पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०३ JAIN 1077 महपति आणि मोरोपंत यानंतर ग्रंथाची प्रसिद्धि कशी झाली तिचें निदर्शक नसून वस्तुस्थितीचा निदर्शक असावा स्वरूप महिपति वर्णितो- " गीतगोविंद ग्रंथ केला । तों सकल लोकीं लिहून नेला | पाठ करून हरीची लीला । घरों- घरीं गाताती ॥ १५ ॥ " त्या ग्रंथाच्या जगन्नाथपुरीच्या • राजाला योगानें मत्सर झाला असं महिपती पुढे सांगतो. त्यानेंहि जयदेवाच्या ग्रंथासारखाच एक ग्रंथ केला आणि “त्या ग्रंथाच्या करूांने प्रती । लोकांस पाठवी भूपति । म्हणे पाठ करावा समस्तीं । या ग्रंथाचा निधीरं ॥१८॥” पण त्यामुळे ब्राह्मण रागावले आणि त्याची निर्भर्त्सना करिते झाले आणि पुढें दोहोंमध्ये चांगला ग्रंथ कोणता यावर दैवी निकाल मागावा असें ठरलें. दोन्ही ग्रंथ देवापुढें ठेवले गेले. जो ग्रंथ देव स्वीकारील तो चांगला या पद्धतीनें उच्चता ठरवावी असे राजानें सांगितलें. पंडितांस देखील तें मान्य झाले पण दुसऱ्या दिवशी सकाळीं “जयदेवाचा ग्रंथ उत्तम । जवळी ठेवी पुरुषोत्तम ॥ राजाचा अवमानून परम । टाकिला बाहेर देखती ॥ ३०॥” पण पुढे जेव्हां तो राजा आत्महत्या करावयास निघाला । तेव्हां “राजयाचे ग्रंथांतून | चोवीस श्लेक घेतले जयदेवाचे ग्रंथीं लिहून | तत्काळ ठेवी जगज्जीवन || राजयाचें समाधान । इतुकेन झालें तेधवां ॥ ४८॥" या प्रकारच्या आख्यायिकांवरून काय काढा- वयाचें ? गीतगोविंदांत चोवीस श्लोक राजाचे आहेत ते कोणते ह्याची चौकशी करण्याचे कार- च नाहीं कारण त्यांत चोवीस श्लोकच नाहीत. गीतगोविंदाचें अवलोकन महिपतीनें केलेले नसावें हैं या २४ श्लोकांच्या उल्लेखावरून "गीर्वाण भाषा ने भी" (अध्या. १. ओ. ८) म्हणून महिपति जो कबूलीजबाब देतो तो सौजन्याचा हैं उघड होतें. संत विजय या पुस्तकांत फक्त रामदासचरित्र आहे. तें भक्तविजयांत आहे पण या ग्रंथांत संतवचनाचां आधार, अधिक देत आहे. या चरित्रांतील दोन ठळक गोष्टींकडेसच लक्ष ओढतों आणि त्या गोष्टी म्हटल्या म्हणजे महिपतीसारख्या चरित्रकाराचा ग्रंथकर्तृत्वानेर्णयास उपयोग या ग्रंथांत दिसून आलेला नागर आणि अनागर वाङ्मयाचा संबंध या होत. या चरित्रामध्यें मधून मधून रामदासाची काव्यें घातली आहेत व रामदासाचे चमत्कार, त्याची व मारुतीची भेट व त्यास मोह घालण्यासाठी प्रयत्न इत्यादि ग वर्णिल्या आहेत. दहाव्या अध्यायांत रामदास तुका- रामसंबंध आणिला आहे व तुकारामाचें कीर्तन ऐकून रामदासांनी कीर्तन केलें वगैरे सांगितलें आहे. चौदाव्या अध्यायांत गागाभट्टाची मराठी ग्रंथाविषयीं तुच्छता दाखविली आहे. यांत राम- दासाचा द्वेष कोण करीत असत, वेणूबाई रामदा- सांच्या नादी लागली त्यामुळे तिच्यावर आईबा पांचा कसा क्रोध झाला वगैरे गोष्टी घातल्या आहेत. यांत रामदासाच्या काव्याविषयीं जी अभिज्ञता दाखविली आहे ती सपाटून उतारे घेऊन दाखविली आहे हे उतारे एकतर रामदासांच्या चरित्रावर किंवा मनोवृत्तीवर किंवा तत्त्वज्ञानावर प्रकाश पडणारे आहेत. वाचतांना उतारे समर्पक आणि योग्य असेच वाटतात. रामदासाचीं जीं काव्ये आपणापुढे एकदम संपूर्ण तन्हेने उभी रहातात ती एकदांच लिहिलीं नसून त्यांतील तुकडे निरनिराळ्या काळी आणि प्रसंगानं कसे उत्पन्न झाले याविषयीं आख्या- विकात्मक जी माहिती महिपतीस होती ती समा- विष्ट केली आहे. जेव्हां आज आपण एखाचा कवींची गाथाच पहातो तेव्हां त्या कवीचंच तें