पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण नये म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. तें काव्य समकालीन राजावर लिहिलें न जातां पूर्वकालीन राजावर लिहिले गेले पाहिजे आणि क्ष्या राजाचें वैभवं · स्थानिक किंवा विशिष्ट राज्य - विषयक न रहातां अतिराष्ट्रीय झाले पाहिजे. तसा काळ काव्यविषयक राजा दिवंगत झाला म्हणजे अनेक पिढ्यांनी उत्पन्न होणार, ताबड- तोब उत्पन्न होत नाहीं. कालांतरानेंच लोकांस तो पूज्य होतो. तर क्षत्रियगौरव करणारें राष्ट्रीय महाकाव्य मराठींत तयार होण्यास सवड झालीच नाहीं. ब्राह्मणगौरवात्मक वाङ्मय न होतां संतगौर- वात्मक झालें याला कारणें होतीं. मुसुलमानी राज्य आलें तेव्हां ब्राह्मग हे पूज्यविषय करण्या- साठीं काव्य करण्याची आवश्यकता नव्हती कारण हिंदूंमध्ये ब्राह्मणांस प्राधान्य आलेच होतें आणि मुसुलमान राजांमध्ये ब्राह्मणभय उत्पन्न करण्याची शक्यता नव्हती. हिंदूंमध्ये देखील ब्राह्मणशक्तीसंबंधानें अतिशयोक्तीचें विधान करतां आलें नसतें. ब्राह्मण हे शापाने वाटेल त्यास भस्म करूं शकतील अशी कल्पनाच मांडणें शक्य नव्हते. अशा बाता जर ब्राह्मणांस गौरव देऊ इच्छिणारे कवी मारूं लागले असते तर लोक म्हणणार कीं, उगाच खोट्या गमजा कशाला करतां. रोज मुसुलमान उरावर बसत आहेत तर ब्राह्मणांची शत्रूस भस्म करण्याची शक्ति कोठें गेली आहे ? ब्राह्मणांचे पूर्वीप्रमाणे पराक्रम वर्णन करणें शक्य नव्हतें. ब्राह्मणवर्गाच्या अभिमानी लोकांनी तसे प्रयत्न केलेहि नाहींत. हा संत मंडी | भक्तिप्रधान वर्ग संस्कृत विद्येच्या अभि- मान्यांकडे साशंकवृत्तीनें पहात होता. त्यांना आपल्या वर्गाचा गौरव करावयाचा होता त्यामुळे जे काव्य निर्माण झालें तें भक्त गौरवात्मक निर्माण झालें भक्तांच्या अंगीं दैवी शक्ति दाखविण्यांत आली. तथापि ही शक्ति "कर्तुमकर्ते" अशी दाखविण्यांत आली नाहीं. मुसुलमानांची लाथ दररोज मिळतच होती, त्यामुळे मुसुलमानांस १२२ भस्म करण्याची शक्ति संतांस आहे अशा तऱ्हेचें देखील काव्य झालें नाहीं. संतांचा परमेश्वर हिंदू- साठीं भांडणारा मुळींच दाखविला गेला नाहीं. तर जो भक्त संकटांत पडेल त्याला सोडविणारा झाला. म्हणजे संतांच्या परमेश्वराची ताकद देखील संकटांतून सोडविण्यापुरतीच झाली. "समर्थाचिया सेवकां वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे ?" अशा तऱ्हेचें निर्भय अंतःकरणाचें वाक्य बोल- ण्याची ताकद रामदासाखेरीज कोणाच्या वाक्यांत दिसत नाहीं. "मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदूं ऐसे" असली वाक्यें तुकारामाच्या अभंगांत जरी सांप- डलीं तरी तुकारामाच्या अभंगांत निर्भय मनो वृत्तीच्या व्यक्तीचें तेज मुळींच दिसत नाहीं. पौराणिक धर्म ज्ञानेश्वराच्या पूर्वी अनेक शतके आला होता व त्यांतील अनेक व्रतादींचा परि- णाम हेमाद्रीत दिसत आहे पण लोकांच्या भाव- नांस दिशा सर्व पुराणांनी दिली नसून फार थोडक्या पुराणांनी दिली त्यांत भागवत पुरा- भविष्यकालीन णास प्राधान्य आहे आणि वाङ्मयाचें बीज गीता आणि भागव दोन ग्रंथांत आहे. मराठीत ग्रंथरचनेस जी दिशा लागली ती ज्या विशिष्ट मनोवृत्तीमुळे लागली ती मनोवृत्ति तेराव्या शतकापूर्वीपासून तयार होत होती. या मराठी संतकवींचा धर्म जरी पूर्वकालीन ठोकांच्या धर्मापेक्षां अधिक उच्च तन्हेचा भासतो तरी त्या धर्मामध्ये देखील बरेंच वैगुण्य होतें. धार्मिक भावनांमध्ये केवळ भक्तीच नव्हती तर खुळ्या समजुती देखील होत्या. संतमंडळीमधील मोठे पुरुष चमत्कार करणारे म्हणून प्रसिद्ध होते ते चमत्कार करण्याची शक्ति त्यांस ईश्वरी कृपे- मुळे येते अशी त्यांची कल्पना होती. आणि त्या चमत्कारांच्या अनेक कथांमुळे या संप्रदायास भक्तिदृष्ट्या थोडेसें गौण स्वरूप आले आहे. भागवतामध्ये ज्या कथा आहेत त्या कथांचेच मराठी संतमंडळीचा संप्रदाय हें विस्मरण होतें.