पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/११९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण १०६ ब्राह्मण रायासि पुसत । कोणतें शास्त्र, सोडिला ग्रंथ । संस्कृत किंवा प्राकृत । हें मज त्वरित सांगावें ॥ ७१ ॥ राजा सांगत ये क्षणीं । दास- बोध केला समर्थांनीं । पंडित म्हणे प्राकृत वाणीं । ऐकतां श्रवणीं महादोष ॥ ७२ ॥ तुज जे इच्छा असेल मनीं । तें मी सांगतों व्यासवाणी । तरी महाराष्ट्र ग्रंथ आजपासोनी । देई टाकोनी नृपनाथा ॥ ७३ ॥ स्त्री-शूद्रं इतर जन । प्राकृत ग्रंथ त्याजकारणें । ब्राह्मण क्षत्रियांसि पुराणें । जीं द्वैपायनें वर्णिलीं ॥ ७४ ॥ यावरी राजा उत्तर देत । त्यासी ह्रीं वेदशास्त्राचे संमत । येथे बहुत जडली प्रीत । तुम्ही ग्रंथ समस्त पहावा ॥ ७५ ॥ ऐसें वदतां नृपनंदन | पंडित जाहला कोचाय- मान । रायासि म्हणे आजपासुनि । न सांगो पुराण तुज घरीं ॥ ७६ ॥ इतकें बोलोनि ते अव- सरा। पंडित गेला आपुल्या घरा । परी त्रिकल्प नये रायाच्या अंतरा । गुरुभक्त पुरा तो एक ॥ ७७ ॥ इतुका निषेध पडतां तेथ । हा समर्थासि कळला वृत्तांत | मग समुदाय घेउनि समस्त । येउनि बागांत उतरले ॥ ७८ ॥ मग स्नानसंध्या सकळिकांनीं । करोनि बैसले उपवनीं । इकडे राजा उदित मनीं । दर्शनालागी जावया ॥ ७९ ॥ तों जासूद आले वेउन मात । समर्थ उतरले बागा आंत । राजा घाबिरा तव्हां उठत । पायीं चालत अनवाणीं ॥ ८० ॥ अष्टप्रवान पायीं धावत । नगरवासी निघाले समस्त ! वैदिक पंडित ब्राह्मण बहुत । दर्शनासि त्वरित चालले ॥ ८१ ॥ नावे उभा राहुन तेथ | मंडळी विलोकीं नृप नाथ । तो गागापंडित नाहीं दिसत । मग आज्ञा करित प्रधानां ॥ ८३ ॥ मग घोडा कारकून देउनि त्वरित । निरोप सांगे नृपनाथ । म्हणे समर्थांचे भेटीस त्वरित । या बागांत लवलाहें ॥ ८४ ॥ स्वार घरासि जातां पाहे । पंडित तयासि म्हण ताहे । आतां भोजनाचा असे समय । येतां नयोच यास्तव ॥ ८५ ॥ समर्थ आले नगरांत पाही । भेटीस येऊ कीर्तनसमयीं । निरोप घेउनि लवलाही । रायासि सर्व सांगितला ॥ ८६ ॥ .. यानंतर समर्थांचा सत्कार शिवाजीनें कसा केला, इतर ब्राह्मणांनी कला केला इत्यादि कथा सांगून समर्थांचे कीर्तन महिपती वर्णन करतो. येउनि सत्वर । विप्रांसि केला नमस्कार । देख- रामदास कीर्तनास बाहेर आले तेव्हां "समर्थ तांचि उठले द्विजवर । आनंद थोर मानसी ॥१०९॥ विद्यागर्व त्याचें मनीं । यास्तव फुगोनि बैसला " गागापंडित अभिमानी । उठला नाहीं तये क्षणीं पुढे रामदासांनी कीर्तन आरंभले. " श्रीराम माझा सिद्धांतवक्ता । रघुराज माझा सिद्धांतवक्ता । श्रीराम माझी प्रसाद कविता । आणिक सर्वथा असेना ॥ ११९ ॥ ऐसे म्हणोनि तये वेळीं । नामघोषें पिटिली टाळी । जय- जयकार केला सकळीं । नाद निराळी कोंदला ॥ १६ ॥ समर्थ उभे राहिले जेव्हां । सभा तटस्थ झाली तेव्हां । कीर्तनरंग वाढवला बरवा | काय सांगावा निजमुखें ॥१७॥ वेदशास्त्राचेनि संमतें । नाममहिमा वर्णिला बहुत । मुखे बोलोनि श्रीभागवत । प्रांजल अर्थ सांगती ॥ १८ ॥ ऐकोनि गागापंडित म्हणत । हा तरी मानवी नव्हे समर्थ | दृष्टीने स्वरूप न्याहाळित । तो दिसे साक्षात् मारुती ॥ १९॥ मग कर्माभिमान विद्याभिमान । ज्ञानाभिमान सोडला तेणें । अनुताप धरोनियां मनें । करितसे नमन रामदासा ॥१२०॥ समर्थे उठवोनि वरच्यावर । आलिंगन देत दोन्ही करें । पंडित बोले मधुरोत्तरें । तूं साक्षात् अवतार मारुतीचा ॥२१॥ विश्वोद्धार कराया निश्चितीं । सगुण अवतार दिसतो क्षिती । परी तूं केवळ ब्रह्ममूर्ति । निश्चय चित्तीं बाणला ॥२२॥ मग समर्थे हातीं धरोनि त्यांस । सन्मुख बैसविलें पंडितास । हें चरित्र देखतां विशेष । रायासि उल्हास वाटला ॥२३॥ 1