पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनोभूमिका समजावून घ्यावयाची झाली तर ग्रंथ- कारांचीच मनोभूमिका समजावून घेतली पाहिजे, आणि ग्रंथकारांची मनोभूमिका समजावून घ्याव याची म्हणजे ज्या सामाजिक आणि वैज्ञानिक परिस्थितींत ती मनोभूमिका उत्पन्न झाली ती परिस्थिति लक्षांत घेतली पाहिजे. ग्रंथाभिरुचि व ग्रंथक्षेत्र हीं वैज्ञानिक त्याचप्रमाणें सामाजिक कारणांनी मर्यादित झाली आहेत. लोकांच्या मनोवृत्तीचा आणि काव्योत्पाद- नाचा निकट संबंध आहे. काव्याचें परीक्षण लोक आपल्या मनोवृत्तीप्रमाणेंच करणार, व लोकांची मनोवृत्ति काव्योःपत्तीची नियामक होणार; एकंदर वाक्ययोत्पत्तीचें स्वरूप लोकांच्या गरजा आणि मनोवृत्ती यांमुळे ठरत असतें. तर मराठी वाङ्मयाचें स्वरूप ठरविणारी जी एकंदर जतनची सामाजिक स्थिति आणि सामाजिक व्यापारविष- यक मनोवृत्ति होती त्यांचे स्वरूप नीट लक्षांत घेऊनं त्यांचा ग्रंथोत्पत्तीवर आणि परीक्षणावर काय परिणाम झाला हैं मांडलें पाहिजे. सामाजिक परिस्थितीचा परिणाम पहातांनां मराठी भाषा कोणत्या सामाजिक व्यापारां- कडे लावली गेली व गेली नाहीं, आणि कोणत्या बाजूनीं मराठी वाङ्मयाची वाढ आणि संकोच हीं झाली या बाबतीत पाहिला पाहिजे. मराठी वाङ्म- याची वाढ सर्व बाजूंनीं न होतां कांहीं बाजूनीं तेवढीच झाली. धार्मिक विधि, राजकारण इत्यादि गोष्टींवर मराठींत ग्रंथ झाले नाहींत. विधी संस्कृत मध्येच राहिले, व राजकारणविषयक पत्रव्यवहार प्रथम फारसीत होत होता व तो मागाहून थोडाबहुत मराठीत होऊं लागला होता. मराठीत शास्त्रीय उच्च स्वरूपाचें वाङ्मयच झालें नाहीं. कारण समाजाची गरजच त्या प्रकारची होती. उच्च प्रकारचें शास्त्रीय वाङ्मय ज्यासाठीं होतें त्यांनां सर्व हिंदुस्थानशीं संबंध ठेवावयाचा होता. या साठी त्यांनां शास्त्रांची भाषा संस्कृतच ठेवावी परिस्थिति व ग्रंथक्षेत्र लागली. आतां संस्कृत शास्त्रांचा आढावा घेऊन मराठींत त्यांचा कितपत अंश येणे असलेल्या परि- स्थितीस शक्य होतें आणि जास्त येण्यास काय पाहिजे होतें, हें पाहिलें पाहिजे. आणि नंतर मराठीत जें वाङ्मय ज्या स्वरूपांत आलें त्याची कारण पाहिली पाहिजेत. संस्कृत शास्त्रांपैकीं कांहीं शास्त्रे भाषासंबद्ध आहेत. अशीं शास्त्रे म्हटलीं म्हणजे शिक्षा व्याक- रण, निरुक्त, छंद, साहित्य आणि मीमांसा हीं होत. न्याय आणि वैशेषिक दर्शने हीं कांहीं अंशीं भाषासंबद्ध तर कांहीं अंशी विचारसंबद्ध शास्त्रे आहेत. या शास्त्रांचा अभ्यास संस्कृत ग्रंथांच्याच अनुषंगाने व्हावयाचा व मराठींत न्यायावर वाङ्मय व्हावयाचें तें प्रथम टीकारूपाचेंच व्हावयाचें च तसें थोडेसें झालेंहि आहे. साहित्यशास्त्रविषयक तुरळक पोथ्या सांपडतात, तसेंच तर्कसंग्रहा- सारख्या पुस्तकांचें भाषांतर इंग्रजी पूर्वीच्या काळांत झालेच आहे. तरी त्यांचें विशेष महत्त्व नाहीं. संस्कृत भाषेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करतां करतां जें भाषाशास्त्रज्ञान उत्पन्न झाले त्यापैक मराठी भाषेच्या अभ्यासाला किती लागलें हें पाहतां असें दिसतें कीं मराठी भाषेचा शास्त्रीय तन्हेनें अभ्यास होण्यास महानुभावांनीच थोडीशी सुरवातहि केली होती. ज्योतिष आणि वैद्यक या शास्त्रांनी मराठीचा अल्प प्रमाणांत आश्रय केलाच. वैद्यकाची बार्डे बऱ्याच जुन्या काळापासून सांपडतात. पण पद्धतशीर वैद्यक यांत नाहीं. जर मराठी राज्यानें शास्त्रीय शिक्षणाकडे लक्ष दिलें असतें तर अनेक शास्त्रीय विषयांवर मराठी वाङ्मय उत्पन्नहि झालें असतें. पण हेंहि प्रथम टीकारूपाचेंच असतें. तथापि त्यांत नावीन्य नसतेंच असें नाहीं. संस्कृत टीकांत जशी पुष्कळ ठिकाणीं नवीन माहिती असते तशी यां आली असती. ज्योतिषावर मराठीत ग्रंथ झाले. पण ते अगदी थोडे आहेत. पहिला मराठी ग्रंथ 16 MAR 1990