पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण प्रस्तुत प्रकरणांत विचार करावयास पाहिजे. या विषयावर फारशी माहिती मिळत नाहीं. एवढे मात्र दिसतें कीं पुण्यासारख्या मोठ्या शहरांत निरनिराळ्या ग्रंथांच्या प्रती सांपडत असत आणि निरनिराळी संस्थानिक मंडळी पुण्याहून ग्रंथांच्या नकला करवून घेत असत. अशी नकल करतांना नकला करणाऱ्यास नकल करण्याचा खर्च मिळत असला पाहिजे यांत शंका नाहीं पण आपल्यापाशी ग्रंथ बाळ- गून वाटेल त्या प्रथाची नवल करवून देण्याचा धंदा पुण्यांत होता किंवा नाहीं याविषयीं निश्व यात्मक माहिती नाहीं. तथापि असा धंदा असला पाहिजे असे वाटतें. पेशवाईच्या काळामध्ये किंवा मराठी राज्या- मध्ये ग्रंथांचा प्रसार कसा होत असे, याविषयी माहिती फारशी नाही. तथापि प्रत्येक मोठ्या शह- रांत हस्तलिखितांचा सांठा पुष्कळांप शीं होता हें हस्तलिखिते जमा करणाऱ्यांच्या अनुभवा वरून दिसून येते. अनेक हस्तलिखिते जी आज उपलब्ध होत आहेत, त्यांवरून मोठमोठे जमी- नदार लोक आपल्या पदरी ग्रंथलेखक बाळ गीत, व कित्येक शास्त्री - पुराणिक कांहीं ग्रंथ स्वतः लिहून काढीत असें दिसतें. माझ्या परिच- याच्या एका घराण्यामध्ये दोन चार पुरुषानी एक- दोन पिढयांमध्ये शैसवारों प्रथांची स्वतःच नक्कल केलेली आहे. अशामुळे कौटुबिक ग्रंथसंग्रह गरीब भिक्षुकांच्या घरीहि तयार झाले आहेत ते मी पाहिलेले आहेत. याशिवाय विक्रीसाठी नक्कला तजार करून ठेवणारे लोकहि भीं पाहिले आहेत. अजूनहि ओरिसासारख्या मागासलेल्या भागांत हस्तलिखितें तयार करण्याची परंपरा राहिली आहे. कांही मंडळी फावल्या वेळात एकाच ग्रंथाच्या दोन तीन नकला करतात व कांहीं प्रसंगी एकाच ग्रंथाच्या एखादा मनुष्य दहा बारा नकला करून ठेवतो, अशी ही उदाहरणे क्षेत्रांतून दिसतात. जगन्नाथपुरी येथें भी विक्रीसाठी हस्तलिखितें तयार करण्याचा प्रकार पाहिला एवढेच नव्हे तर ताडपत्रांवर ग्रंथ लिहिण्याची प्रवृत्तीहि शिल्लक राहिलेली पाहिली आहे. कागद चिंध्यांचा अस- १२४ ल्यामुळे पुष्कळांनां कागदी पोथी सोंवळ्यांत चालत नाहीं. म्हणून ताडपत्राची परंपरा ओरिसांत अजून आहे. हस्तलिखिते जी तयार होत तीं प्राप्तीच्या आशेने होत. भाविक लोक असले ग्रंथ विकत घेऊन ब्राह्मणांस दान देतात व यामुळे पुष्कळ लोक रिकामपणाच्या वेळांत ग्रंथ लिहूत ठेवीत असतात हा किरकोळ धंदा झाला. ग्रंथ- विक्रेते व ग्रंथप्रकाशक यांच्या संबंधाची पेशवाई- तील अत्यंत जुन्या काळची माहिती उपलब्ध होत नाहीं. अव्वल इंग्रजीत मुद्रणकला आल्या- नंतर देखील हस्तलिखितांचा व्यापार चालूच असे. त्या काळाची माहिती देण्याचे ऐकीय साहित्य मजपाशी आहे. महाराष्ट्रांतील अत्यंत जुन्या प्रकाशकांपैकी माझे आजोबा गोविंद रघुनाथ केतकर हे असल्यामुळे त्यांच्या संबंधाची कांहीं माहिती जी मला माझ्या चुलत्यांपासून (कै. नारयण गोविंद केतकर वकील, उमरावती यांच्यापासून) कळली ती तेथे मांडीत आहे. गोविंद रघुनाथ केतकर यांचा जन्म व मृत्यु यासंबंधानें मला माहिती नाही. १८१८ नंतर जे पेशव्यांचे कांहीं घनको बुडाले त्यांतच त्यांचे वडील रघु- नाथ महादेव केतकर होते, व आपले ऋणको पेशवे बुडाले व धनको मात्र पैसे मागत आहे असें पाहून त्यांनी गांगरून जाऊन संन्यास घेतला व ते काशीस जाऊन रहात होते. गोविंद रघुनाथ केतकर यांनी त्या वेळेस जितके देणे देता येईल तितकें देऊन टाकले व घरांतील बायकांचे दागिने व पोथ्या यांवरच संसार आरंभला, व त्यांचा आयुष्यक्रम एकंदर फिरण्यांत बराच गेला. ते अंजनवेलीस आपल्या घरच्या मंडळीस ठेवून चोहोकडे प्रवास करीत असत. आणि सत्तावन सालच्या पूर्वी त्यांचा व्यापार बराच वाढला होता. त्यांच्या झाडून सर्व मराठी दरबारांत ओळखी होत्या व त्यांचा पुस्तकांचा धंदा त्या ओळखी- वरच चालत असे. त्या वेळची पुस्तकविक्रीची पद्धत येणेंप्रमाणे होती- आमचे आजोबा नेहमी दहांपासून वीसपर्यंत खटारे घेऊन फिरत. या खटातून पुस्तकें भर- लेली असत. आणि पुष्कळदां एका ठिकाणावरून