पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण करून भक्तविजय आरंभला ' ( अध्या १ ओं. ३८-३९) असे सांगितलें आहे तथापि या ग्रंथाचे अवलोकन करतां महिपतीने आपल्या पदरचें पुष्कळच घातलें आहे, त्याचें रा. भावे यांनी थोडेसे विवेचन केलेच आहे. महिपतीनें जें घातले आहे ते बऱ्याच अंशी अगदी काल्प- निक घातलें आहे असें वाटू लागते. जें त्यानें काल्पनिक घातलें आहे त्याचें पृथक्करण करतां बन्याच गोष्टी बाहेर निघतील. कांही गोष्टी देतांना इतिहासाचें अज्ञान बरेंच दाखविले आहे. नरसी मेहेत्यास ज्ञानेश्वराच्या पूर्वीच्या काळांत घातलें आहे, पृथ्वीवर पाप माजलें तें दूर करण्यासाठी वैकुंठांत विष्णुनें जी योजना केली त्या योजनेत “शंकरासि सांगे विश्वकर्ता | तुम्ही व्हावे नरली मेहेता | जुनागडीं भक्तिमार्ग कथा । जना समस्तां ऐकवी ॥ तुम्ही पुढें व्हावें सत्वरें । मीहि मागून येतो त्वरें । ज्ञानेश्वररूपें निर्धारें। अर्थ- गतिचा सांगेन ॥' (अध्याय १. ओं ९५-९६ ). महिपतीच्या भक्तविजयांत अनेक चरित्रे आली आहेत त्यांतून प्रस्तुत पुस्तकांत घेण्याजोगें थोडेच आहे. महिपतीनें नाभाजीच्या ग्रंथापासून आपला ग्रंथ निराळ्या स्वरूपाचा कसा तयार केला त्याविषयीं भावे सांगतात- "चरित्रग्रंथ लिहितांना नाभाजीच्या ग्रंथावर - हुकूम आपला ग्रंथ लिहावा असे प्रथमारंभीं कवीच्या मनांत होते असें दिसतें. व प्रारंभीची चरित्रे तशीच लिहिली आहेत. परंतु नामदेव - ज्ञाने- श्वरादि कवींच्या चरित्रांपर्यंत आल्यावर नाभाजी- पेक्षां या पुरुषासंबंधाने या प्रांतांत जास्त व भिन्न माहिती प्रचलित आहे असें पाहून महिपतीनें नाभाजीचा ग्रंथ सोडून इकडील ग्रंथांच्या आधारे हीं चरित्रे लिहिण्याचें योजिले. कांहीं अध्याय नामदेवाचे तीर्थावळीवरून रचले" याशिवाय भावे असे सांगतात की भानुदास व तुकाराम १०२ यांच्यासंबंधाने माहिती वंशजांकडून मिळविली आणि यांत तुकारामाचा भाग सर्वात सरस आहे. तुकारामाची कथा येथे देण्यांत तात्पर्य नाहीं. तुकारामाचीं चरित्रे म्हणून जो माल आपणांस सांपडतो ती बहुतेक महिपतीच्या तुकारामचरि- त्राची रूपांतरे आहेत. भक्तविजयाच्या प्रारंभीं एक आख्यायिका आली आहे ती येथें जरा सविस्तर देणें अवश्य वाटते. कारण ती प्रकृत विषयावर आहे आणि तीवरून काव्याभिज्ञतेच्या बाबतींत देखील देवी उपाय वापरावेत अशी लोकांची मनोवृत्ति होती असें दिसतें. चरित्रग्रंथांमध्ये काव्यपरीक्षण- विषयक आख्यायिकांचे उदाहरण आले आहे तें येथे देतो. यांत आलेल्या जयदेवकथेच ऐतिहा- सिक महत्त्व कांहीं एक नाहीं हें निराळें सांगा- वयास नकोच. जयदेव कवीच्या गीतगोविंदावर अभिप्राय व्यक्त करण्यासाठी जयदेवास महि - पतीने व्यासाचा अवतार केलें आहे. ग्रंथाच्या उत्कृष्टतेसंबंधाने कांही लिहून त्या ग्रंथाचा राजाला मत्सर कसा झाला याबद्दल एक दंतकथा दिली आहे (अध्याय २). "कामाजी जैसा राव । कीं सकलसाधनांत शुद्ध भाव । तैसा ब्राह्मणवंशी जयदेव । निपुण- वक्ता दिसतसे ॥ श्रुतिशास्त्रे धुंडाळून | पाहिलीं पुराणे संपूर्ण । तयामाजी मुख्य साधन | हरिकीर्तन कलियुगीं । उद्धवासी सांगे रुक्मिणीरमण | कलि- युगीं करावें माझें भजन । म्हणोनि जयदेव कवीनें कवन । गीतगोविंद ग्रंथ केला ॥ ( ओव्या १०-१२). ग्रंथ कां चांगला झाला हैं महिपती सांगतो. "पद्मपुराणींचा इतिहास । त्यांत वर्णिला राधा- बिलास । गोकुळी क्रीडला जगन्निवास । कृष्ण अवतारीं निजलीलें || आधींच श्रीहरीचें गुण जाणा । त्यावरी जयदेवें केली पथरचना । सुव- र्णाचिया कंकणा । रत्न कोंदणा बसविले ॥" (१३-१४).