पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संस्था १११ होत नाहीं, त्याप्रमाणेंच काव्य आपणांस वस्तू- शिवाय म्हणजे कृतीशिवाय गोचर होत नाहीं. यासाठी काव्याचें भाववाचक वर्णन म्हणजे कवित्व लोक चटकन् ओळखत नाहींत ते कृती- सच ओळखतात. मनुष्यास प्रथमतः वस्तूच दृग्गोचर होते; व सदृश गोष्टी अनेक दिसल्या म्हणजे त्यांत असलेला गुण मनुष्यास कळू लागतो; विचार आणि कथा या गोष्टी लोकांस परिचया- च्याच आहेत त्यांस लोक काव्य म्हणत नाहींत पण त्यांची विशिष्ट तऱ्हेने मांडणी झाली म्हण- जेच लोक त्यांस काव्य म्हणतात, व त्या स्थितीत विचार आणि कथा लोकांस अधिक ग्राह्य होतात. तर काव्याचे कार्य म्हटले म्हणजे समाजाच्या ज्या इतर अनेक गरजा आहेत, त्यांमध्यें माधु- र्याने किंवा दुसऱ्या कोणत्या तरी आकर्षकतेनें ग्राह्यता उत्पन्न करणें हें होय. समाजामध्ये लोकांस उपदेश पाहिजे. लोकांस जी टिकवावयाची असेल, ती संस्था टिक- विण्यासाठी तिच्याभोंवतीं तेजोमंडळ निर्माण झालें पाहिजें, आणि यासाठी त्या संस्थेशी संबद्ध ज्या व्यक्ती असतात त्या गौरविल्या पाहिजेत. समाजास जुन्या आठवणीं राखावयाच्या असतात. तर त्या आठवणी आकर्षक रीतीनें लोकांपुढे आल्या पाहिजेत, यासाठी उपदेश, संस्थासंबद्ध व्यक्ती, जुन्या आठवणी, यामध्यें जो गुण किंवा द्रव्य मिसळावयाचें तो गुण किंवा तदाश्रयी द्रव्य हें काव्य होय. तर समाजांतील काव्य आपलें इष्ट कार्य करीत आहे किंवा नाहीं, हें पहावयाचें म्हणजे ज्या गोष्टी समाजांत अवश्य आहेत, त्या गोष्टी वें संरक्षण करण्याकरितां त्यांसंबंधी वाड्म- यांत काव्य में द्रव्य मिसळलें आहे किंवा नाहीं हें म्हणजे आकर्षकता मिसळली आहे किंवा नाहीं हें पहावयाचें, व त्या दृष्टीने समाजास लागणारें वाङ्मय पुरवीत रहावयाचें. जर हैं कार्य चांगल्या रीतीनें बजावलें गेलें नाहीं तर समाजांतील सी. पं. रा महाराष्ट्राची काव्यग्राहकता कविता कौशल्य उत्तम रीतीनें खर्ची पडलें नाहीं असें समजावें. काव्य या गुणाचा उपयोग अधिक कार्यकारी रीतीनें होण्यासाठी आपण जे प्रश्न उत्पन्न करा - वयाचे ते हे की (१) समाजग्राह्य अशा ज्या गोष्टी आहेत त्यांपैकीं जितक्या अनेक गोष्टींत काव्य मिसळले जाईल, तितक्या अनेक गोष्टींत काव्य मिसळलें गेलें आहे किंवा नाहीं ? (२) काव्य मिसळले गेल्याच्या योगानें जो इष्ट परिणाम व्हावयाचा तो झाला आहे किंवा नाहीं ? या दोन दृष्टीनी विचार केला तर समाजाची काव्यशक्ति उत्तम तऱ्हेनें कारणी लागली नाहीं असें म्हटलें तरी चालेल. स्वराज्यास व स्वसाम्राज्यास कवींनी उत्तेजन दिलें नाहीं व राज्यकर्त्यांनी कवींचें या बाबतीतील महत्त्व ओळखले नाहीं असें शिव- कालोत्तर कालाकडे पाहिलें असतां वाटतें. शिव- काली मात्र कवींचा उपयोग करण्यांत आला. मराठी राज्याच्या स्थापनेनंतर त्या राज्यास स्थैर्य देण्यासाठीं जी गोष्ट अवश्य होती, ती म्हटली म्हणजे शिवाजीसारख्या राज्यसंस्थापकाविषयीं लोकांच्या मनांत आदर उत्पन्न करणे. हा आदर उत्पन्न करावयाचा होता. तो शिवाजीभोंवतीं तेजो- वलय उत्पन्न करण्यासाठी करावयाचा होता. आणि शिवभारतकारांकडून यासाठी शिवाजीला ईश्वरांश किंवा अवतारी पुरुषपणा देण्यांत आला. शिवाजीकालीं जें तेजोवलय निर्माण करण्यांत आलें तें वाढवितां येण्याजोगें होते, ही गोष्ट, या राजघराण्याविषयीं आदर सर्व हिंदुस्थानभर पसरला होता व शाहूस बंगाली काव्य महाराष्ट्र - पुराण यांत नंदीचा अवतार बनविलें होतें याव- रून स्पष्ट होईल. एवंच काव्यगुणाचा शासन- संस्थेच्या अभिवृद्धीसाठीं नियमित कां होईना पण उपयोग झाला तसेंच भक्तिधर्माचे महत्त्व लोकांत स्थापन करावयाचें होतें, यासाठी भक्तां- भोंवतीं त्यांच्या चमत्कारांची तेजोमंडळे निर्माण