पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एक दोन गाणीं प्रत्येक मनुष्यास येत असतातच. पण त्यांच्यांतील उपाध्ये वर्गास पुष्कळच जास्त गोष्टी ठाऊक असतात. आजच्या महाराष्ट्रीयांचें वाङ्मय संस्कृत, मराठी व इंग्रजी या तीन भाषांत आहे. आणि तें अनेक प्रकारचें आहे. प्रत्येक पांढरपेशा महाराष्ट्रीय मनुष्याकडून वापरले जाणारें वामय हें बरेंच असतें. त्याचा आढावा घेऊ. हें विशेषेकरून पंचवीस वर्षापूर्वीच्या पिढी- विषयीं सांगतों. सध्यां स्थिति बदलत आहे अनेक गोष्टींचा लोप होत आहे; व नवीन परि- स्थितीची घडी बसली नाहीं अशी स्थिति आहे. पंचवीस वर्षापूर्वी साधारण स्थिति होती ती येणें प्रमाणे:- (१) अर्भक लहान असतां 'अडगुलं मडगुलं' वगैरे कांहीं अर्थ न समजणारी वाक्यें आईकडून मूल ऐकत असे शिवाय आई मुलाला पाळण्यांत घालून तुळशीखालीं पोथी वाचणाऱ्या रामाच्या कांहीं ओव्या म्हणत असे. (२) लहान मुलगे मुंजीपूर्वी स्तोत्र पाठ करीत, व कांहीं निवडक श्लोक पाठ करीत. कांहीं ठिकाणीं भूपाळ्या सकाळीं म्हणण्याचा प्रघात होता. ११३ महाराष्ट्राची काव्यग्राहकता मंगळागौरीची आरती वगैरे वाङ्मय घालत येईल. "तपेलीची लांब दोरी । तपेली संबळ - पुरी" वगैरे महामंत्र या सदरांतच येतात. महाराष्ट्रीय पांढरपेशा समाजाची गरज म्हणून असलेलें वाङ्मय पण जें धंदेवाईकांच्या हातीं गेलेलें होतें असें म्हटलें म्हणजे- (१) संस्कारप्रसंगी किंवा श्रौतस्मार्त किंवा पौराणिक कर्मे करण्याच्या प्रसंगीं लागणारे मंत्र वगैरे. (२) लग्नमुंजीनंतर घातला जाणारा गोंधळ. या वेळेस पवाडे म्हटले जातात. नैमित्तिक पण धार्मिक किंवा रुढीची सात नसलेलें पण स्वेच्छेचें असें वाङ्मय. (१) जेव्हां चार बायका गव्हले, शेवया कर- ण्यास किंवा वाती करण्यास जमत तेव्हां प्रत्येक बाई आपणांस ठाऊक असलेले गाणें म्हणून दाखवी. असल्या गाण्यांत सीता-सावित्री वगैरेंची गाणीं येत. (२) पुराण व कीर्तन यांचें श्रवण. पुराण व व कीर्तन हीं देवळें व मठ यांशीं संयुक्त असतात किंवा खाजगी होतात. या पुराणांमार्फत रामायण, (३) मुली गाणी पाठ करीत. तीं गाणीं राम, महाभारत व पुराणें व विशेषेकरून महात्म्यें यांची कृष्ण वैगैरेंची असत. ओळख लोकांस होत असे. याशिवाय निश्चयात्मक नित्य वापरले जाणारें कोणतेंच मराठी वाङ्मय सर्वतोमुखीं नाहीं. नैमित्तिक पाठ झालेले वाङ्मय म्हटले म्हणजे आरत्या होत. ब्राह्मणांच्या रोजच्या वाचनांत येणाऱ्या ग्रंथां- मध्यें गुरुचरित्र, दासबोध व शिवलीलामृत हे ग्रंथ होते. मुक्तेश्वर सर्वश्रेष्ठ मराठी असेल पण घरोघर शिरलेलें आख्यानवाङ्मय श्रीधराचें होतें. नित्य बापरल्या जाणाऱ्या संस्कृतवाङ्मयामध्ये संध्या, पुरुषसूक्त व पूजामंत्र यांचा अंतर्भाव करतां येईल. स्त्रियांच्या नैमित्तिक वाङ्मयामध्ये १५ (३) भोजनप्रसंगी म्हणावयाचे श्लोक... पुराण व कीर्तने यांत अनेक प्रकारचे वाङ्मय येत असे. भागवताचे सप्ताह चालत व रामाय- णाचेहि चालत त्यामुळे हे दोन ग्रंथ ऐकवले जातच होते. शिवाय जर कधीं चांगला पंडित आला तर विद्यारण्याच्या पंचदशीवर देखील “पुराण" चालत असे. तसेंच कांहीं कीर्तनांतून कथाभाग मुळींच न येतां केवळ ब्रह्मनिरूपणाच कीर्तनें चालत. जास्त उच्च प्रकारचें जें वाङ्मय आहे. तें खासगी रीतीनें जो तो घरीं वाची. तथापि सामजिक चाल म्हणून आवश्यक झालेलें वाय