पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११७ मनावर परिणाम करीत नाहीं, आणि त्यामुळे तें लोकांच्या स्वायत्तीकृत वाङ्मयाचा अंश होत नाहीं. समाजाचें नित्यनैमित्तिक वाड्मय मागें दिलेंच आहे. समाजानें ग्रहण केलेलें वाड्मय वाढवा- वयाचें किंवा बदलावयाचें म्हटलें म्हणजे त्यास परिश्रम पुष्कळच पाहिजे. तथापि तें बदलतें हें खास गुरुचरित्र, शिवलीलामृत वगैरे ग्रंथ लोक- प्रिय होण्यापूर्वी एक तर त्यांच्या अगोदर वाचले जाणारे ग्रंथ निराळे असणार, किंवा या ग्रंथांनंतर लोकांच्या वाङ्मयग्रहणांत वृद्धि झालेली असणार. बदल दोनहि बाजूंनीं शक्य आहे. नवीन होणाऱ्या वाङ्मयास जुन्याचें स्थान पटकावणें किंवा आणखी स्थान पटकावणें या दोन्ही गोष्टी शक्य असतात व दोन्ही क्रिया आज आपल्या दृष्टीस पडत आहेत. माझ्या लहानपणीं मी जीं बाय- कांचीं गाणी ऐकलीं, तींच आजच्या मुलींच्या तोंडीं नाहींत, कांहीं जुनीच आहेत, तर कांहीं नवीन भर पडली आहे. नवीन गाणी अनेक ठिका- णाहून आली आहेत. कांही शाळांच्या क्रमिक पुस्तकांतून आलीं आहेत व कांहीं नाटकांतून आली आहेत. गणपतीचे मेळे अनेक निघतात, दरसाल त्या मेळ्यांचीं गाणीं बदलतात, परंतु एखादेंच गाणें सर्वतोमुखीं होतें. तशीच गोष्ट नाटकांतील गाण्यांची आहे. गेल्या पिढीत कवि- ताप्रसाराचें काम हरिदास करीत असत, पण आज हरिदासापेक्षां नाटकें, मेळे व क्रमिक पुस्तकें या गोष्टी अधिक बलवान् झाल्या आहेत. लोकांनीं ग्रहण केलेले वाङ्मय काढावयाचें हा मोठा अभ्यास आहे म्हणून मार्गे सांगितलें. तर त्या अभ्यासास येथे केवळ प्रारंभच करतो. काव्याचे तुकडे लोकांत प्रसृत होतात त्यांपैकीं अनेकांचे कर्ते कोण आहेत याची देखील लोकांस माहिती नसते. अशीं कांही उदाहरणें. - "कांव्याध्या अणीवर वसति तीन गांव । दोन ओसाड एक बसेचिना ॥" नसेल. महाराष्ट्राची, काभ्यग्राहकता पद ज्ञानेश्वराचें आहे हें पुष्कळांस ठाऊक (१) "भीमकबाळा म्हणे नृपाळा त्या शिशु- पाळा मी नवरी । कमलनयन हरि विमलचरित तो नवरा त्याची मी नवरी ॥” (२) “हरिची भगिनी म्हणे सुभद्रा रुक्मिणि- वहिनी दया करा । दादानां तुम्हि कळवुनि वळ- वुनि अर्जुनजीचा शोध करा ॥" (काव्यसंग्रह ३५) या दोन पदांचा जो कर्ता काशी कवि त्याचे नांवहि पुष्कळांस ठाऊक नसेल. “भाव धरारे । अपुलासा देव करारे " • (काव्यसंग्रह ३५ ) हैं. पद लोकांस ठाऊक असेल व शिवदिन केसरीहि लोकांस ठाऊक असेल पण हें पद शिव- दिन केसरीचेंच म्हणून लोकांस ठाऊक नसेल. "पाहतां पाहतां धर्म बुडाला अधर्म झाला चहूंकडे । जिकडे तिकडे कली मातला कठिण काळ हा आला पुढें ॥" (काव्यसंग्रह ग्रं. ३५) पदमहिपतीचें म्हणून ज्यांस ठाऊक असेल असे वाचक थोडे. " नेदी चित्ता शांती ऐशी विद्या काशाला । न घे हरिचें नाम ऐशी जिव्हा काशाला ||" हरिकविकृत पद (का. सं. ग्रं. ३५) कवीच्या नांवापेक्षां काव्य जेव्हां अधिक परि- चित असतें असें हें वर दिलेलें आणखी एक उदाहरण आहे. "प्रभुविण कोण कुणाचा वाली" (का. सं. ग्रं. ३५ पू. १३८) या ओळीचें कर्तृत्व माणिकप्रभूचें आहे ही गोष्ट फारशी कोणास ठाऊक नाहीं तीच गोष्ट- "गडे हो कृष्णगडी आपुला राजा मथुरेचा झाला" (का. सं. ग्रं. ३५ पृ. १४२) या प्रेमाबाईच्या ओळीविषयीं कवीपैक्षां कृति अधिक परिचित असेंच म्हणतां येईल आणि- "धांव विभो करुणाकर माधव । देवदयानिधे (का. सं. ग्रंथांक १३) देवकिंनंदन ॥” (का. सं. ग्रंथांक १३)