पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कवितापरीक्षणहि होत होतें, त्याशिवाय कवीं- विषयों लोकांत तारतम्य उत्पन्न झालें नसतें. तार- तम्य उत्पन्न झालें हें दिसतच आहे. कारण कांहींचे ग्रंथ लोकप्रिय झाले; व टिकले तर कांहींचे टिकले नाहींत. ज्या ग्रंथांस चिरजीविता प्राप्त झाली त्या ग्रंथांविषयी लोकांत आवड उत्पन्न झाली होती व ज्यांस ती मिळाली नाहीं त्याविषयीं लोकांस आवड उत्पन्न झाली नाहीं हें सरळ सत्य आहे. चिरजीविता हें साध्य आहे आणि इतर गोष्टी केवळ उपकरणात्मक आहेत. "अवश्यक तो शेवट । मागें अवधी ही खटपट । चालों जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ||" प्रस्तावनेंत काव्यपरीक्षण व अभिरुचि यावि- षयीं फार थोडेच लिहावयाचें आहे. जें काय लिहा- वयाचें आहे तें मराठी वाङ्मयाच्या अभ्यासा- संबंधानें होय. मराठी वाङ्मयाच्या अभ्यासास युनिव्हर्सिव्या उत्तेजन देत आहेत तथापि संशो- धक दृष्टीनें वाङ्मयाभ्यासाचें काम युनिव्हर्सि- व्यांतून अजून फारसें सुरू झालें नाहीं. जुन्या वाङ्मयामध्यें अभ्यासावयाचें तें काय असा प्रश्न अजून विचारण्यांत येतो; आणि यासाठी मराठी वाङ्मयाचा अभ्यास किती आणि कसा व्हाव - याचा आहे याविषयीं कांहीं विचार येथें प्रदर्शित करतो. मराठी भाषेचा किंवा वाङ्मयाचा पद्धतशीर अभ्यास करूं इच्छिणारानें संस्कृत पांडित्य दुर्ल- क्षितां कामा नये. किंबहुना संस्कृत वाङ्मयाच्या अभ्यासाच्या पूर्ततेसाठी प्राकृत वाङ्मयाचा अभ्यास अवश्य आहे ही गोष्ट लक्षांत घेतली पाहिजे. वाङ्मय हैं साहित्य आहे. हें साहित्य अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी वापरा वयाचे असतें. ज्यांना मराठी भाषेचें व्याकरण अभ्यासावयाचें आहे त्यांनां संस्कृत व्याकरण व वैदिक व्याकरण अवश्य यावयास पाहिजे. त्या शिवाय मराठी भाषेत आलेलीं रूपें कशी आलीं हें के रूपू वप समजावयाचें नाहीं. त्याप्रमाणेंच मराठी वाङ्मय हें संस्कृत वाङ्मयाचे उत्तररूप आहे हि लक्षांत घेऊन वाड्मयाभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाहीं. मराठीत जे साहित्य सांपडेल तेवढ्यावरच तो मराठी वाङ्मयाचा अभ्यास करतांना केवळ अभ्यास रचतां कामा नये. तर भोवतालची वारंवार घेतली पाहिजे. त्या शिवाय मराठी ग्रंथांचे भावनात्मक व विचारात्मक परिस्थिति लक्षांत ऐतिहासिक स्वरूप समजणारच नाहीं. उदाहर- णार्थ, ज्ञानेश्वराच्या ग्रंथांविषयीं विवेचन करतांना नाथसंप्रदायी एकंदर ग्रंथांत ज्ञानेश्वरी व अमृ- तानुभव या पुस्तकांचें स्थान पाहिले पाहिजे; व असेल त्या त्या भाषांतून वाचले पाहिजे. आणि यासाठीं नाथसंप्रदायी वाड्मय ज्या ज्या भाषांत भगवद्गीतेचे स्पष्टीकरण करतांना भगवद्गीतेस अप- रिचित असा नाथसंप्रदायी विचार घुसडला गेला आहे काय हें पाहिलें पाहिजे; शिवाय माझ्या मतें वाचल्याशिवाय ज्ञानेश्वरीचें ऐतिहासिक कारण ज्ञानेश्वरपूर्वकालीन महानुभावांची गीतेवरील भाष्यें विवरण लक्षांत घेतल्याशिवाय एकनाथाचे भाग- स्पष्ट होणार नाहीं. व महानुभावांचें भागवत- वतविवरण स्पष्ट होणार नाहीं. तर या प्रकारच्या तौलनिक अभ्यासास लागलेंच पाहिजे. या पुस्तकांत "रामदासाचें साहित्यशास्त्र" या नांवाचें एक प्रकरण आहे. त्याविषयीं है सांगि- तलें पाहिजे कीं हें प्रकरण लिहितांना जें विचार- पूर्वक वाचन झाले त्यामुळे दासबोधाचे महत्त्व माझ्या मनांत वाढलें: दासबोध पूर्वी वाचला होता पण त्याचें नवीन विचाराच्या दृष्टीने महत्त्व भासले. नव्हते. हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजात असतां वाचन झाले त्या वाचनात आणि आजच्या वाच -- नांत फरक असणारच. वेद, षड्दर्शनें व धर्म- शास्त्र व इतर शास्त्रीय ग्रंथ यांचे वाचन झाल्या." नंतर जेव्हां आपण मराठी ग्रंथांकडे वळू लागतो 16 MAR 1990 भोरे