पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुसऱ्या ठिकाणावर जातांना त्यांनी सुरक्षित पण पोंचावें म्हणून ज्या संस्थानांतून ते निघत तें संस्थान बरोबर स्वारहि पाठवी व दुसऱ्या संस्था- नच्या अधिकाऱ्यांच्या हवालीं त्यांस करून देई एका गांवांतून दुसऱ्या गांवी जातांना मध्ये मोठमोठ्या गांवीं मुकाम होई आणि त्या प्रसंगी घोड्यांची व बैलांची दाणावरण गांवच पुरवीत असे; व असला एक पुस्तकसंग्रहवाला आला, म्हणजे त्याच्या सर्व मंडळीचें स्वागत गांवाकडून चांगल्या तन्हेने होत असे. अशा वेळीं लहानशा गांवांत देखील पुस्तकें खपत असत. आणि या रीतीनें पुस्तकें घेऊन येणारा व्यापारी क्वचितच येत असल्यामुळे ती वेळ सधून कांहीं तरी बरीच पुस्तकें घेऊन ठेवावी अशी लोकांची प्रवृत्ति होई. जमीनदार वगैरे लोक पुस्तकें घेत असत; परंतु भिक्षुक मंडळींनां पुस्तकं घेणें शक्य नसे. तेव्हां भिक्षु कांस पुस्तकें दान करण्याकरितां म्हणून श्रीमत लोक पुस्तकें घेऊन ठेवीत. एखाद्या संस्थानिकाच्या गांवांत हे ग्रंथविक्रेते गेले म्हणजे तो संस्थानिक त्यांची चांगली बड- दास्त ठेवी. रहावयास घर मिळे, भांडीकुंडी मिळत, धान्य, तूपसाखर वगैरे सर्व जिन्नस मिळत. व हे पुस्तकविक्रेते - आमचे आजोबा- यांच्या व संस्थानिकांच्या भेटी व परत भेटीहि होत. व सहकुटुंब असल्यास त्यांच्या कुटुंबाच्या व संस्थानिकांच्या घरच्या मंडळीच्या भेटी व परत भेटीही होत. संस्थानिकांस पुस्तकें कोणती घ्याव- याचीं हें सर्व सावकाश ठरत असे. कारण संस्था निकापाशीं जीं पुस्तकें नसतील ती घ्यावयाचीं एव- ढेंच नसे तर भांडारांत असलेल्या प्रतीपेक्षां एखादी चांगली नक्कल असेल, तर तीहि घ्यावयाची असा रिवाज होता. बडोद्यास असतांना आमचे आजोबा ५०-६० ब्राह्मण लेखक ठेवीत व त्यांचेकडून नवीन नकला करवून घेत. त्यावेळेस या ब्रह्मणे लेखकांस दरमहा तीन रुपये देण्यात येत असत असें कळते. याचे कित्येकांस आश्चर्य वाटेल; पण वस्तुस्थिति लक्षांत घेतली असतां तीन रुपये ही बरीच बिदागी होत असावी, असें दिसतें. कारण त्यावेळेस या ब्राह्मणांस खिचडी १२५ प्रथाभिरुचि आणि ग्रंथविक्रय दरबारांतूनच मिळत असे, आणि ही जी तीन रुपयांची मिळकत होत असे ती खरोखरच त्यांची शिल्लकच पडत असे. आणि त्यावेळेस बरीच स्वस्ताई होती. ग्रंथांच्या किमतीविषयी माहिती आहे ती अशी - महाभारत सुमारे १५० पासून २५० रुपयांपर्यंत विकले जाई, व भगवद्गीतेची पोथी २ पासून तीन रुपयांस विकली जात असे. महाभारताचे दान म्हणजे मोठे दान समजलें जात असे, व त्याबरोबर एक मोहोर तरी दक्षणा दिली पाहिजे असा रिवाज होता. संस्थानिक मंडळी पुस्तकें घेताना केवळ पुस्तकाची किंमत दिली म्हणजे झालें असें समजत नव्हती. तर आमच्या आजोबांची बिदागी वैयक्तिक दृष्ट्या व कौटुंबिक दृष्टयाहि होत असे. बायकांना जरीकाठी लुगडी मिळत, मुलांनां एखादे वेळेस सल्ल्यांची जोडी मिळे, व आमच्या आजोबांस पागोटे, शाल- जोडी व कधीं कधीं हिऱ्याची आंगठी या वस्तू मिळत. व त्या वेळेस रेलवे वगैरे नसल्यामुळे इतक्या अडचणीतून ग्रंथप्रसाराचे काम म्हणजे विद्याप्रसाराचे काम हे करीत आहेत अशी त्यांच्याविषयीं पूज्य भावना संस्थानिक व इतर गिन्हाईक बाळगीत. इ.स १८९३ सालापूर्वीच गोविंद रघुनाथ केतकर यांनी सर्व हिंदुस्थानचा प्रवास केला असावा असे दिसते. तथापि १४-१५ सालीं ते नापत्ता झाले ते १८-५९ सालानंतर पुन्हां आपल्या गांवी प्रगट झाले. पण आमचे चुलते असें सांगतात कीं, तुम्ही चार-पांच वर्षे कोठें होतां हैं विचारण्याची त्यांच्या बायकोची देखील प्राज्ञा झाली नाहीं. या प्रकारच्या गोष्टींची चव- कशी करण्याचे बायकांनां कांहींच कारण नाहीं असेंच ते समजत. हे नापत्ता होण्या- पूर्वी ते काशीस असल्याचें घरांत कळलें होते, त्यामुळे या गृहस्थाची सर्व दरबारांत ओळख आहे, म्हणून बंड उठावणीच्या विचारासाठीं यांचा नानासाहेबांनी उपयोग करून घेतला असावा, अशी चुलत्यांची कल्पना होती. इ. स. ५७-५८ च्या सुमारास ते तंजावरास होते, असें व्ही. पी. मल्हारराव (व्ही. पी