्यक्तीचे व परी- क्षणाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांनी मराठी वाङ्मयांत जे काव्यपरीक्षण किंवा ग्रंथपरीक्षण झाले त्यामध्यें ग्रहण, अनुकरण, व विस्तरण हे मुख्य होत. ग्रहणाच्याच पठण आणि संपादन या शाखा आहेत. पठण करतांना पाठभेद उत्पन्न होतात. हे पाठभेद पुष्कळदां सहेतुक असतात. कारण कांहीं पाठभेद मूलग्रंथ अधिक चांगला करण्याच्या हेतूनें उत्पन्न होतात. जर आपणांस एखाद्या कवीचा अस्सल स्वहस्तलिखित ग्रंथ आणि अनेक नकला ही मिळतील तर प्रत्येक पाठभेदांतील हेतु आपणांस काढतां येईल. मूल अक्षर न समजल्यामुळे किंवा कारकुनी चुकीमुळे उत्पन्न झालेले पाठभेद निराळे आणि जो ग्रंथ एखाद्या संपादकाच्या हाती सांपडून त्याच्या दुरु- स्त्यामुळे होणारे पाठभेद निराळे. आपल्याकडे ग्रंथाचे संपादन आणि संशोधन होतें आणि पुष्क- ळदां तें अनेक हस्तलिखितें एकत्र गोळा करून होतें, आणि अशा प्रसंगी संपादकांची वृत्ति भिन्न प्रकारची होते. कित्येक संपादक कोणता संपादकांचे शिक्षण व अभिरुचि यांस अनुसरून पाठभेद शुद्ध भाषेचा व रस चांगल्या तऱ्हेने दाखविणारा पाठभेद कोणता हें पहातात, तर कांहीं ऐतिहासिक दृष्टीचे संपादक मूळ ग्रंथका- रानें जे लिहिले असेल ते शोधण्याचा प्रयत्न करतात. ऐतिहासिक पाठशोधन हैं नवीन आहे. संपादकांचा प्रयत्न विशेषेकरून शोभनार्थ- पाठ- शोधनाकडेसच आहे. मराठी कवींमध्ये पाठभेदांचे प्राचुर्य अत्यंत लोकप्रिय कवीच्या बाबतीतच दिसून येतें. जी कविता अधिक लोकप्रिय, तिच्यावर संस्करण फार व्हावयाचें आणि जी कविता लोकांत फारशी प्रिय नाहीं ती शुद्ध स्वरूपांत सांपडावयाची. या तऱ्हेने संस्करण हैं अभिरुचीचे चांगलेच दर्शक आहे. त्याचेहि विवेचन मागें केलेंच आहे. इंग्रजी राज्यामध्ये जे शिक्षण मिळाले त्यानें संस्कृत ग्रंथांचे पुनरवलोकन निराळ्या दृष्टीनें झाले आणि इंग्रजी वाङ्मयाची अभिरुचि अस- लेला वर्ग निर्माण झाला. त्यामुळे या वर्गामध्ये अधिक व्यापक दृष्टि उत्पन्न झाली. या वर्गानें व्यास पटलें तें साहित्यशास्त्र संस्कृत व पाश्चात्त्य या दोन्ही विकासांतून घेतले व जुन्या व त्याच- प्रमाणे नवीन होऊ पहाणाऱ्या वाङ्मयाचे आपल्या अभिरुचीप्रमाणे परीक्षण केलें आहे. त्यांच्या परी- क्षणाचे अवलोकन करणे हा स्वतंत्र विषय आहे. तो प्रस्तुत पुस्तकाच्या उत्तरभागांत विवेचिला जाईल.