पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण काव्य असेल काय अशी आपणांस शंका उत्पन्न होते. व आज आपणांस त्यांच्या कर्तृत्वनिश्चयास साधनेंहि फारशीं नाहींत महिपतीनें दिलेले उतारे त्या त्या बाबत कर्तृत्वनिश्वयास मदत करतील. महिपतीनें जे अभंग अगर श्लोक रामदासांनी अमुक प्रसंगी म्हटले किंवा केले म्हणून सांगितले तेवढ्या करून रामदासांनी ते श्लोक केले असतील इतकें देखील खात्रीनें म्हणतां येत नाहीं. आणि ते विशिष्ट प्रसंगीं तयार झाले असे मुळींच सांगवत नाहीं. तथापि महिपति सांगतो तो ग्रंथभाग त्यावेळेस रामदासाचा म्हणून समजला जात होता एवढेच म्हणता येईल. पण ही गोष्ट देखील थोड्या महत्त्वाची नाहीं. स्फुट अभंगाच्या कर्तृत्वाच्या निश्चयाचा प्रश्न फारच कठिण आहे. एखादें आख्यान सपाटून वाढण्याचा संभव नाही. त्यांत अंतर्गत संगति पहावी लागते व . श्क्षेपक श्लोक आंत शिरले तर ते अगदी बेताने शिरण्याचा संभव असतो. पण जेव्हां कविता स्फुट प्रकारची असते तेव्हां प्रकाश- काच्या हाताशी येईल ती कविता गायेंत दडपली जाण्याचा संभव असतो. सर्वच गाथा शंकास्पद आहेत आणि अशा प्रसंगीं ग्रंथकर्तृत्व तपास- ण्यासाठी जितकी मदत मिळेल तितकी हवी आहे आणि यासाठी कथा व उतारे ही दोन्ही एकत्र देणाऱ्या ग्रंथांचा उपयोग मोठा आहे. महि- पतीनें आपल्या ग्रंथांत अवतरण केलेले उतारे सर्वच फुटकळ नाहींत तर कहीं जास्त लांब अशा काव्याचे भाग आहेत आणि यामुळे ज्यांतून उतारा घेतला तें प्रकरण खरोखरच राम- दासाचें आहे असें समजण्यास कांहीं तरी आधार आहे. दासविश्रामधाम हें जितपत ग्रंथाच्या कर्तृत्व संशोधनाला प्रमाण म्हणून उपयोगितां येईल तितपत तरी हैं महिपतीचें संतविजय रामदासीय ग्रंथनिर्णयास उपयोगी पडेल यांत शंका नाहीं. संतविजयांत रामदासाच्या रसाळ कीर्तना विषयी वर्णने आहेत, तसेंच इतर समकालीन १०४ साधूंविषयीं उल्लेख आले आहेत. वामनाच्या कवि- त्वाविषयीं " वामन उठले कीर्तनास । जो कलियुगामाजीं अवतरला व्यास | कवित्वीं रस निरुपम" ( अ. २३ वा ). असे उद्गार काढले आहेत. . संतविजयांत रामदासांचे उतारे आहेत, वाम- नाचे उतारे आहेत, वेणुबाईचे, बहिणाबाईचे व आकाबाईचे अभंग अवतरले आहेत. पण या अभंगांत त्यांचे नांव नसून 'दासम्हणे' असें कित्येक ठिकाणी आहे. " संकल्प विकल्प होय नोहे बाटे तेंचि मन खोटें काल्पनीक । अहंकारासवें देह चालताहे दास म्हणे पाहे अनुभवें । " हा अभंग अकाबाईचा म्हणून दिला आहे पण शेवटीं 'दास म्हणे' असे आहे. वेणुबाईच्या म्हणून दिलेल्या पुढील अभंगांत तोच प्रकार आहे. हाता चढे सर्व वेदशास्त्रबीज गुरु गूज गुह्य योगीयांचें । योगियाचें गूज सहजसहज दास म्हणे नीज ठायीं पडे. ॥ " तथापि प्रत्येक ठिकाणीं दास म्हणे असेच शब्द नाहींत. " परलोकीं पुण्यशील होती धन्य रामदासी मान्य हरिभक्ति " यावरून असें दिसतें कीं दास म्हणे असें अभंगांत केवळ रामदासच घालीत होते असें नाहीं तर रामदासांच्या शिष्यांनी देखील आपल्या गुरूचें म्हणणें आपल्या अभंगाच्या शेवटीं सांगावें ही गोष्ट महिपतीस स्वाभाविक वाटत होती आणि रामदासांचें नांव शेवटीं असतांहि ते अभंग राम- दासाचे नसून त्याच्या शिष्यांचे असणे शक्य