पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ही कृति सर्व देशांत आणि सर्व प्रकारच्या वाड्मयांत होते. जे पुस्तक मरत नाहीं तें बद- लत जातें असें म्हणतां येईल. जर ग्रंथ पिढ्यान्- पिढ्या लोकोपयोगी राहूं लागला तर त्याचे स्वरूप बदललेच पाहिजे. ज्ञानेश्वर, नामदेव इत्यादि कवींच्या अभंगांची भाषा आपणांस जितकी जुनाट वाटावी तितकी वाटत नाहीं. याचे कारण त्या अभंगांची लोकप्रियता आणि तीमुळे ते अभंग वापरणारांकडून झालेला बदल होय. महाभारत हा मूळचा सूतवाङ्मयांतील ग्रंथ हा आज ब्राह्मणांच्या भाषेत प्रसृत झाला आहे. आणि त्यामुळे मूळ ग्रंथाचें शिष्टीकरण करण्याची क्रिया आज हजारों वर्षे चालू आहे. व अनेक ठिकाणी मूळांत फेरफार करण्याची क्रिया नवीन नवीन संपादक करीत आहेत. त्यांत असेंहि झालें आहे की, कित्येक ठिकाणी महाभारतांत भाषेचें संस्कृतीकरण करण्यासाठीं संपादकांनीं मूळांत फेरफार केल्याची उदाहरणे पुष्कळच सांपडतात. मूळ महाभारतामध्ये दोन शब्दांचे संधी करण्या- कडे दुर्लक्ष होते. उत्तरकालीन हस्तलिखित लेखक आणि संपादक व विशेषेकरून आवृ - त्तीकार हा दोष काढून टाकीत. अक्षरें कमी होतात म्हणून हि किंवा च, असें अक्षर मध्येच घुसडीत. मूळ महाभारतांत अनेक ठिकाणी प्राकृत रूपें जशींच्यातशीच ठेवून दिलीं असावीत, पुढे तीं प्राकृत रूपें काढण्याचाहि प्रयत्न झाला आणि त्यांच्या जागीं संस्कृत शब्द घालण्यांत आले. असें करतांना वृत्त चुकूं लागलें. उदाहरणार्थ " होत्ति" चें "भवति" होऊं लागलें तेव्हां नऊ अक्षरांचा अनुष्टुप् दिसूं लागला. या तऱ्हेने महाभारताचें संस्कृतीकरण अनेक शतके किंवा सहस्रके चालूच आहे. महाभारताच्या भाषेसंबंधाने डॉ. सुखटण- कर यांच्याकडून जेव्हां पंडितलेख बाहेर पडेल " तेव्हां सूत जातीच्या मनुष्याने लिहिलेल्या ग्रंथाचें शिष्टीकरण करण्यासाठी व्याकरणशुद्धता पाहूं इच्छिणाऱ्यांनी काय काय फेरफार केले हैं आप- णांस सविस्तर समजेल. मूलपाठसंशोधनार्थ जो परिश्रम होतो त्याचा उपयोग दोन तऱ्हेचा आहे. कवीचा मूळ ग्रंथ कसा होता हे शोधणे महत्त्वाचे आहेच, पण तें संशोधन झाल्यानंतरहि पाठभेद आणि क्षेप यांचे साहित्य निरुपयोगी होत नाहीं. त्याचा वाड्मया- भ्यासास जो उपयोग होतो तो ग्रंथोत्पत्तीच्या पुढील काळच्या सामाजिक आणि बौद्धिक गरजां- मुळे झालेले फेरफार समजावून देण्यास व जुनें अशिष्टांचे वाङ्मय शिष्टांचे कसें झालें हें सांग- ण्यास आणि काव्य या दृष्टीने लोकांनी त्यांत फेरफार कसे केले हे स्पष्ट करण्यास होतो. भव- भूतीच्या उत्तररामचरित्रांत "रात्रिरेवंव्यरंसीत् " असें होतें व पुढे कालिदासाच्या आग्रहावरून " रात्रिरेवव्यरंसीत्" असें भवभूतीनें केलें ही कथा प्रसिद्ध आहे. ती देऊन तिची असत्यता विष्णुशास्त्री चिपळुणकरांनी दाखविली आहे. आपणांस त्या कथेवरून निराळीच एक गोष्ट दिसते. जुन्या कवितेत फरक करून तो फरक आख्यायिकांनी फरकांभोवती गौरवाचे वातावरण करून समाजाच्या पचनीं पाडण्याचा प्रयत्न या कथेंत दिसून येतो. कालिदास व भवभूति व यांच्या- सारख्या व्याकरण - अलंकार पाहून काव्य लिहिणा- ऱ्यांच्या काव्यामध्ये फरक करण्यास जर काव्य चहाते सोडीत नाहींत, तर व्याकरण व अलंकार यांच्याकडे कमी दृष्टि ठेवणाऱ्या कवींच्या ग्रंथांस त्यांचे चहाते संस्करण केल्याशिवाय कसे सोडणार. असो. मराठी ग्रंथांचे पाठभेद व संस्करणें या विष- यावर माझा अभ्यास झाला नाहीं, तथापि काव्य- संस्करणाचे अनेक मासले मी पाहिले आहेत. त्याविषयीं येथे जास्त विवेचन करीत नाहीं. पाठ- भेदांचा आणि संस्करणाचा अभ्यास हैं एक महत्त्वाचें क्षेत्र आहे, एवढे दाखविण्यासाठींच