पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण करण्यांत आली. व या दोन गोष्टींनों समाजां- तील काव्यशक्तीचा उपयोग झाला व हे दोनहि परिणाम बरेच स्थायी स्वरूपाचे झाले. महानु भाव, जैन, इत्यादि संप्रदायांनी आपापल्या पुरु- षांचा तसाच गौरव केलेला आहे. आतां महाराष्ट्राच्या प्रत्यक्ष काव्यग्रहणाकडे वळू. _काव्याचा खप व काव्यग्रहण या गोष्टी भिन्न आहेत. पुस्तकाचा खप होणें म्हणजे ग्रहण नव्हे ग्रहण म्हणजे वाचनहि नव्हे तर ग्रहण म्हणजे वाङ्मयांनील भाग समाजानें उपयोगी करून घेणें होय; या दृष्टीनें वाङ्मयाचे अवलोकन झालें पाहिजे. • मराठी राज्यांत जरी या दोन बाबतींत काव्याचा उपयोग पुष्कळ झाला, तरी जें काव्य निर्माण झालें, त्यांतील शब्द चीरजीवि झाले नाहींत. काव्यांचा एकंदर गोळा बेरीज परिणाम मात्र चीर जीवि झाला, व पूर्वीची जीं कथानकें होतीं, तीं कथानके ज्या व्यक्तींवर होतीं, त्या व्यक्तींत शिवा- जीमहाराज व संतमंडळी यांखेरीज इतर मंडळाची भर पडली नाहीं, याचें कारण राजपुरुष व कवि यांची एकमेकांच्या कार्य महत्त्वासंबंधानें अनभिज्ञता 'हें तर आहेच, पण दुसरीहि कारणे आहेत. शिवाजी इतकी दुसरी कोणतीच व्यक्ति महाराष्ट्रीय मनां- वर परिणामकारी झाली नाहीं. संभाजीच्या वधा- मुळे त्यास एक तऱ्हेचें कवीस प्रेरणा करण्याजोगें गौरव आलें होतें. परंतु संभाजीकडे लोकांचे लक्ष गेलें नाहीं याचें कारण संभाजीची क्रूर कृति लोकांच्या नजरेंत होती हे होय. संभाजी व कलुषा हे दोघेहि हिंदी कवितेचे आश्रयदाते होते पण मराठीचे नव्हते हेंहि कारण असावें. ताराबा- ईचा पक्ष हा संभाजीच्या वंशपरंपरेच्या विरुद्धच होता. व त्याच्यानंतर पेशवे आले. पेशव्यांस महा- राजपद नव्हतेंच, आणि लोकांची भक्ति त्यांच्या एकंदर वैभवावर जडली नाहीं. बन्याचशा लोकांस ११२ पेशवे केवळ परराज्य आणि परद्रव्य यांचे अभि- लाषीच वाटले. व त्यामुळे त्यांच्याभोवती तेजो- वलये निर्माण झाली नाहींत. असो. ऐतिहासिक वीरपुरुषांस महापुरुषत्व यावें या- शिवाय लोकांची दुसरी गरज होती ती म्हणजे सामान्य उपदेशाचीं वाक्यें होत; तर त्या बाबतीं- मध्ये अनेक काव्यांमधून लोकांनी आपणांस आवडणारे अंश काढून घेतले व ग्रहण केले असा सामान्यपणें लोकांच्या काव्यग्रहणाचा अगदीं स्थूल इतिहास देतां येईल. वस्तूंचा खप हें ग्रहण आहे काय, व तात्कालिक ग्रहण व चिरकालीन ग्रहण या मुद्यांकडे सध्यां वळत नाहीं. महाराष्ट्रीय समाजांत चालू असलेले वाङ्मयग्रहण अधिक तपासले पाहिजे. काव्य हें समाजाची प्राथमिक गरज नाहीं असे पुष्कळांस वाटेल पण तशी स्थिति नाहीं. अगदी रानटी लोकांत देखील काव्य असतें, व चित्र असतें. तें काव्य फार सुंदर असतें अशा- तला भाग नाहीं. आणि तो मनाला चेतना देणारा विषय असतो असेंहि नाहीं. उलंट रानवट, लोकांचीं गाणीं पाहिली म्हणजे तीं देवांची स्तुति, जादू, व्यावहारिक गोष्टी वगैरे सत्रा, पंधरा गोष्टींची भेसळ असते. त्यांच्यामध्ये भक्ति फार असते असेंहि नाहीं. त्यांची देवस्तोत्रे उलट "देवा तूं जर मला हें देखील तर तुला मी तें देईन" म्हणून सांगणारीच असतात. पुष्कळ असंस्कृत लोकांची प्रेमकाव्ये म्हणजे मी तुला काय देईन हेंच प्रेम- पात्र झालेल्या स्त्रीस सांगणारी असतात. अगदीं जंगली लोकांचे देखील वाड्मय बरेंच असतें. त्यांची गाणी, त्यांच्या पूर्वजचरितांच्या कथा, स्तोत्रे इत्यादि गोष्टी त्यांच्यापाशीं असता- तच. त्यांच्या वाङ्मयांत देखील कांहीं वाङ्मय धंदे- वाइकांचें व कांहीं प्रत्येक मनुष्याचें असतें. गोंड वगैरे लोकांमध्ये त्यांच्या बड्या देवाच्या कथा प्रत्येक गोंडास ठाऊक असतात असें नाहीं. पण