पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०१ महपांत आणि मोरोपंत तेवि न वाणीचाही, कंठीं नसतांहि लेश कफकीर ॥ १०० ॥ सन्मणिमाळेंत ज्या व्यक्तींच्या ग्रंथकर्तृत्वाचा उल्लेख आहे अशा व्यक्ती इतक्याच. यांत देखील ज्या व्यक्तींच्या काव्यांतील गुणांसंबंधानें आपलें मत मोरोपंतांनीं व्यक्त केलें अशा व्यक्ती म्हटल्या म्हणजे (१) आनंदतनय, (२) विठ्ठल, (३) अमृत राय (४) वामन. वामनाची आणि अमृतरायाची तारीफ रसाबद्दल केली आहे तर आनंदतनयाची यमकाबद्दल केली आहे व विठ्ठलाची चित्रकूटां- बद्दल केली आहे व ही देखील केवळ अशी आहे कीं, तितपत मत व्यक्त करणें अगदीं सामान्य मनुष्यास शक्य आहे. ” आतां मोरोपंतांच्या विशिष्ट कवींवर लिहि- लेल्या काव्यांकडे वळू. ज्ञानेश्वरसं, “ विश्वास प्रिया तुझ्या ओंव्या (ज्ञानदेवस्तव ८ ) . नामदेवसं. “स्वप्रेमाचाचि लेश दे वास” (नामदेवस्तव १३). वामनपंडितसं. "साजविली साधुसभा, भाषा, कविकवनशक्ति लाजविली. " रीति समश्लोकीची अतुला साधेल काय भव्यास? या सुयशें होइल कां रोमांचव्याप्तकाय न व्यासः वाटे सूक्तिश्रवणें मस्तक वाल्मीकिनेंहि डोलविला प्रभु भुलवाया मन वामन हा वेणुसाचि बोलविला याच्या सद्रसभवनें कवनें तो नाचलाचि नाकर्षी हरिजन, हरिजनहृदया जैसा चुंबक अयास आकर्षी अन्यत्र नसे, कवनीं यावे रस सर्व, हा नियम कांहीं केली, भाषा कवि जे, त्यांची तो गर्वहानि यमकांहीं. (वामनपंडितस्तुति ५–९). तुकारामासंबंध ज्याच्या सदभंगातें जन, जेंवि बाल आम्यातें सदभंग कथेंत नको तरि मग शाळेत दीप काशाला ?” महिपतीसंबंधी- (तुकारामस्तुति १८ व २१ ). सत्य तुकारामाचा या महिपतिवरि प्रसाद असे ज्ञानोबाची जैसी एकोबाची सुधा जशी वाणी सदनुग्रहाविणें हे निघतिल उद्गार सार काय असे कीं मुक्तेश्वर कविचि महिपतिची सेविती तशी प्राणी " या वरील अभिप्रायाखेरीज विशिष्ट व्यक्तीवर लिहिलेच्या स्तवांस्तुतींमध्ये कवित्वावर मत व्यक्त करणारे उल्लेख नाहींत. या दिलेल्या उल्लेखांत काव्यावर मत देखील बेताचेंच व्यक्त झालें आहे. ज्ञानेश्वराच्या ओव्या जगास प्रिय आहेत हें विधान मोरोपंत करतो, त्याप्रमाणे नामदेवाच्या कवितेंत जें ईश्वरप्रेमाचे प्राधान्य दिसून येतें त्याविषयीं मोरोपंत आपली अभिज्ञता दाखवितो. मोरोपत कवित्वाच्या दृष्टीनें ज्याविषयीं प्राधान्याने उल्लेख करतो असा कवि म्हणजे वामनपंडित होय. वामनाच्या कवितेनें “साधुसभा सजविली, भाषा सजविली कविकवनशक्ति लाजविली. समश्लो- कीची रीति भलत्यास साधेल काय" या प्रश्नानें मोरोपंत काय म्हणतात हे नक्की कळत नाहीं. मला ती साधेल काय अशा तऱ्हेची कल्पना त्यांच्या मनांत असावीसें वाटतें. महिपतीचें ग्रंथकर्तृत्व महिपतीनें कोणत्या ग्रंथाच्या आधाराने आपले ग्रंथ लिहिले हे खात्रीपूर्वक सांगतां येत नाहीं. भक्तविजयाच्या पहिल्या अध्यायांत "तरी उत्तर देशीं साचार । नाभाजी विरींचि अवतार । तेणें संतचरित्र ग्रंथ थोर । ग्वाल्हेरी भाषेत लिहिला असे || आणि मान देशीं उद्भवचिद्धन त्यांहों I शोभे कथा अभंगा पावुनियां जेंवि दीपका शाला भक्तचरित्रे वर्णिला जाण । दोही चें संमत एक