पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महा dण ११४ एवढेच. येणेंप्रमाणें वाङ्मयोपयोग मोठयाशा हें झाडून साऱ्या देशस्थ ब्राह्मणांचे दैवत बनले ' शहरांतून असे. महाराष्ट्रांत ग्रहण होणाऱ्या वाङ्मयाचा मी वर समाजांत वाङ्मय वापरल्या जाणाऱ्या प्रसंगाचा आढावा दिला आहे तो एकदेशीय म्हणजे शहरांत राहणाऱ्या ब्राह्मण व पांढर पेशा समाजाचा आहे. शेतकरी लोकांच्या दैनिक आयुष्यक्रमांत वाङ्मयोपयोगाचे प्रसंग निराळे असतात, त्यामुळे ब्राह्मणी वाङ्मय व अना- गर वाङ्मय असे वाङ्मयाचे दोन भेद लक्षांत घेऊन पृथकरण केलें पाहिजे. प्रत्येक समाजांत सामान्यजनवाङ्मय आणि पंडितवाङ्मय किंवा उच्चजनवाङ्मय असे वाङ्मयग्रहणाच्या दृष्टीनें भेद आहेत. या भेदांचे कारण केवळ दोघांचे विषय भिन्न किंवा अभिरुची भिन्न किंवा दोघांच्या सभ्यतेच्या मर्यादा भिन्न हैं नव्हतें. त्या भिन्नतेंत कांहीं अंशीं जातिभेदाचा वास येतो. जें वाङ्मय कुणबी वापरतात तें ब्राह्मणांनी कसे वापरावयाचें अशी वृत्ति समाजांत होती व आहे. ब्राह्मणांचे व सामान्य जनतेचें बामय असा भेद वारं वार दृष्टीस पडतो, तो वेदकालापासून आजता- गाईत चालू आहे. मधून मधून लौकिक वाड्म- यावर संस्कार होऊन सामान्य जनांचें जें वाङ्मय आहे तें ब्राह्मणांचें वाङ्मय होत असे. संगीत शास्त्रांत असें झालें आहे कीं, वैदिकांचें साम- संगीत चालू असतांच लौकिक गानास शास्त्र लागून संगीतरत्नाकारादि ग्रंथ निर्माण झाले. त्या संगीतास ब्राह्मणांनी आश्रय दिल्यानंतर सामसंगीत बुडालें. तसाच इतिहास वाड्मयाचा आहे. वैदिक वाङ्मय लोकप्रचारांतून जाण्याची क्रिया सूतवाङ्मयास ब्राह्मणी संस्कार मिळाल्यानें झाली, आणि सूतवाङ्मय म्हणजे महाभारत व पुराणे यांच्यासारखे ग्रंथ हेच ब्राह्मणी ग्रंथ झाले. तीच कथा उपासनापद्धतीतहि झाली. लोकांचीं दैवतें ह्रींच ब्राह्मणांची दैवतें झालीं, आज खंडोबा आहे. ब्राह्मणी वाङ्मय नेहमी उच्च दर्जाचें होतें असें नाहीं; पण त्यांत भाषाशुद्धि जास्त असे, त्यांत मराठी ग्रंथांच्या ऐवजी संस्कृत ग्रंथांचा उप- योग जास्त होई. उदाहरणार्थ, रामरक्षा व संस्कृत स्तोत्रे यांची वाङ्मयाच्या दृष्टीनें व धार्मिक वाङ्मय या दृष्टीनें योग्यता मराठी भक्तिवाङ्म- यापेक्षां कमीच आहे; पण तींच ब्राह्मणांमध्ये प्रचलित आहेत. कुणब्यांचें वाङ्मय अश्लील असतें व ब्राह्म- णांचें नसतें असें नाहीं. ब्राह्मणांचें प्राकृत वाङ् - मय सामान्यतः प्रतिष्ठित दिसतें. पण तो प्रति- ष्ठितपणा भाषेच्या स्वरूपांतच कायतो असतो. वामनाचें राधाविलास, राधाभुजंग या काव्यापेक्षां होनाजी बाळाच्या लावण्या खास अश्लील नाहींत.. उलट अनेक लावण्यांत उत्तम प्रकारचें काव्य सांपडतें. त्यांत जितकें प्रेमी जनांच्या अंतःकर- णांतील उमाळे व्यक्त केले आहेत तितके वाम- नाच्या राधाविलास किंवा राधाभुजंगांत नाहींत. त्यांत नुसतेंच संभोग श्रृंगाराचें वर्णन आहे. लाव- ण्याविषयीं तुच्छता दाखवावयाची आणि वामन- पंडितादि कवींच्या श्लोकबद्ध श्रृंगारिक कवितेला प्रतिष्ठित वाड्मय मानावयाचें हा समाजांतील सांपत्तिक दृष्ट्या व शिक्षणदृष्ट्या कनिष्ठ वर्गाच्या व गरीब जातींच्या तुच्छतेचा प्रकार आहे, दुसरें कांहीं नाहीं. संस्कृत कवी तर प्राकृत कवींपेक्ष फारच अश्लील आहेत. संस्कृत काव्य सामा- न्यांनां समजत नाहीं तेव्हां चार संस्कृत जाण- णाऱ्या मंडळींना आपापसांत अत्यंत अश्लील भाषण करावयास सांपडावें, आपण तसे कर- तांना आपल्याला रसिक म्हणवून घ्यावें, आणि संस्कृतज्ञांच्या कोंडीबाहेर पडल्यानंतर गंभीर मुद्रा धारण करावी, आणि अत्यंत सभ्यपणाच्या गोष्टी बोलूं लागावें, असा हा अव्वल इंग्रजीतल्या 3