पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण काव्यग्राहकतेविषयीं महत्त्वाचे नियम हातीं लाग- तील. हा एक मोठा अभ्यास आहे व या अभ्या- साकडे लक्ष ओढण्यापलीकडे प्रस्तुत प्रसंगीं कांहीं करतां येत नाहीं. ११६ मराठी राज्याच्या कालांत महाराष्ट्रांतील सामान्य जनतेमध्यें काव्याभिरुचि काय असते व ती कोणकोणत्या वर्गात कोणकोणत्या प्रकारें असे व त्या निरनिराळ्या वर्गाच्या काव्याभि- रुचीर्चे स्वरूप कसकसे बदलत गेलें हे प्रश्न देखील संशोधनपूर्वक विचार करण्याजोगे आहेत. याविषयीं आज माहिती अगदीच मिळण्याजोगी नाहीं असें नाहीं. पण तसें करण्यास आजचें लोकांत पसरलेलें काव्य गोळा करून पाठी- मागच्या काळाकडे शोध नेला पाहिजे. अनेक दरबारी पत्रांतून कारकुनास अमुक काव्य पाठवा तमुक काव्य पाठवा, अशा तऱ्हेचे उल्लेख पुष्क- ळच आहेत. तथापि ते उल्लेख आज काढल्यानें सामान्य जनांची अभिरुचि स्पष्ट होत नाहीं. कारण हा पत्रव्यवहार जो उपलब्ध आहे, तो दरबारी मंडळींचा आहे. खरेशास्त्री यांनी जे आपले पत्रव्यवहाराचे खंड प्रसिद्ध केले आहेत, ब्यांत पुस्तकें मिळविण्याचे व पाठविण्याचे अनेक उल्लेख आहेत, तसेंच ते राजवाड्यांच्या खंडांतहि आहेत. यावर रा. आबा चांदोरकर एक स्वतंत्र लेख लवकरच लिहिणार आहेत. सामान्य जनांची अभिरुचि त्यांच्यासमोर जे वाड्मय येतें त्यांतून ते जे लोक किंवा पद्ये किंवा अभंग ग्रहण करतात व आपल्या मनाच्या कोठ्यांत सांठवून ठेवतात त्या- वरून व्यक्त होतें. सामान्यजन जें वाङ्मय ग्रहण करतात तें अत्यंत नियमित असतें. सामान्य जन- मनावर कवितेचा गोळाबेरीज परिणाम तेवढा टिकतो. उदाहरणार्थ, कृष्णाचें स्वरूप घ्या. भाग- बताने कृष्णाचें जें बाल्य वर्णिले आहे तें सामान्य जनांच्या मनास अत्यंत आकर्षक होते; आणि त्यांत जें रूप उत्पन्न केलें जातें तें समाज स्वाय- सार्व - तीकृत करतो. तसेंच निरनिराळ्या कवितांमध्ये जीं म्हणीसारखीं वाक्यें उत्पन्न होतात, जनिक होतात. एखादें गाणें सर्वतोमुखीं होतें; तर सर्वतोमुखी झालेलें वाङ्मय शोधून काढून, समाजाची काव्यग्राहकता अजमाविली पाहिजे. कोणतें वाक्य कोठून आलें हें समाजास ठाऊक नसतें. "कठिण समय येतां, कोण कामास येतो" हें मद्रास इलाख्याच्या तामीळ नाडूंत उत्पन्न झालेलें वाक्य इकडे निरक्षर बायकांच्या देखील तोंडीं पुष्कळांनीं ऐकलें असेल! " ब्रह्मा वेडझवा म्हणूनि विभवा देतो अशा गाढवा !" हैं देवनाथाचें वाक्य कोंकणांत देखील जवळजवळ अशि- क्षित अशा ब्राह्मणांच्या तोंडीं देखील मी ऐकलें आहे. समाज ग्रहण काय करतो याविषयीं स्थूलपणें पुढील गोष्टी सांगतां येतील. (१) काव्याचा परिणाम होऊन व्यक्तींच्या भोंवतीं जें तेजोवलय उत्पन्न होतें त्याचें लोण पिढ्यान् पिढ्या पोंच- विलें जातें. (२) ज्या काव्यांगास शहाणपणाच्या वाक्यांचें स्वरूप आहे तें काव्यांग देखील तसेंच पोंचविलें जातें. (३) लोकांच्या नित्यनैमित्तिक व्यवहाराला उपयोगी पडणारें वाड्मय म्हणजे देवावरची गाणी, स्तोत्रें, भूपाळ्या, भक्तिपर अभंग हीं पोचविलीं जातात. (४) जानपद काव्यांत अंतर्भाव होईल अशी रोजच्या व्यवहा- राचीं गाणीं व श्रृंगारिक गाणी ही देखील पोच- विली जातात. आतां पिढ्यान्पिढ्या न पोचविल्या जाणाऱ्या वाङ्मयाविषयीं विचार करूं. जें काव्य गूढ कल्पनांचे असेल आणि दुर्गम असेल तें फार सें टिकतच नाहीं. सामान्य जनतेची वाङ्मयग्रहण- शक्ति अगदीं नियमित आहे. आजकाल दोन आणे, तीन आणे, चार आणे माला रोज वाचल्या जातात. पण त्यांतील गोष्टी लोक वाचल्या- बरोबरच विसरून जातात. म्हणजे तें वाचन