पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शास्त्री मंडळींचा परिपाठ होता. तो परिपाठ सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या वर्गात अजून चालू आहे. तो परिपाठ एका पूर्वीपासून आलेल्या सामान्यजनवाङ्मयाच्या तिरस्काराचा परिणाम होता. आणि त्या प्रकारची वृत्ति अजून देखील दृष्टीस पडते. ११५ ब्राह्मणांचें वाङ्मय आणि शूद्रांचें वाङ्मय हा भेद केवळ शृंगारिक वाङ्मयांत होता असें नाहीं, धार्मिक वाड्मयांत होताच. आणि यामुळे संस्कृत स्तोत्रांसारख्या कमी भावनेच्या वाङ्मयाचीच किंवा संस्कृत शब्दमिश्रित प्राकृत वाङ्मयाची ब्राह्मणांत चहा होती. ब्राह्मणांमध्ये संत व भक्त बरेच झाले आहेत पण ब्राह्मणांची एकंदर वृत्ति भक्तीकडे फारशी दिसत नाहीं. पांडित्य आणि भक्ति यांची थोडीशी फारकत दिसते, आणि या फारकतीचा परिणाम काव्याभिरुचीवर होई. जें काव्य संस्कृत शब्दांनी युक्त व प्रतिष्ठित वृत्तांत रचलेलें असेल त्याची ब्राह्मणांत चहा होई. एव- ढेच नव्हे तर जें काव्य गूढ अर्थाचें असेल त्याचा अर्थ सांगण्याच्या पैजा लावाव्यात, एकाने तो गूढ अर्थ उकलून सांगण्याची ऐट करावी, असले प्रकार कोंकणातल्या व त्याप्रमाणे वन्हा डांतल्या ब्राह्मणांच्या ओट्यांवर पंचवीस वर्षा- पूर्वी नेहमी चालत असलेले दिसत असत, व अजूनहि हे प्रकार खुद्द पुण्यामध्ये कांहीं ठिकाणी दिसतात. हें ब्राह्मणवाङ्मय आणि ब्राह्मणेतरवाङ्मय असे जरी भेद केले तरी दोहोंतील अंतर दूर करण्याची क्रिया देखील होतच आहे आणि तिची परंपरा देखील फार जुनी आहे. ब्राह्मणां- तला अशिक्षित वर्ग आणि ब्राह्मणेतर वर्ग या दोहोंमध्ये बौद्धिकदृष्ट्या फारसा फरक नसल्या- मुळें कांहीं वाङ्मय या दोघांना देखील सामा- न्यच आहे. शिवाय सुशिक्षित ब्राह्मणांमध्यें जो गुणग्राहकवर्ग असतो तो अशिष्ट काव्याचा महाराष्ट्राची काव्यग्राहकता देखील स्वीकार करतो. तुकारामाच्या चहात्यां- मध्ये ब्राह्मणवर्गहि होता. तथापि तुकाराम शूद्र म्हणून त्याचे अभंग म्हणू नये अशा तन्हेच्या भावना मधून मधून व्यक्त होत होत्या. तसलीं भावना व्यक्त करणारे एक पत्र राजवा- ड्यांनीं भारतेतिहाससंशोधक मंडळापुढें वाचलें आहे आणि "तुकाराम देहूकर याची ब्राह्मणांत किंमत " असा त्या पत्राला मथळा दिला व त्या मथळ्यामुळे मंडळांत बरीच चर्चा झाली होती. भा. इ. सं. मं. अहवाल १८३८ पृष्ठ १९९ मथळा लेखप्रसिद्धीच्या प्रसंगीं संपादकांनीं बद- लला आहे. नागरवर्गाचें बरेंच वाङ्मय आपणांस उपलब्ध आहे. पण अनागरवर्गाचें अत्यंत अल्प वाङ्मय आपणांस उपलब्ध आहे. नागरवर्गात प्रसिद्ध अशा अनेक ग्रंथांतून अनागर वाड्मय शिरतें पण त्या वर्गातले फारच थोडे वाङ्मय आपल्या हातीं आले आहे. लावण्या, पवाडे हे लोकांत प्रचलित आहेत त्यापैकीं आपल्या हाती फारच थोडे लागले आहेत. तें वाङ्मय मूळ स्वरूपांत हाती लागलेंच नाहीं. त्यावर प्रसिद्ध होतांना बरेच ब्राह्मणी संस्कार होऊन तें प्रसिद्ध झालें आहे. तें अनागरस्वरू- पांत जसेंच्या तसेंच देण्याचा प्रयत्नहि चालू आहे. कै. भाव्यांनीं तुकारामाची गाथा जी प्रसिद्ध केली आहे, तो अनागरवाङ्मय मूळ स्वरूपांत देण्याचा प्रयत्न होय. या प्रकारचा आणखी एक प्रयत्न म्हटला म्हणजे भारतेतिहाससंशोधक मंड- ळामध्ये रा. वा. दा. मुंडले वगैरे मंडळींनी प्रसिद्ध केलेलीं गाणीं होत. ह्रीं गाणीं जेव्हां बरी- चशीं गोळा होतील व लोकांच्या तोंडांत बस- लेली गाणी आणि नागर वाड्मयांतील लोकांच्या तोंडी असलेला भाग हीं प्रत्यक्ष अवलोकन करून नोंदिली जातील तेव्हां प्रचलित वाङ्म- यापैकीं समाजांत कोणतें वाङ्मय जिरून पचनीं पडतें याची बरोबर कल्पना होईल, व लोकांच्या