पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भागवतामध्ये कर्ममार्गी ब्राह्मणांचा उपहास केला आहे व ब्राह्मणपत्न्या देखील कृष्णाच्या लीलांमध्ये चित्तग्रस्त झाल्या असें दाखविलें आहे. हीच परंपरा ज्ञानेश्वरदिकांपासून संवर्धिली गेली. भक्तिं हा योग आहे. भक्तांसाठी ईश्वर वाटेल ते करतो एवढेच नव्हे तर भक्त वाटेल तें करूं शकतो असे दाख- विलें आहे. हा भक्तिसंप्रदाय त्यांस गौरवाब- याचा होता आणि त्यासाठी सर्व काव्य खर्ची पडलें. भक्तिमार्ग आणि वेदविद्या यांमध्ये जो विरोध भागवतामध्ये दाखविला आहे तो संत- कवींच्या काळांत देखील चालूच होता आणि हा विरोध गागाभट्टाचा उपहास करून महिपतीनें दाखविला आहे. • पूर्वोक्त विवेचनाचा मथितार्थ येणेप्रमाणे देतां येईल-धार्मिक वाङ्मय आणि संतचरित्रे आणि पौराणिक कथा याखेरीज इतर विषयांवर ग्रंथो- त्याच्या अडचणी होत्या. धार्मिक वाङ्मयाचें क्षेत्र देखील नियमित झालें होते. हिंदुस्थानच्या पारमार्थिक प्रयत्नाच्या इति- हासांत संतकवींचा जो काल होता तो इतर पारमार्थिक मार्गांची अनुपयुक्तता वाटून भक्ती- कडेसच वळण्याचा काल होता. व या काळां- तील महापुरुष म्हणजे भक्तच होते, व यामुळे जेव्हां पौराणिक विषयाखेरीज काव्य करावयाची वेळ आली तेव्हां लेखक भक्तांच्या चरित्रांकडे सच वळले. व हें कार्य करण्यास त्यांस स्वाभाविक प्रेरणा झाली. तिचें कारण कांही अंशी तरी आत्मभावनाकथन विषयक काव्य अगोदरच झालें होते. सामाजिक व वैज्ञानिक परिस्थितीचा वाड्म योत्पादनावर झालेला परिणाम आतांपर्यंत दिलाच आहे. आतां त्याच परिस्थितीचा काव्यपरीक्षणा- वर परिणाम कसा झाला तें दिलें पाहिजे. काव्य परीक्षणरूपी जें कार्य मुद्रणपूर्वकालांत झालें तें आदरव्यक्ति, अनुकरण, मराठी ग्रंथांचे भाषांतर, संस्कृत ग्रंथांचे मराठीत भाषांतर होतांना होणारें मूलपरीक्षण आणि अशिष्ट वाङ्मयाचें शिष्टी- करण आणि सामान्यजनाकडून होणारें काव्य- ग्रहण इतक्या बाजूनी झाले आहे. एका शब्दांत १२३ .1 1 JAN 1779 प्रथाभिरुचि आणि ग्रंथविक्रय सांगावयाचे झाल्यास हें सर्व परीक्षण अहेतुक झाले आहे. यापेक्षां निराळ्या तऱ्हेने म्हणजे सहेतुक झालें नाहीं. याचे कारण संस्कृत साहित्यशास्त्राच्या अभ्यासकांनां मराठी ग्रंथांचे स्वरूप समजलें नाहीं, किंवा त्यांनी समजून घेण्यासाठी फिकीर केली नाहीं हें होय. त्यांनां देशी कथावाङ्मयाचा अंगिकार करतां आला. साहित्यशास्त्राच्या दृष्टीने मराठी व ड्म- यास अभिज्ञता उत्पन्न होण्यास जरा निराळें साहित्यशास्त्र लागत होतें. तर देशी वाङ्मय पाहून त्याचे साहित्यशास्त्रीय परीक्षण करून साहित्यशास्त्रावर स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याइतका विद्वान् मुद्रणपूर्वकालीन महाराष्ट्रांत निघालाच नाहीं. शिवाय चरित्रकार बनणे वगैरे क्रिया संप्र- दायप्रकर्षासाठी झाल्या. त्या संप्रदाय वृद्धीच्या भावनांमुळे लेखकाच्या परीक्षणवृत्तीत हि दौर्बल्य आलें होतें. प्रकरण १९ वे. ग्रंथाभिरुचि आणि ग्रंथविक्रय मराठी काव्याभिरुचीचा इतिहास देतांना ग्रंथ. चेंच केवळ नव्हे तर वाड्मयाभिरुचीच थोडे प्रसाराचा इतिहास दिला असतां काव्याभिरुची स्पष्टीकरण अधिक होईल. म्हणून ग्रंथप्रकाशन आणि ग्रंथविक्रय यांच्या धंद्यावर एक लहानसें टिप्पण येथे देत आहे. येथें जी माहिती देत आहे तिचें प्रकृत विषयाचा भाग म्हणून समर्थन दूरान्वयानेच करतां येईल. ही माहिती देण्यांत स्वतःची कौटुंबिक माहिती देण्याचा मोह हें एक कारण आहेच; तथापि ती माहिती वाङ्मयाची जोपासना व प्रसार हीं मुद्रणपूर्वकाळांत क होत होती हैं दाखविण्यास उपयोगी पडेल, व कांहीं वाचकांनां तरी ही माहिती मनोरंजक होईल. ग्रंथांचा प्रसार आणि ग्रंथविक्रय या गोष्टी भिन्न आहेत. मोरोपंतांच्या आर्या पुराणिकांनी व हरिदासांनी लोकप्रिय केल्या पण त्यांनी ग्रंथाच्या प्रती करवून त्यांचा प्रसार केला नाहीं. ग्रंथप्रसार कोण करीत असत या विषयाचा आपणांस