पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तेव्हां मराठी ग्रंथांत संस्कृत विचारापेक्षां नवीन विचार काय आहे तो समजूं लागतो. शिवाय कांहीं ग्रंथांचे रहस्य मनुष्याचा स्वतःचा अनुभव जसजसा वाढतो तसतसे समजूं लागतें. दासबोधा- सांरखा ग्रंथ घ्या. मला असे वाटतें कीं हा ग्रंथ व्यक्तीस आयुष्याच्या अगदीं अननुभविक कालांत समजावयाचाच नाहीं. या ग्रंथांतील जो लौकिक विचाराचा भाग आहे त्याचे महत्त्व अलीकडे पुष्क- ळच वाटू लागले आहे. दासबोधास रामदासाच्या कित्येक शिष्यांनीं ज्याप्रमाणे यास काव्यग्रंथ म्हटलें आहे त्याप्रमाणें मी त्यास काव्यग्रंथ मुळींच मानीत नाहीं. मी त्यास आयुष्यविषयक तत्त्व- ज्ञानाचा बोधप्रथच मानितों, व हा ग्रंथ केवळ मराठीमध्ये अपूर्व झाला असें न समजतां हिंदु- स्थानच्या प्राकृत वाङ्मयांत हा एक अपूर्व ग्रंथ झाला आहे असें समजतों. हें जें माझें मत आहे तें केवळ या ग्रंथांतील व्यावहारिक भागावरून झाले आहे. मी या ग्रंथाचा आध्यात्मिक दृष्टीनें विचारच केलेला नाहीं. या ग्रंथांत दिसून येणारे साहित्यशास्त्र पुढें दिलेंच आहे; पण साहित्य- शास्त्राशिवाय यांत मानसशास्त्र आणि समाज- शास्त्र आहे तें खरोखरच चित्तवेधक आहे. प्रस्तुत पुस्तकांत ज्या अभ्यासाच्या दिशांकडे व पद्धतीकडे लक्ष ओढलें गेलें आहे त्या येणेप्र- माणे:- (१) मराठी कवींना अभ्यास करतांना तत्का- लीन संस्कृत वाङ्मयहि पाहिलें पाहिजे, कारण महाराष्ट्र त्यावेळेस दोन्ही भाषांत विचार व्यक्त करीत होतें. दोन्ही वाङ्मयाचे बरोबरच अवलो- कन केल्याशिवाय महाराष्ट्राच्या वाड्मयविकासाचे व त्याप्रमाणेच वैचारिक आणि वैज्ञानिक इतिहा- साचे स्वरूप समजावयाचें नाहीं. (२) महाराष्ट्रामध्यें जे पंथ प्रचार करीत अस- तात्या पंथांचे महाराष्ट्रीय वाङ्मय आणि इतर भाषांतील वाड्मय यांचा एकत्र अभ्यास करून पंथेतिहासविषयक ग्रंथ लिहिले पाहिजेत. त्याशि- वाय धार्मिक चळवळ समजावयाची नाहीं. महा- राष्ट्रीय वाड्मयाच्या प्रारंभकाळाचे ज्ञान होण्या- साठीं नाथपंथाचा आणि रामानंदपंथाचा इति- हास सविस्तर पाहिजे; त्याचप्रमाणे महाराष्ट्रांत निघालेल्या आणि बाहेर प्रचार करणाऱ्या महा- नुभाव संप्रदायाचा देखील इतिहास लिहिला गेला पाहिजे. (३) मराठींत जें चरित्रवाङ्मय आले आहे त्यांत उल्लेखिलेल्या व्यक्तींचा कोश करून प्रत्येक व्यक्तीसंबंधानें निरनिराळ्या ग्रंथांत जी माहिती येते तिची तुलना होऊन चरित्रे तयार व्हावयास पाहिजेत. हीं चरित्रे तयार करतांना प्रत्येक चरित्र कोणत्या साहित्यावर तयार झालें, कोणी कोणापासून माहिती उसनी घेतली आहे याचें विवेचन पाहिजे. (४) जे कवी लोकप्रिय असतात, त्यांच्या काव्याचे जे पाठभेद दृष्टीस पडतात त्या पाठ- भेदांचा अभ्यास व्हावयास पाहिजे; व जे पाठभेद सहेतुक झाले असतील त्यांच्या हेतूचा शोध झाला पाहिजे. (५) तसेंच जे भाषांतरकार कवी आहेत. त्यांच्यापुढे असलेल्या संस्कृत ग्रंथाच्या कोणत्या आवृत्त्या होत्या वगैरे चौकशी झाली पाहिजे, त्याशिवाय जेव्हां एक कवि दुसऱ्या कवीस मूळ संस्कृत कथा बिघडविली असा आक्षेप करतो त्या आरोपाचें परीक्षण होणार नाहीं. या संशो- धनापासून जें सांपडेल ते संस्कृत ग्रंथांच्या आवृत्त्यांच्या इतिहासाशी जोडलें पाहिजे. (६) अशिष्टवर्गाचें वाड्मय शिष्टवर्गाचें होत जातें व लोकमतांत फेर पडतांना प्रथावृत्ततिच फेर पडत जातात, ही क्रिया देखील अभ्यासविषय झाली पाहिजे. श्रीधर व्यंकटेश केतकर