पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण म्हणून उपलब्ध असलेलें श्रीपतीचे रत्नमाळ हें पुस्तक ज्योतिषावरच आहे. लोकांनां ज्योतिषाची जरूर दोन कारणामुळे पडते; नाक्षत्रज्योतिष त्यांस पावसाविषयी अंदाज करण्यास आणि पिकें पिकविण्यास पाहिजे होतें; व कुंडल्या करण्यास, लग्ने जुळविण्यास, अरिष्टें टाळण्यास आणि आशा उत्पन्न करण्यास फलज्योतिष पाहिजे होतें. त्यामुळे या दोहोंवर हि वाड्मय उत्पन्न झालें. सहदेव भाडळीच्या नांवावर खपणारी पुस्तकें, व किरकोळ फलज्योतिषावर लिहिली गेलेलीं गद्य चोपडी या स्वरूपांचा प्रयत्न दाखवितात. कल्प- शास्त्र म्हणजे श्रौत व गृह्य धर्माचें शास्त्र; कर्मासाठी उत्पन्न झालें तीं कर्मे बंद पडत चालली होती; आणि मराठी वाङ्मयाचा एकंदर भर ती कर्मे बंद पडावींत याच तऱ्हेचा होता. तर यांवर मराठीत ग्रंथ नसणें रास्तच आहे. शिक्षण बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुरू झालें असतें तर शास्त्रीय विषयावर मराठींत वाङ्मय वाढलेंहि असतें. १२० धर्मशास्त्र देखील मराठीत वाढलें नाहीं. व्यव- हारधर्म बरेच दिवस मुसलमानांच्या ताब्यांत होता. व्यवहारधर्म वगळता उरलेला धर्म म्हटला म्हणजे आचारधर्म व प्रायश्चित्त धर्म. आचारधर्म हा ज्यांस ज्या कर्माचा अधिकार असेल त्यांसा- ठीच होता. अगोदरच आचारधर्माचा लोकांस कंटाळा आणि तो करावयाचा झाल्यास तो कर ण्यास "अधिकाराचा प्रश्न" उत्पन्न होणार. अर्थात या स्थितीत त्याचा प्रसार होणें शक्य नव्हते आणि त्यावर वाङ्मय वाढणें देखील शक्य नव्हतें. आतां उरला प्रायश्चित्तधर्म; यावरहि वाड्मय उत्पन्न होण्याची जरूर नव्हती. ज्या व्यक्तीच्या मनास आपण कांहीं वाईट केलें अशी रुखरुख लागेल त्या व्यक्तीनें प्रायश्चित्त मागण्यासाठी ब्राह्म ● कडे जावें व ब्राह्मणांनी पोथी पाहून निकाल द्यावा, या तऱ्हेची स्थिति होती; त्यामुळे धर्मशास्त्रा- वर देखील वाङ्मय उत्पन्न होण्याची आवश्य- कता नव्हती. आतां येऊन जाऊन उरलेला वाङ्मय प्रकार म्हणजे सामान्य जनाच्या करमणुकीसाठी लागणार किंवा त्याच्या मनांत कांही तरी चांगल्या भावना उत्पन्न करण्यास अवश्य असणारें वाङ्मय. तें मात्र मराठीत झालें. ब्रिटिश कालापूर्वीच्या मराठी ग्रंथरचनेचे एकंदर स्वरूप पहातां त्याचें पुढीलप्रमाणे वर्गीकरण करतां येईल. (१) अध्यात्मिक वाङ्मय. (२) पौराणिक कथावाङ्मय. (३) बखरी स्वरूपाचें गद्यवाङ्मय. (४) पोवाडे. (५) लावण्या. (६) प्रेमवाङ्मय. (७) संतचरित्रात्मक वाङ्मय. (८) ऐतिहासिक व्यक्तीसंबंधानें पोवाड्याखेरीज काव्यवाङ्मय. (९) कथावाङ्मय. (१०) शिक्षणात्मक गद्यवाङ्मय. (११) शास्त्रीय वाङ्मय. या वर सांगितलेल्या यादीवरून सर्व तऱ्हेचें मराठींत वाड्मय झालें आहे असें वाटेल, तथापि अध्यामिक वाङ्मय, पौराणिक कथावाङ्मय व संतचरित्रात्मक वाङ्मय यांचाच भरणा पद्यवा- मयांत सपाटून आहे. पोवाडे, लावण्या, हें वाङ्मय अल्प आहे आणि पोवाडयाखेरीज ऐतिहासिक व्यक्तींवर अनंतफंदीच्या माधवग्रंथासारखे काव्य- वाङ्मय तर अत्यंत अल्प आहे. प्रेमवाड्मया- मध्ये लोलिंबराजाच्या रत्न कलेवरील वाङ्मय व लावण्यांसारखें कांहीं स्वतंत्र वाङ्मय आहे तर बिल्हण चरित्रासारखें कांहीं भाषांतरवादम आहे. पण हे सर्व अल्प आहे. बखरी स्वरूपाचें वाङ्मय जरी बरेंच आहे तरी त्याचे उत्पादन विष- यक विवेचन करण्याचें कारण नाहीं. बखरी