पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कीर्तनभाग कांहीं सांगून व त्यांत रामदासांच्या कांहीं अभंगांचे अवतरण करून शेवटचा भाग महिपती पुढीलप्रमाणे वर्णितो. या वर्णनांत एक नाथी भागवताची छटा स्पष्ट उमटली आहे- 66 ' ऐसा समर्थांचा कीर्तनगजर । प्रासादिक अभंग वरच्यावर । कर्म उपासना साचार । अनुभव प्रकार ज्ञानाचा ॥२८॥ वेदांत आणि सिद्धांत । यांचाहि निश्चय केला समर्थे । तटस्थ झाले सकळ पंडित | उत्तर तयांतें सुचेना ||२९|| तयांसि म्हणती रामदास | महाराष्ट्रभाषा गौण दिसे । परी प्राकृत आणि संस्कृतास । अर्थ दिसे सारखा ॥१३०॥ तथापि संस्कृत वाचिलें पुराण । परी अर्थ प्राकृत लागे सांगणें । जसें रायाचें महत्त्व जाण । प्रजेवांचून न वाढे ॥ ३१ ॥ लाह निःशेष त्यागितां जाण | तरी न कळे परिसाचें महिमान । छप्पन्न भाषा ईश्वरानें । आधींच निर्मोन ठेविल्या ॥३२॥ परी रामकृष्णादि नामें पाही । या शब्दांचा पालट नाहीं । जे त्यास वाल्मीकि महाकवी । पुराणी ग्वाही बिचारा ॥३३॥ संस्कृत वाणी केली देवें । आणि प्राकृत चोरापासोनि नव्हे । असें सर्वज्ञीं न म्हणावें । हें अनादि आघवें स्वतः सिद्ध ॥ ३४ ॥ प्राकृत न बोलतां साचार । तरी पुराणिकांचें पोट न भरे । ऐकोनि समर्थांचें उत्तर । पंडित सर्व हांसती ॥ १३५ ॥ " ही सर्व कथा मौजेची आहे खरी पण तिच्या विश्वसनीयतेसंबंधानें प्रश्नच उत्पन्न होईल. गागा - भट्ट हे शिवाजीचे पुराणीक बनले होते अथवा होऊ पहात होते असे या कथेंत दर्शविले आहे. ती कल्पना खरी धरण्याचें कारण नाहीं. गागा- पंडित महाराष्ट्रांत किती वर्षे होते यासंबंधाने पक्की माहिती नाहीं. शिवाजीच्या राज्याभिषेकाच्या वेळीं ते आले असावेत आणि कांहीं काळानंतर गेले असावेत; शिवाय भक्तमंडळी आपल्या गुरूचे गोडवे गातां गातां त्यास लघुख कसे देतात याचीहि ही कथा निदर्शक आहे. शिवाजीच्या १०७ अशिर वायाचे शिष्टीकरण राज्याभिषेकाच्या नंतरच्या कालांत म्हणजे राम- दासस्वामींची कीर्ति चोहोंकडे पूर्णपणें प्रस्थापित झाली होती अशा काळांत गागाभट्टाचे गर्वहरण करण्यासाठीं रामदासस्वामी आपलें स्थान सोडून मुद्दाम शिवाजीच्या शहरांत जातील हेंहि संभाव्य वाटत नाहीं. रामदासस्वामींचा हा परिपक्क बुद्धीचा आणि संपादितकर्तृत्वाचा काळ होता, आणि या काळांत आपल्यासंबंधानें कांही लोक विरुद्ध मत देत आहेत एवढ्यासाठीं धांवून आपले महत्त्व स्थापण्यासाठीं जायें अशी रामदासांची वृत्ति असेल असें सांगणें म्हणजे रामदास अत्यंत दुर्बल मनाचे होते असे दाखविणें आहे. ही कथा जरी अविश्वसनीय आहे तरी ती कथा त्या काळच्या पंडित वर्गाच्या मनोवृत्तीची दर्शक आहे यांत शंका नाहीं. ब्राह्मणवाङ्मय व प्राकृतजनवाङ्मय हीं भिन्न होऊं लागलेल्या काळाच्या मनोवृत्तीची ही कथा निदर्शक आहे. ब्राह्मणवाङ्मय आणि ब्राह्मणेतरवाङ्मये यांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधाची हकीगत पुढे येईल. प्रकरण १६ वै. अशिष्ट वाङ्मयाचें शिष्टीकरण लोकांच्या काव्याभिज्ञतेचा ग्रंथांवर एक परि- णाम आपणांस चोहोंकडे दिसून येतो. तो परि- णाम म्हटला म्हणजे, ग्रंथकाराने जें लिहिलें असेल त्याचें शिष्टीकरण होय. जेव्हां एखादें काव्य सामान्य जनांत उद्भूत होतें तेव्हां त्यांत ग्राम्य भाषा किंवा जानपदभाषा असण्याचा संभव असतो. अश्लील शब्द व खेडवळ भाषा हीं काढून टाकून व्याकरणशुद्ध वशिष्टवर्गाची भाषा आंत घातल्यानंतर पोलोकांत अधिक प्रसूत होतो, आणि जेव्हा काव्य लोकांना आवडूं लागते तेव्हां त्या काव्यस सुशिक्षित वर्गात प्रसृत करण्या- साठीं ठाकठिकी आणण्यांत येते.