पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण परिचित असते; त्यांत त्यांनां पद्यस्वरूपाशिवाय दुसऱ्या गोष्टींतहि कांहीं सादृश्य वाटते; आणि काव्यास काव्यत्व पद्यस्वरूपामुळे न येतां दुस- याच कांहीं गोष्टीमुळे येतें असें ते म्हणूं लाग- तात. काव्य हें गद्य असूं शकते हा नंतरचा विचार उत्पन्न होतो, आणि त्या दृष्टीनें जरी गद्य काव्य हें काव्य आहे असें शास्त्रज्ञ सांगतात तरी त्यास लोक मानीत नाहींत. तें म्हणणें साहित्य- शास्त्रज्ञापाशींच रहाते. जेव्हां आकर्षक असा मजकूर पद्यांत असतो तेव्हां त्याला लोक काव्य म्हणतात. ती रचना “रसात्मक" असली म्हणजे लोकांस आकर्षक होते हें देखील सत्य नसून आकर्षकतेचें कारण शोधून काढण्याचा प्रयत्न आहे. पद्यस्वरूप, उपमा, इतर अलंकार, रस या सर्व गोष्टी वाक्यास काव्यत्व देतील. आकर्षकता हा सामु परिणाम आहे. काव्य जें लोकांस आकर्षक होतें, तें अनेक कार- णांनीं होतें. कित्येकदां सुगम अर्थामुळे काव्य आकर्षक होतें, तर कधीं कधीं गूढ भाषेमुळे होते, ज्ञानेश्वरी हैं काव्य नाहीं तथापि ज्ञानेश्वरींतील बरीच अंगे काव्य आहेत ही गोष्ट कोणी नाकबूल करणार नाहींत. साधीच गोष्ट किंवा साधेंच वाक्य पद्यांत सांगितलें असतां तें लोकांच्या मनांत लव- कर अडकतें व आकर्षकहि होतें. धातूंच्या कारिका किंवा संस्कृत शास्त्रीय ग्रन्थ पद्यमय असतात, म्हणून ते काव्य होत नाहींत, वगैरे म्हणणें खरें आहे आणि काव्य गद्यांत असणें शक्य आहे हेंहि खरें आहे; पण हीं दोन्हीं आत्यंतिक स्वरूपाचीं उदाहरणे सोडून दिली तर काव्याला काव्यत्व येण्यास पद्यमय रचना उपयोगी पडते हैंहि कबूल केलेच पाहिजे. केवळ पद्यमय रचनाच नव्हे, तर अलंकारशास्त्रांत ज्यांस हलके अलंकार समज- तात, असे जे अनुरूप यमकादि अलंकार त्यांची योजना गद्यांत झाल्यामुळे गद्य देखील आकर्षक होऊ शकते. जेव्हां आपण वेश्या, वैद्य, व वकील ११० ही त्रयी उच्चारतों, तेव्हां त्या तीन गोष्टींमध्ये कांही तरी संबंध आहे आणि तो अनुप्रासाचा आहे, एवढेच नव्हे तर दुसरा कांहीं सारखेपणा त्यांमध्ये आहे असा लोकांत आभास होतो. मनु- ष्याच्या वित्ताचे हे तीन चोर, अशी कल्पना ही शब्दत्रयी उत्पन्न करणाऱ्याच्या मनांत वावरत असली पाहिजे. असा अनुप्रासयुक्त शब्दसमु- च्चय तयार झाला म्हणजे तो लोकांत पररतो. तो लोकांत पसरतो याचें कारण त्यांत वकील आणि वैद्य यांच्या उपहासाची भावना असते, प्रास असतो वगैरे अनेक कारणे असतात व यामुळे या तीन शब्दांच्या एकत्र स्थितीस काव्य म्हणतां येईल. लोकांस त्यांनां हें कां आवडतें हें सांगता येणार नाहीं पण ते शब्दसमुच्चय आवडून ते ते पसरवितात हें मात्र खरें. लोकांमध्ये काय ग्रहण होईल या विषयीची वस्तुस्थिति पाहून काव्य- नियम काढण्याची कृति अजून झाली नाहीं. लोक- प्रियता अगर लोकग्रहण या काव्याच्या कसोट्या ठरवून धैर्यानें त्याप्रमाणे प्रत्यक्षमूलक शास्त्ररचना करणें ही क्रिया साहित्यशास्त्रांत अजून व्हावयाचीच आहे. या दृष्टीनें आपणांस अभ्यास करावयाचा झाल्यास पुस्तकांच खप नाटकास गर्दी यांची मोजदाद वगैरे गोष्टी उप- योगी पडतील. समाजाच्या व्यापारप्रामांत काव्य हें जें काम करतें, तें विचार किंवा कथा यांस मोहक करून ती समाजास ग्राह्य करण्याचें होय. ज्याप्रमाणें अन्न ही मनुष्याची आवश्यक गोष्ट आहे पण गोडी ही अन्नग्रहणास साहाय्य करते, त्याप्रमा- णेंच काव्य हें विचार व कथा यांची ग्राह्मता' वाढवितें. विचार, कथा वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींस गोडी ज्या ज्या कारणांनी उत्पन्न होते त्या त्या गोष्टी काव्य होत. तथापि ज्याप्र- माणे आपणांस भाव अथवा गुण पदार्थाने व्यक्त होतो, पदार्थनिरपेक्षगुण आपणांस बुद्धिगोचर