पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महत्त्वाचे विचार महाराष्ट्रीय लेखकांच्या लेखणी- सून कोणत्यानां कोणत्या तरी पुस्तकाचें निरीक्षण करतांना व्यक्त झालेच आहेत. अनेक परीक्ष- गांत कांहीं महत्त्वाचे विचार व्यक्त झालेले अस- तात तर कांही किरकोळ दोष दाखविले अस- तात; ते किरकोळ दोष व चुकीनें ग्रंथकारास दिलेले दोष हीं सोडून दिली. व शंभर दीडशे परीक्षणे गोळा केली आणि त्यांतील तात्त्विक विचार निवडून मांडला तर काव्यपरीक्षणात्मक एक उत्तम ग्रंथ तयार होईल, व त्याबरोबरच गेल्या पन्नास वर्षांचा वाङ्मयात्मक इतिहासहि देतां येईल. ज्याप्रमाणे कायदा शिकतांना खट- त्यांचे निवाडे घेऊन कायदा शिकण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे साहित्यशास्त्र शिकावयाचें तें प्रसिद्ध आणि परिचित ग्रंथांवर झालेल्या टीकांचा संग्रह करून अभ्यासकाने का शिकूं नये ! टीका जर चांगल्या नसत्या तर गोष्ट निराळी. तथापि मराठीमध्ये पुस्तकपरीक्षण चांगल्या प्रकारचे झालें आहे असे दिसून आलें. दुष्टबुद्धीने आणि ग्रंथकाराच्या हेतूचा विपर्यास करून मुद्दाम खोटें लिहिणारे परीक्षण जरी अनेक ठिकाणी दिसतें तरी त्याबरोबर प्रामाणिक टीकाहि पुष्कळच झाली आहे व प्रामाणिकपणा व शोधकवुद्धि जेथें व्यक्त झाली आहे अशी टीकाहि पुष्कळच झाली आहे. हा संग्रह तयार होत असतां काव्यपरीक्षणाची जाहिरात दिली. व जाहिरात देतांना मुख्यतः अर्वाचीन परीक्ष- णेंच देण्याचा विचार होता. आणि ती परीक्षणें देतांना परीक्षणदृष्टि कोठें चुकली याविषयीं टीपाहि द्यावयाच्या होत्या. तथापि जाहिरात प्रत्यक्ष लिहितांना असें चाटूं लागलें कीं जुन्या मराठी ग्रंथकारांमध्ये जी काव्यचिकित्सात्मक बुद्धि दिसून येते तिचा आढावा घेऊन नंतर अर्वाचीन काव्यपरीक्षण मांडावें. तथापि जुन्या ग्रंथकारांच्या मार्मिकतेविषयी लिहितांना - लिखाण लांबलें. जें केवळ बीसपंचवीस पानांत आटपावयाचें होतें तें साठसत्तर पानांपर्यंत वाढले असे दिसून आले तेव्हां जुन्या कवींनीं व लोकांनी दाखविलेल्या ग्रंथाभिरुचीचा आढावा लांबविला. अर्वाचीन टीकाकारांच्या टीकाचा संग्रह होऊन तो तसाच पडला आहे. ताहि प्रमाणाबाहेर वाढला. जुन्या कवींच्या मार्मिकतेविषयीं जें लिखाण झाले त्यानेच हें पुस्तक भरलें आहे; तर अर्वाचीन टीकाका- रांचा संग्रह विद्यासेवकाची सुमारे तीनशे पानें व्यापील असें दिसतें, तो संग्रह आतां स्वतंत्रपणे छापून काढण्याचा विचार आहे. त्तरकालीन आहे. तरी त्या पूर्वीच्या काळी ग्रंथ- ग्रंथपरीक्षणपद्धति अर्वाचीन म्हणजे मुद्रणो- निंदक वर्ग त्याप्रमाणे प्रशंसा करणारा वर्ग हे परीक्षण होतेच; मनुष्यास मतेहि असतातच. दोन्ही या समाजांत आहेत त्या समाजांत परी- क्षण नाही असे कसे म्हणतां येईल? जर परी- क्षण स्पष्ट शब्दांनी व्यक्त होत असले तर म अप्रत्यक्ष कसे व्यक्त होतें तेंच गोळा करून मुद्रणपूर्वकाळाचें परीक्षण मांडले आहे. हें परीक्षण मांडतांना लेखकवर्गाने व्यक्त केलेली वृत्ति जरी प्रामुख्यानें मांडली आहे तरी लेखकवर्गाबाहेरची जी जनता आहे तिचे परी- क्षण देखील विचाराचा विषय केला आहे. नाट- कास जाणारा प्रत्येक प्रेक्षक नाट्यपरीक्षक असतो तो त्याच्याविषयीं पसंति कृतीनें व्यक्त करतो. उपाहारगृहांत जाऊन फराळ करणारा मनुष्य भोजनपरीक्षक असतो; त्यास खाद्यांत कमजास्त काय झालें हें सांगण्याइतकें, पाकशास्त्र समजत नसेल; तथापि आपणांस खाद्य आवडतें की आव- डत नाहीं हें सांगण्यास तो समर्थ असतो हैं खास. त्याप्रमाणेच ज्ञानेश्वराच्या कालापासून आजपर्यंत जी सव्वासहाशे वर्षे झाली तितक्या काळांत कवित्व होत होते त्याबरोबर सामान्य जनतेकडून