पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण १०० ज्याचे प्रेम हरिपदी तैसें हरिपद पराजना कवनी" ॥२१॥ (३) "दासोपंती केला गीतार्णव मानवा सवालाख । ग्रंथ परम दुस्तर तो न तयाचि, जसें न वासवाला ख" (४) "भव्य कथाकल्पतरु, क्षितिवार सर्वत्र सुलभ जो लावी । डोलावी देवसभा ॥२३॥ तद्बहुमतता अशीच बोलावी" ॥२४॥ [या आर्यात लेखकाचे नांव नाहीं पण या कथाकल्पतरूचा लेखक कृष्ण याज्ञवल्की म्हणून होता असे संपादक वामन दाजी ओक आपल्या टीपांत म्हणतात; (काव्यसंग्रह ग्रंथांक २९.) ] (५) "हरिविजय ग्रंथातें मग आधी श्रीधरास वंदीन । शिववंदनकामां हीं लंघावा प्रथम देव नंदी न" ॥३१॥ [यांत श्रीधराचे ग्रंथकर्तृत्त्व फक्त सुचविलें आहे, सांगितलें नाहीं . ] (६) "श्री मुक्तेश्वर कार्यवर यातें कोण न शुभेच्छु वंदील | बंदी लक्ष जयाचे ज्याचे यश भव्य जैवि मंदील" ॥३२॥ (७) “उद्धवचिद्धन केवळ. मी मोर तयासमोर हर्षानें । तांडव करितों, होउनि गततः प तदीय सूक्तिवर्षानें " ॥३७॥ (८) "कीर्तनसुखार्थ झाला अवतारच अमृतराय जीवाचा । मलत्या मुखांतुनि अशी सुरसखान निघेल काय जी वाचा" ॥४४॥ (९) "भक्तांत भवांत पुन्हां भेटि न व्हाया कदापि वैरागी । ज्याची निर्मी; ऐसा रामानंद प्रसिद्ध बैरागी " ॥५९॥ (१०) “माया हे संसृतिची जाळूनि सशोक कबी रमला । रामपदाब्जी अलिसा; बहुमत सुमुदोक तो कबीर मला" ॥६०॥ (११) "विष्णुपदी विष्णुपदें जरि वाहे रसपदेंहि "मानपुरी” ॥ ६५ ॥ (१२) "बहुसुप्रसन्न” म्हणतो सुकवि म्हणुनि "सूरदास मजला हो" (१३) "केशवदास महाकवि सम, हा कवितासलक्षणा करितो " ॥ ६९ ॥ ( या केशवदासासंबंधानें कांहीं माहिती नाहीं म्हणून ओक सांगतात.) (१४) " साधु बिहारीलाल ख्यात करी ग्रंथ सप्तशत दोहा " ॥ ७० ॥ (१५) " आनंदतनय अरणीकर शोभवि फार कवन यमकांही" ॥ ७३ ॥ (१६) "विठ्ठलकविच्या भलता लंबू न शके चे चित्रकूटातें" ॥ ७४ ॥ (१७) बहुशोभला शिवाजीबाबा महिमहिलेच्या नाकी शुद्ध सद्वृत्त लेण्यांत । मौक्तिकमणि साघुरूप लेण्यांत ॥ ८७ ॥ [ यांत उल्लेखिलेल्या शिवाजीविषयीं "साधु- विशेष" एवढीच माहिती ओक देतात. "सद्वृत्त" या शब्दाचे दोन अर्थ होऊं शकतात. त्यामुळे हा कवि होता की केवळ साधु होता हें सांगतां येत नाहीं ]. (१८) " बा तुळसीदास न जरि वाल्मीकिसमान मानवा तुळशी । तर रामदूत कीं ती ही उक्तिसमान मान वातुळशी " ॥ ९४ ॥ (१९) " बोले मधुर मनोहर, मृदु शाहहुसेन नामक फकीर