पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तुत विवेचन पुरें आहेसें वाटतें. ब्राह्मणेतर वाङ्मयास ब्राह्मणवाङ्मय करण्याची क्रिया या संस्करणाच्या मागें आहे. तीविषयीं विवेचन पुढे येईलच. प्रकरण १७ वे. महाराष्ट्राची काव्यग्राहकता काव्य आणि ग्राहकता यांविषयी येथे थोडेसे तात्त्विक विवेचन केले पाहिजे. काव्यपरीक्षण हैं परीक्षकाच्या अभिरुचीचें द्योतक आहे आणि लोकांत अभिरुचि उत्पन्न करण्याचें साधन आहे. लोकांची अभिरुचि ही देखील दुय्यमच गोष्ट आहे. ती लोकांकडून जें काव्यग्रहण होतें तें ठरवि- ण्याचे यंत्र आहे. समाजशास्त्रीय दृष्ट्या समा- जाची ग्राहकता अनेकविध व्हावयास पाहिजे व अधिक सुशिक्षित झाली पाहिजे. समाजाकडून होणारें वस्तुग्रहण जसें जास्त कार्यकारी होते तसा तो समाज अधिक समर्थ होतो. उहा हरणार्थ अन्न घ्या. समाज जितकें अधिक पौष्टिक अन्न खाऊं लागेल तितकी समाजाची अन्नप्राह- कता सुधारेल, आणि समाज जर अपायकारक अन्न किंवा पेयें यांचें ग्रहण करूं लागेल तर तितकी त्याची ग्राहकता कमी योग्यतेची ठरेल; यासाठी समाजाकडून जें प्रत्यक्ष काव्यप्रण होते तो विषय चर्चेचा केला पाहिजे. •हाराष्ट्रीय जनतेच्या ज्या अनेक गरजा अस तात त्यांत वाङ्मय ही किंवा काव्य ही गरज कितपत आहे ही गोष्ट आपण जाणली पाहिजे आणि तीवरून समाजाजी या बाबतीतील उच्च- नीचता ठरविली पाहिजे. ज्या समाजाला अधिक वाङ्मयाची गरज आहे तो समाज अधिक विकास पावलेला असें समजण्यास हरकत नाहीं. काव्याची गरज काढतांना काव्याचे सामाजिक कार्य ओळखले पाहिजे. तें कार्य उत्पन्न झालेल्या १०९ महाराष्ट्राची काव्यप्रहिकता काव्यवाड्मयानें जितकें अधिक चांगले होईल तें काव्यवाङ्मय अधिक कार्यकारी होय. महाराष्ट्रीय काव्यग्राहकता तपासावयाची म्हणजे पुढील गोष्टीसंबंधाने विचार करावयाचा- (१) समाजाच्या एकंदर व्यापारसमूहांत काव्य हें कोणतें कार्य करतें- (२) काव्याचा जो हेतु असेल तो हेतु काव्याच्या एकंदर कार्यात समाविष्ट होतो काय? तो हेतु जास्त कार्यकारी होण्यास काय करावें लागतें. (३) काव्य नांवानें जी कृति उत्पन्न होते तिचें समाजाकडून ग्रहण होते काय? म्हणजे तें काव्य समाजाच्या मनोरचनेचा भाग होते काय? (४) वस्तूचा खप हें ग्रहण आहे काय? (५) समाजाकडून जें ग्रहण होते त्यांत तात्का- लिक ग्रहण कोणतें व चिरकाल ग्रहण कोणतें. या प्रश्नांस उत्तरें येणेप्रमाणे देतां येतील.- समाजांतील काव्याचें कार्य काय हें सांगाव- याच्यापूर्वी काव्य याचा अर्थ कांहीं तरी निश्चित आहे असे गृहीत धरावयास पाहिजे, आणि कित्येक असे म्हणतील कीं काव्य या शब्दाची कायमची व्याख्या तर ठरलीच नाहीं. आपल्या- कडे तरी बऱ्याच लोकांचा "वाक्यं रसात्मक काव्यं" इतपत विचारनिश्चय झाला आहे. इंग्रज साहित्यशास्त्रांत तितपत देखील निश्चय झाला नाहीं. तर मग काव्य समाजांत काय कार्य करतें याचें विवेचन कसें करणार ? याला उत्तर असें आहे कीं, व्याख्या जरी लोकांस करता आली नाहीं तरी अमुक कृति काव्य आहे काय हैं लोकांस समजते. स्त्री सुंदर आहे किंवा नाहीं हें लोक सांगू शकतात. त्यांस सौंदर्याची व्याख्या करतां येत नाहीं; पण तशीच ही गोष्ट आहे. तर प्रस्तुत प्रसंगी काव्य काय आहे या वादांत न शिरतां भी "लोकांस आकर्षक अशी द्य रचना" या अर्थानें हा शब्द वापरीत आहें एक- ढेंच सांगतो. पद्यमय काव्य लोकांस अगोदर