पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ११८ या केशवस्वामीच्या पदाविषयीं वरील टीकाच हें गोपाळनाथकृत पद ज्याने वाचलें असेल, करतां येईल. "भरे गाढवाच्या लेका संसार गेला फुका संतालागी नमन करितां लाज वाटे चित्ता संतचरण नावडती आवडती बायकोच्या लाथा" एडका मदन । तो केवळ पंचानन " 44 _ (काव्यसंग्रह ग्रंथांक १३. पृ. २७,५१) या ओळी पुष्कळांच्या तोंडी आढळतात पण त्यांस या एकनाथाच्या आहेत ही माहिती असेल काय ? पुष्कळदां असें होतें कीं, एक कवी जुन्या काव्याचें पठण करतो आणि त्यामुळे तो जुन्या कवीचें वाक्य आपलेंच म्हणून न जाणतां प्रसृत करतो. याला एकच उदाहरण घेतो. - ) "ऐसा पुत्र देगा देवा । जग म्हणे त्याला बावा । ऐसा भक्त राजगुंडा । त्याचा तिहीं लोकीं झेंडा" (चोखामेळा, तुकारामतात्यांची नामदेवगाथा या ओळी रामदासांच्या कानी पडल्याशिवाय “पुत्र व्हावा ऐसा गुंडाज्याचा तिहीं लोकीं झेंडा" या ओळी रामदासांनी लिहिल्या असतील काय? अनेक उदाहरणे पाहतां हा अप्रत्यक्ष परि- णाम किती होतो व कसा सहज होतो हैं लक्षांत येऊन मोठी मौज वाटते. कित्येक प्रसंगी मनुष्य एखाद्या संस्कृत कवींचें भाषांतर करीत असतो पण भाषांतरांत जुन्या मराठी कवींचे शब्द मात्र येऊन जातात. हे दाखविण्यासाठी देवलांच्या मृच्छकटिकांतील एक उदाहरण घेतो. देवलानीं भिक्षु झालेल्या संवाहकाच्या तोंडी- “आधीं मनमुंडा मन मुंडा कां व्यर्थ मुंडितांमुंडा" हें पद घातले आहे. तथापि त्या शब्दांत जुन्या कवचे शब्द आले आहेत. "आधीं मन मुंडा | बा मन मुंडा । मग तुम्ही ब्रह्मचि धुंडा । मनचि मुंडलें नाहीं तेथें सद्गुण करील कायी ॥" (काव्यसंग्रह ग्रंथांक ३९ पृ. ७३) त्यास देवलांच्या मनावर परिणाम होऊन मृच्छ- कटिकांतील पद उतरलें असें वाटतें, असो. प्रस्तुत प्रकरणांत आलेल्या दोन अभ्यास- विषयांकडे लक्ष ओढण्यासाठीं त्याचें पुनः कथन करतो. (१) समाजांत जिरणारे वाङ्मयांश व समा- जांत ग्राह्य होणारें वाङ्मय किंवा नाट्य यांचे प्रत्यक्षावलोकन करून नंतर साहित्यशास्त्रास चालन देण्याचें काम व्हावयाचे आहे. (२) एका समाजांगांत किंबहुना खालच्या दर्जाच्या समाजांगांत वाङ्मय उत्पन्न होतें तें कालांतराने सार्वजनिक व शिष्ट वाङ्मय बनतें; ही क्रिया समाजाच्या वाड्मयग्रहणाच्या इतिहा- सांत महत्वाची आहे. हिचें अवगमन ब्राह्मणब्राह्म- णेतर संबंधावर प्रकाश पाडिलें. अशिष्ट वाङ्म- याचें शिष्टीकरण करण्याची क्रिया राष्ट्रीय वाङ्म- यांत नाविन्य उत्पन्न करिते या क्रियेचें महत्त्व भारतीय वाङ्मयाच्या इतिहासांत जितकें प्रामु- ख्याने मांडलें पाहिजे तितकें अजून मांडलें गेलें नाहीं. प्रकरण १८ वे. सामाजिक परिस्थिति, ग्रंथपरीक्षण आणि ग्रंथक्षेत्र इंग्रजी राज्यापूर्वी चालू असलेलें परीक्षण खुद ग्रंथोत्पत्ति करणारांकडूनच झालें. त्यामुळे ग्रंथरच- नाकारांची व परीक्षण करणारांची दृष्टि एकच होती. तीमुळे ज्या ग्रंथोत्पत्तीस मर्यादा उत्पन्न झाल्या त्याच मर्यादा ग्रंथपरीक्षणास देखील उत्पन्न झाल्या. ज्या प्रकारचे ग्रंथ लोक करीत त्या प्रकारचेच ग्रंथ त्यांस आवडत. ते हरिभक्तीचीं काव्ये करीत, आणि ज्या काव्यांत हरिभक्ति नसेल त्या काव्यांस नावें ठेवीत. तर काव्यपरक्षिकांची