पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२१ लिहिणें ही राज्यांत कारकुनीच्या नोकऱ्या करूं इच्छिणारांची गरजच होती. शास्त्रीय वाङ्मयाची कथा मार्गे सांगितलीच आहे. शिक्षणात्मक गद्य- वाङ्मय थोडेसे तयार होत असावे. याला उदा- हरण, राजवाड्यांच्या चौथ्या खंडांत सवाईमाधव - रावाच्या शिक्षणासाठी झालेले पुस्तक देतां येईल. काव्यवाङ्मय हैं लोकांचें मनोरंजन करणारें किंवा लोकांचें मनोरंजन करता करतां कर्त्याचा दुसरा कांहीं हेतु साधणारें वाङ्मय होय. हे मराठीत झालें पण त्याची व्याप्ति फार नियमित होती. बाङ्मयाला जें कांहीं स्वरूप आलें तें येण्यास कारणें होतीं. संस्कृत ग्रंथ ज्या प्रकारचा धर्म सांगत त्यापेक्षां निराळ्या प्रकारचा धर्म प्राकृत जनांस हवा होता; या कारणामुळे निराळे धार्मिक वाङ्मय तयार झालें. तें वाङ्मय भक्तिस्वरूपाचें होते; आणि भक्तीचें शास्त्रदृष्ट्या समर्थन करणारें होतें. शंकराचार्य हे " ज्ञानादेव तु कैवल्यं " म्हणत व मंडनमिश्र ज्ञानोत्तर स्थितीत कर्ममार्ग चालूच ठेवावा म्हणत; तर तोच सिद्धांत मराठी अध्यात्मिक वाङ्मयांत ज्ञान् झाले तरी भक्ति चालू ठेवावी या रूपांत मांडला गेला. या परिस्थितींत काव्यास जें क्षेत्र मिळालें तें भक्तीचें मिळाले आणि काव्य आपली भक्तिस्वरू- पाची भावना व त्याबरोबर आपले विचार प्रगट करण्याकडे लागले; आणि यामुळे मराठी कवितेस संस्कृत कवितेपेक्षां निराळेपणा आला. काव्यानें पुरुष 'गौरवावयाचे ते देखील निराळेच बनले. शंभर ऋतू करवून इंद्रपद मिळवू पहाणारे राजे किंवा उग्र तपश्चर्या करून सिद्धि पावणारे पुरुष हे चरित्रविषय न होतां भक्त व संत चरित्रविषय झाले. जे काव्य म्हणजे कोणतेंहि वर्णन किंवा कथन आकर्षक तऱ्हेनें करणें. समाजाचे पुढारी जें पूज्य आहे म्हणून ठरवितात, तेंच कधी आकर्षक कर- १६ परिस्थिति व प्रथक्षेत्र तात. सामान्य वस्तुवर्णनविषयक काव्य हैं वारं- वार झाल्यानें त्यांतील रहस्य नाहींसें होतें. प्रातः- काळची शेंकडों वर्णनें समाजांत कधींच जिरत नाहींत. व्यक्तिविषयक काव्याची मागणी समा- जांत नेहमीच असते, त्या व्यक्ती खन्या अस अथवा काल्पनिक अमोत. व्यक्तिविषयक काव्य उत्पादन व ग्रहण ही मोठ्या प्रमाणावर व्हाव म्हणून पद्यसमुच्चयाचें रूप सोडून गद्यकथेचे किंवा कादंबरीचे रूप पत्करतें, आणि व्यक्तिविषयक काव्याचा विकास त्या तऱ्हेने दृष्टीस पडतो. कविता जेव्हा मनुष्याश्रयी असते तेव्हां जो वर्ग अगर ज्या व्यक्ती समाजाला पूज्य बनवावयाच्या असतात त्या व्यक्तींच्या भोवताली काव्य जमा होतें. बुद्धसंप्रदायामुळे बुद्धाभोंवतीं तेजोवलय निर्माण करावें लागलें आणि विविध प्रकारचें काव्य बुद्धाश्रयी बनले. ब्राह्मणांस व ब्राह्मणानुयायी जन- तेस काव्य दोन प्रकारचें करावें लागलें; एक तर ब्राह्मणांची महति वर्णन करणारे व दुसरें ब्राह्म- णानुयायी क्षत्रियांची महति गाणारें. ब्राह्मण- वेळ पृथ्वी निःक्षत्रिया केली, विश्वामित्र राजा पूज्य करण्यासाठी परशुरामानें एकवीस ब्राह्मणत्वाची आकांक्षा घरीत होता, आणि मोठ्या कष्टानें त्याची आकांक्षा पूर्ण झाली, ब्राह्मणांस त्रास देणाऱ्या लोकांचा वध ज्या क्षत्रियांनी केला ते क्षत्रिय खरोखर ईश्वरी अवतार होते, म्हणजे ब्राह्मणांस त्रास होऊं नये ही परमेश्वरी इच्छा आहे, अशा दृष्टीने काव्य रचलें गेलें. दुर्वासा - सारखे ब्राह्मण रागावले म्हणजे ते देवांना देखील शाप देऊन पंचायतींत पाडतात व यासाठी ब्राह्म- णांनां भ्याले पाहिजे वगैरे कथा सांगण्यांत आल्या. क्षत्रियांसंबंधानें काव्य लिहावयाचें म्हणजे त्यांचे पराक्रम वर्णन करणारें कव्य लिहावयाचें तें लोकप्रिय होण्यास किंबहुना राष्ट्रीय ग्रंथ होण्यास कांहीं गोष्टी अवश्य आहेत. पण त्या काव्याला स्तुतिपाठक काव्याचे स्वरूप येऊ